ऊस लागवड करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात:
साधारणपणे उसाला प्रत्येक नोड /कांडी वरती एक डोळा आजपर्यंत आपण सर्वच बघत आलोय.
पण काही शेतकऱ्यांना us lagvad ऊस लागवड करताना एका नोड वरती २ किंवा ३ डोळे काही ठिकाणी आढळून आल्याचं आम्हाला निदर्शनास आणून दिले.
असे का होतंय ? आणि हा चमत्कार तर नाही ना ?
असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यात उपस्थित होणे साहजिकच आहे.
-ऊसाला एका ठिकाणी २-३ डोळे असू शकतात.
काही वेळेस तर ५ पर्यंत डोळे एकाच नोड ला आढळून आलेले आहेत.
तर काही वेळेस ऊसाला डोळेच नसतात.
तर काही वेळेस एकाच ऊसावरती एक नोड सोडून दुसऱ्या नोड वरती अश्याप्रकारे २-३ डोळे दिसून येतात.

us lagvad ऊस लागवड करताना सद्यस्थितीतील या समस्या याला बरेच कारणे कारणीभूत असतात.
१) उसाच्या हॉर्मोन्स किंवा शारीरिक घटकामध्ये किरकोळ झालेला बदल.
२) कीटकांचा प्रादुर्भाव विशेष करून ऊस पोखरणारे कीटक.
३) काही कारणास्तव ऊस वाढीचा शेंडा तुटल्या नंतर उसाची वाढ खुंटल्यामुळे.
४) ऊस काही कारणास्तव खाली जमिनीवर पडल्यानंतर काहीं संप्रेरकांचे स्थिरीकरण झाल्यामुळे सुद्धा असे प्रकार झाल्याचं निदर्शनास आले आहे.
५)प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा कमी अधिक प्रमाणात वापर.
एकाच नोड ला एका पेक्षा जास्त डोळे असलेल्या us lagvad ऊसाच्या लागवडीनंतर फुटवे सुध्दा जास्त येतात असे काही संशोधकांनी निरीक्षण केले.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
हे वैशिष्ट्य अनुवांशिकरित्या ऊसात येत नाही.
याचाच अर्थ असा की एका नोड ला आलेले २-४ डोळे पुढच्या पिढीत तसेच येईलच असे होतं नाही.