Tak-andi sajivak: ताक-अंडी संजीवक आणि नैसर्गिक कीटकनाशक बनवण्याची पद्धत

आज हवामान बदल, अन्नसुरक्षा आणि रासायनिक अवशेष याबाबत चिंता वाढत आहे. अशावेळी भारतातून तयार झालेली ताक–अंडी कीटकनाशक पद्धत संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरू शकते. जगभरातील शेतकरी आज सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेतीकडे वळत आहेत. भारतात तयार झालेल्या एका अभिनव संजीवक आणि नैसर्गिक कीटकनाशकाने Tak-andi sajivak पिकांवरील कीड आणि रोगांवर उत्तम नियंत्रण मिळवून दिलं आहे. हे सेंद्रिय मिश्रण अतिशय स्वस्त, पूर्णपणे रसायनमुक्त तसेच पर्यावरणपूरक आहे.

Tak-andi sajivak
Tak-andi sajivak

                ही पद्धत भारतातील संशोधक श्री. स्वप्निल भाऊसाहेब देशमुख यांनी 10 वर्षांच्या संशोधनातून आणि शेतातील प्रयोगातून विकसित केली आहे. त्यांच्या सततच्या प्रयोगशील संशोधनातून, अनुभवातून जी माहिती समोर आली ती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

  • ताक आणि अंडी Tak-andi sajivak का प्रभावी ठरतात?
  • ताक–अंडी कीटकनाशक बनवण्याची पद्धत.
  • कोणत्या पिकांवर वापरता येते?
  • रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत फायदे.

ताक आणि अंडी Tak-andi sajivak का प्रभावी ठरतात?

ताक (फर्मेन्टेड दूध):

यामध्ये लॅक्टिक अॅसिड, बॅक्टेरिया असतात जे हानिकारक जिवाणू व रोगांना दडपतात.

पानांवर फवारणी केल्यास झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

अंडी:

अंड्यात सल्फर, प्रथिने आणि अमिनो अॅसिड भरपूर असतात.

सल्फर नैसर्गिक बुरशीनाशक आहे, तर प्रथिने झाडांच्या वाढीस मदत करतात.

ताक आणि अंडी एकत्र करून फर्मेन्टेशन केल्यास हे मिश्रण एक प्रभावी जैविक खत + जैविक कीटकनाशक बनते.

ताक–अंडी संजीवक, कीटकनाशक बनवण्याची पद्धत

साहित्य: 1 लिटर ताक, 10 अंडी, झाकण असलेला काचेचा किंवा प्लास्टिकचा डबा

पद्धत:

1. ताकामध्ये अंडी फोडून नीट मिसळा.

2. मिश्रण एकसारखे झाले की झाकण लावून डब्यात साठवा.

3. हे मिश्रण 7 ते 10 दिवस सावलीत व शक्य असल्यास उबदार ठिकाणी ठेवा.

दर 2–3 दिवसांनी हलके ढवळा.

4. 7 ते 10 दिवसांनी मिश्रणाला तीव्र वास येईल, म्हणजे फर्मेन्टेशन पूर्ण झाले आहे.

फवारणीसाठी मिश्रण वापरण्याचे प्रमाण:

1 लिटर पाण्यात  15 मि.ली. ताक–अंडीचे मिश्रण वापरा.

10–15 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारणी करा.

ताक-अंडी संजीवक वापरताना इतर कीटकनाशके मिसळू नयेत.

Tak-andi sajivak फवारणीचा वेळ आणि हवामान

➡सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फवारणी करा.

➡फवारणीनंतर 24 तास पाऊस येणार नाही याची खात्री करा.

Tak-andi sajivak कोणत्या पिकांवर वापरता येते?

हे नैसर्गिक सेंद्रिय मिश्रण सर्वच पिकांवर प्रभावी काम करते जसे की,

कापूस, सोयाबीन, गहू, ज्वारी, मका

भाजीपाला (टोमॅटो, कांदा, मिरची, वांगी)

फळपिके (डाळिंब, पपई, ड्रॅगन फ्रूट, संत्री, मोसंबी)

फुले (झेंडू व इतर फुलझाडे)

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

  • पिकांची वाढ: हे पिकांना आवश्यक पोषक तत्वे देऊन त्यांची जोमदार वाढ करते.
  • फुलधारणा: फुले जास्त प्रमाणात येण्यास आणि टिकून राहण्यास मदत करते.
  • बुरशीनाशक: पिकांवरील बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करते.
  • कीटकनाशक: कीटकांना दूर ठेवण्यासही मदत करते. 
  • 100% नैसर्गिक आणि रसायनमुक्त.
  • रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत खर्च खूप कमी.
  • जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांना प्रोत्साहन देते.
  • माणसासाठी, मधमाश्यांसाठी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे.

निष्कर्ष (Conclusion):

  • ताक-अंडी हे एक जिवंत जैविक द्रावण आहे.
  • त्याची परिणामकारकता ही फर्मेंटेशनच्या गुणवत्तेवर, तुमच्या वापराच्या पद्धतीवर आणि सातत्यावर अवलंबून आहे.
  • थोडा संयम ठेवा, आणि हे द्रावण सतत वापरा.
  • जमिनीला पुनरुज्जीवन मिळू द्या.

काही लोकांना ताक-अंडी वापरून अपेक्षित परिणाम / रिझल्ट दिसत नाहीत.  त्यामागची खरी कारणं काय असतात?

*ताक-अंडी द्रावण बनवताना, अंडी आणि ताक यांचं योग्य प्रमाण न घेणे.

*तापमान आणि झाकण व्यवस्थित लावणं फार महत्वाचं असतं.

* अंड्यांचे फर्मेंटेशन व्यवस्थित न होणे.

जर अंडी व्यवस्थित फर्मेंट झाली नाहीत तर त्यात नैसर्गिक अमिनो अॅसिड, सल्फर आणि बायो-एन्झाइम्स तयार होत नाहीत. अशावेळी द्रावण केवळ साधं मिश्रण राहातं, त्याचं कीटकनाशक गुणधर्म कमी होतात.

उपाय:

ताक आणि अंडी 7 ते 10 दिवस झाकून ठेवा.

रोज थोडं हलवून घ्या.

हलका आंबूस वास आला की समजायचं, फर्मेंटेशन पूर्ण झालं आहे.

ताक-अंडी जास्त दिवस न ठेवणे, त्यामुळे गॅस तयार न होणे.

ताक-अंडी तयार झाल्यावर गॅस निर्माण होतो, म्हणजे फर्मेंटेशन पूर्ण झालं हे लक्षण असतं.

पण जर तुम्ही ते 3–4 दिवसांतच वापरलं, तर अजून बायो-प्रक्रिया पूर्ण झालेली नसते.

त्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता कमी राहते.

तसेच ज्या जमिनीत वर्षानुवर्षे रासायनिक खतं, कीटकनाशकं वापरली गेली आहेत  तिथे सूक्ष्मजीव नष्ट झालेले असतात.

अशा ठिकाणी नैसर्गिक द्रावण वापरल्यावर सुरुवातीला परिणाम कमी दिसतात.

कारण, जमिनीतील सूक्ष्मजीवांना परत जिवंत होण्यासाठी वेळ लागतो. ताक-अंडी नियमित 2–3 वेळा वापरा.

जीवामृत घरच्या घरी कसे तयार करावे?

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1. ताक अंडी हे कीटकनाशक म्हणून कसे काम करते?

ताक-अंडी हे नैसर्गिक संरक्षणात्मक कीटकनाशक आहे.

जर कीड खूप वाढल्यावर वापरलं, तर परिणाम मर्यादित दिसतो. म्हणजेच ते कीड वाढण्याआधी (Preventive) वापरायचं असतं, कीड संपवण्यासाठी नव्हे.

2. ताक-अंडी वापरून अपेक्षित परिणाम / रिझल्ट का दिसत नाहीत?

  • कारण, बरेचदा शेतकरी ताक-अंडी खूप dilute (पातळ) करून वापरतात.

परिणामी त्यातील पोषक आणि जिवाणू कमी होतात.

  • पिकावर फवारणी एकसारखी नाही झाली तर.
  • ताक-अंडी द्रावण योग्य प्रमाणात न वापरणे.

3. कोणते कीड व रोग नियंत्रण करते?

मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, बुरशीजन्य रोग (पावडरी मिल्ड्यू, डाग रोग, ब्लाइट्स) या रोगांचे नियंत्रण होते.

11 thoughts on “Tak-andi sajivak: ताक-अंडी संजीवक आणि नैसर्गिक कीटकनाशक बनवण्याची पद्धत”

  1. लेखातील १ लिटर ताक आणि १० अंडी वापरून ७–१० दिवस फर्मेन्टेशन करण्याची पद्धत, तसेच प्रति लिटर पाण्यात १५ मि.ली. मिश्रणाचे प्रमाण स्पष्ट दिले आहे. शेतकरी ही प्रक्रिया आणि फवारणीची योग्य वेळ दाखवणारे छोटे संदर्भ व्हिडिओ Reference2Video मध्ये तयार करू शकतात.

    reference to video

  2. The recipe is refreshingly practical: 1 litre of buttermilk with 10 eggs, fermented in the shade for 7–10 days, then diluted at 15 ml per litre of water. I also appreciate the reminder to spray in the cool hours and avoid mixing it with other pesticides. Genjutsu AI is a very different kind of tool, but its motion-transfer and object-swap features

    Genjutsu AI

  3. लेखात १ लिटर ताकात १० अंडी मिसळून ७–१० दिवस सावलीत आंबवण्याची पद्धत आणि प्रति लिटर पाण्यात १५ मि.ली. वापरण्याचे प्रमाण स्पष्ट दिले आहे. फवारणीची वेळ व पावसापासूनचे अंतरही नमूद केल्याने शेतकऱ्यांना उपयोगी मार्गदर्शन मिळते. हा प्रयोग दाखवणारा छोटा व्हिडिओ तयार करायचा असल्यास, Bulin 47 AI एका पात्राच्या फोटोवरून मूळ हालचाली आणि ताल कायम ठेवून फ्रीस्टा

    Bulin 47 AI Video Generator

  4. लेखात ताक आणि अंडी ७–१० दिवस सावलीत आंबवून, प्रति लिटर पाण्यात १५ मि.ली. मिश्रण वापरण्याची स्पष्ट माहिती दिली आहे—घरच्या घरी करता येणारा हा कमी खर्चाचा पर्याय रसायनमुक्त शेतीसाठी उपयुक्त वाटतो. शेतातील प्रयोगांचे परिणामही समाविष्ट केले तर वाचकांना अधिक मार्गदर्शन मिळेल.

    Money Spread AI video

  5. लेखात ताकातील लॅक्टिक अॅसिड आणि अंड्यातील सल्फरचा उपयोग, तसेच ७–१० दिवसांचे फर्मेन्टेशन व १५ मि.ली. प्रति लिटरचे प्रमाण स्पष्ट दिले आहे—शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन. ही प्रक्रिया आणि शेतातील परिणाम दाखवणारा छोटा व्हिडिओ तयार झाला, तर पद्धत अधिक सहज समजेल.

    Burning Bridges AI

  6. The 1-litre buttermilk and 10-egg recipe, fermented for 7–10 days and diluted at 15 ml per litre, makes the method easy to follow. I also appreciate the reminder to spray in dry weather. A very different kind of visual, but Phone Stuck to Train AI can turn one photo into a 14-second moving-train video with its original soundtrack.

    phone-on-train trend

  7. लेखातील १ लिटर ताक आणि १० अंडी वापरून ७–१० दिवस आंबवण्याची पद्धत, तसेच फवारणीचे अचूक प्रमाण आणि वेळ दिल्यामुळे माहिती उपयोगी वाटली. रसायनमुक्त शेतीचा हा प्रयोग वाचताना 1 in 8 Billion मधील सिम्युलेशनची आठवण झाली—जन्मस्थानापासून आयुष्याच्या वाटचालीपर्यंतचे निर्णय अनुभवून पाहण्याचा हा वेगळा मार्ग आहे.

    1 in 8 Billion

Leave a Comment