आज हवामान बदल, अन्नसुरक्षा आणि रासायनिक अवशेष याबाबत चिंता वाढत आहे. अशावेळी भारतातून तयार झालेली ताक–अंडी कीटकनाशक पद्धत संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरू शकते. जगभरातील शेतकरी आज सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेतीकडे वळत आहेत. भारतात तयार झालेल्या एका अभिनव संजीवक आणि नैसर्गिक कीटकनाशकाने Tak-andi sajivak पिकांवरील कीड आणि रोगांवर उत्तम नियंत्रण मिळवून दिलं आहे. हे सेंद्रिय मिश्रण अतिशय स्वस्त, पूर्णपणे रसायनमुक्त तसेच पर्यावरणपूरक आहे.

ही पद्धत भारतातील संशोधक श्री. स्वप्निल भाऊसाहेब देशमुख यांनी 10 वर्षांच्या संशोधनातून आणि शेतातील प्रयोगातून विकसित केली आहे. त्यांच्या सततच्या प्रयोगशील संशोधनातून, अनुभवातून जी माहिती समोर आली ती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
- ताक आणि अंडी Tak-andi sajivak का प्रभावी ठरतात?
- ताक–अंडी कीटकनाशक बनवण्याची पद्धत.
- कोणत्या पिकांवर वापरता येते?
- रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत फायदे.
ताक आणि अंडी Tak-andi sajivak का प्रभावी ठरतात?
ताक (फर्मेन्टेड दूध):
यामध्ये लॅक्टिक अॅसिड, बॅक्टेरिया असतात जे हानिकारक जिवाणू व रोगांना दडपतात.
पानांवर फवारणी केल्यास झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
अंडी:
अंड्यात सल्फर, प्रथिने आणि अमिनो अॅसिड भरपूर असतात.
सल्फर नैसर्गिक बुरशीनाशक आहे, तर प्रथिने झाडांच्या वाढीस मदत करतात.
ताक आणि अंडी एकत्र करून फर्मेन्टेशन केल्यास हे मिश्रण एक प्रभावी जैविक खत + जैविक कीटकनाशक बनते.
ताक–अंडी संजीवक, कीटकनाशक बनवण्याची पद्धत
साहित्य: 1 लिटर ताक, 10 अंडी, झाकण असलेला काचेचा किंवा प्लास्टिकचा डबा
पद्धत:
1. ताकामध्ये अंडी फोडून नीट मिसळा.
2. मिश्रण एकसारखे झाले की झाकण लावून डब्यात साठवा.
3. हे मिश्रण 7 ते 10 दिवस सावलीत व शक्य असल्यास उबदार ठिकाणी ठेवा.
दर 2–3 दिवसांनी हलके ढवळा.
4. 7 ते 10 दिवसांनी मिश्रणाला तीव्र वास येईल, म्हणजे फर्मेन्टेशन पूर्ण झाले आहे.
फवारणीसाठी मिश्रण वापरण्याचे प्रमाण:
1 लिटर पाण्यात 15 मि.ली. ताक–अंडीचे मिश्रण वापरा.
10–15 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारणी करा.
ताक-अंडी संजीवक वापरताना इतर कीटकनाशके मिसळू नयेत.
Tak-andi sajivak फवारणीचा वेळ आणि हवामान
➡सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फवारणी करा.
➡फवारणीनंतर 24 तास पाऊस येणार नाही याची खात्री करा.
Tak-andi sajivak कोणत्या पिकांवर वापरता येते?
हे नैसर्गिक सेंद्रिय मिश्रण सर्वच पिकांवर प्रभावी काम करते जसे की,
कापूस, सोयाबीन, गहू, ज्वारी, मका
भाजीपाला (टोमॅटो, कांदा, मिरची, वांगी)
फळपिके (डाळिंब, पपई, ड्रॅगन फ्रूट, संत्री, मोसंबी)
फुले (झेंडू व इतर फुलझाडे)
शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
- पिकांची वाढ: हे पिकांना आवश्यक पोषक तत्वे देऊन त्यांची जोमदार वाढ करते.
- फुलधारणा: फुले जास्त प्रमाणात येण्यास आणि टिकून राहण्यास मदत करते.
- बुरशीनाशक: पिकांवरील बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करते.
- कीटकनाशक: कीटकांना दूर ठेवण्यासही मदत करते.
- 100% नैसर्गिक आणि रसायनमुक्त.
- रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत खर्च खूप कमी.
- जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांना प्रोत्साहन देते.
- माणसासाठी, मधमाश्यांसाठी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे.
निष्कर्ष (Conclusion):
- ताक-अंडी हे एक जिवंत जैविक द्रावण आहे.
- त्याची परिणामकारकता ही फर्मेंटेशनच्या गुणवत्तेवर, तुमच्या वापराच्या पद्धतीवर आणि सातत्यावर अवलंबून आहे.
- थोडा संयम ठेवा, आणि हे द्रावण सतत वापरा.
- जमिनीला पुनरुज्जीवन मिळू द्या.
काही लोकांना ताक-अंडी वापरून अपेक्षित परिणाम / रिझल्ट दिसत नाहीत. त्यामागची खरी कारणं काय असतात?
*ताक-अंडी द्रावण बनवताना, अंडी आणि ताक यांचं योग्य प्रमाण न घेणे.
*तापमान आणि झाकण व्यवस्थित लावणं फार महत्वाचं असतं.
* अंड्यांचे फर्मेंटेशन व्यवस्थित न होणे.
जर अंडी व्यवस्थित फर्मेंट झाली नाहीत तर त्यात नैसर्गिक अमिनो अॅसिड, सल्फर आणि बायो-एन्झाइम्स तयार होत नाहीत. अशावेळी द्रावण केवळ साधं मिश्रण राहातं, त्याचं कीटकनाशक गुणधर्म कमी होतात.
उपाय:
ताक आणि अंडी 7 ते 10 दिवस झाकून ठेवा.
रोज थोडं हलवून घ्या.
हलका आंबूस वास आला की समजायचं, फर्मेंटेशन पूर्ण झालं आहे.
ताक-अंडी जास्त दिवस न ठेवणे, त्यामुळे गॅस तयार न होणे.
ताक-अंडी तयार झाल्यावर गॅस निर्माण होतो, म्हणजे फर्मेंटेशन पूर्ण झालं हे लक्षण असतं.
पण जर तुम्ही ते 3–4 दिवसांतच वापरलं, तर अजून बायो-प्रक्रिया पूर्ण झालेली नसते.
त्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता कमी राहते.
तसेच ज्या जमिनीत वर्षानुवर्षे रासायनिक खतं, कीटकनाशकं वापरली गेली आहेत तिथे सूक्ष्मजीव नष्ट झालेले असतात.
अशा ठिकाणी नैसर्गिक द्रावण वापरल्यावर सुरुवातीला परिणाम कमी दिसतात.
कारण, जमिनीतील सूक्ष्मजीवांना परत जिवंत होण्यासाठी वेळ लागतो. ताक-अंडी नियमित 2–3 वेळा वापरा.
जीवामृत घरच्या घरी कसे तयार करावे?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
1. ताक अंडी हे कीटकनाशक म्हणून कसे काम करते?
ताक-अंडी हे नैसर्गिक संरक्षणात्मक कीटकनाशक आहे.
जर कीड खूप वाढल्यावर वापरलं, तर परिणाम मर्यादित दिसतो. म्हणजेच ते कीड वाढण्याआधी (Preventive) वापरायचं असतं, कीड संपवण्यासाठी नव्हे.
2. ताक-अंडी वापरून अपेक्षित परिणाम / रिझल्ट का दिसत नाहीत?
- कारण, बरेचदा शेतकरी ताक-अंडी खूप dilute (पातळ) करून वापरतात.
परिणामी त्यातील पोषक आणि जिवाणू कमी होतात.
- पिकावर फवारणी एकसारखी नाही झाली तर.
- ताक-अंडी द्रावण योग्य प्रमाणात न वापरणे.
3. कोणते कीड व रोग नियंत्रण करते?
मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, बुरशीजन्य रोग (पावडरी मिल्ड्यू, डाग रोग, ब्लाइट्स) या रोगांचे नियंत्रण होते.