ऊस हे बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे पीक आहे. अपेक्षित उत्पादनासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे Sugarcane management अत्यंत गरजेचे आहे. या पिकाची पाण्याची गरजही जास्त आहे. ऊसाची वाढ आणि जमिनीतील ओलावा यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. ऊसाला लागणाऱ्या पाण्याची गरज ही प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, मशागत पद्धती, वर्षभरात पडलेला एकूण पाऊस, सध्याचे तापमान आणी पाण्याचा वापर यावर अवलंबून असते.

ऊस पिकाच्या चार महत्त्वाच्या संवेदनशील अवस्था आहेत. जसे की उगवणीचा कालावधी, फुटवे फुटण्याची अवस्था, मुख्य वाढीचा काळ आणि परिपक्वतेचा कालावधी. या अवस्थेमध्ये पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच उशिरा तुटलेल्या ऊसातील खोडव्याचा, फुटवे फुटण्याचा आणी मुख्य वाढीचा कालावधी हा उन्हाळ्यातच येतो. अशावेळी पाण्याचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. या परिस्थितीत खालील उपाययोजना केल्यास उत्पादनात येणारी संभाव्य घट कमी करता येईल.
तापमान वाढीचे दुष्परिणाम
वाढत्या तापमानात Sugarcane management पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी, तापमान वाढीचे काय दुष्परिणाम होतात हे आपण अगोदर पाहूया.
1. तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो, त्यामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी होते.
2. मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढल्यामुळे मुळांची कार्यक्षमता कमी होते परिणामी मुळाद्वारे पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते.
3. हरितद्रव्यांचे प्रमाण घटल्यामुळे पीक पिवळे दिसू लागते. याचा प्रतिकूल परिणाम पिकाच्या वाढीवर होतो.
4. ऊस पिकामध्ये कांड्यांची लांबी, जाडी कमी होऊन वजनात घट येते.
5. उसातील तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशी पडते. परिणामी साखरेचा उतारा घटतो.
6. पाण्याचा तीव्र ताण बसल्यास, ऊस सरळ उंच वाढण्याऐवजी डोळे फुटून आन्सा/पांगशा फुटतात.
Sugarcane management करावयाच्या उपाययोजना
ठिबक सिंचन पद्धतीचा वापर
या पद्धतीमध्ये कमी प्रवाह असलेले ड्रीपर वापरून दिवसाआड पाणी देणे. ऊसात पाचटाचा वापर केल्यास 75 % पाण्याची बचत होते. जमीन सतत वापसा अवस्थेत राहिल्याने ऊसाची वाढ जोमाने होते, फुटव्यांची संख्या वाढते. ऊसाची आणि कांड्यांची लांबी, जाडी, वजन आणि पर्यायाने साखर उत्पादन वाढते. ठिबक सिंचन पद्धत ही व्यवस्थित आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने वापरली तरच आपल्याला याचे फायदे मिळू शकतात. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा आराखडा आणि आरेखन शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित असणे आवश्यक आहे.
सरीआड-सरी पाणी
आडसाली व पूर्वहंगामी ऊसामध्ये पाण्याचा ताण पडत असल्यास एकाआड एक सरीतून पाणी द्यावे. ऊसाच्या बुडातील पक्व झालेली पाने काढून त्याचे सरीमध्ये आच्छादन करावे. पीक तणविरहित ठेवावे. या पद्धतीमुळे पाण्याची 40 % बचत होते.
सेंद्रिय खतांचा वापर
सेंद्रिय खतामुळे जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीतील अंतर्गत तापमान संतुलित राहते. त्याचबरोबर सेंद्रिय कर्बाचा पुरवठा सुरळीत होतो. यासाठी शेणखत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचा वापर केल्यामुळे ऊसाची पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.
Sugarcane management आंतरमशागत
ज्या ठिकाणी पाचटाचा वापर केला नाही त्या शेतात पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीला भेगा पडल्याचे दिसून येते. त्यामुळे जमिनीतील ओल, बाष्पीभवनामुळे झपाट्याने कमी होते. जमिनीला भेगा पडू नये म्हणून, छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आंतरमशागतीची (कुळवणी) कामे करावी. मातीच्या या थरामुळे अच्छादन तयार होते, त्यामुळे भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते.

बाष्परोध आणि आवश्यक अन्नद्रव्यांची फवारणी
ऊस पिकात पाण्याचा ताण पडत असल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी 6 ते 8% केवोलीन (kaolin) या बाष्परोधकाची फवारणी करावी.
पिकाला पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवड्यांनी 2% म्युरेट ऑफ पोटॅश (10 ग्रॅम प्रति लिटर पाणी) व 2% युरिया (10 ग्रॅम प्रति लिटर पाणी) यांचे मिश्रण करून फवारणी करावी.
तसेच सिलिकॉनच्या वापरामुळे बाष्पोत्सर्जनाचा वेग 10 टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे या काळात सिलिकॉन हे अन्नद्रव्य ऊस पिकाला फायदेशीर ठरते.
ऊसाची बांधणी केलेली नसल्यास, बांधणीच्या वेळी शिफारशी पेक्षा 25% जास्त पालाश खताची मात्रा द्यावी. Sugarcane management पालाश खतामुळे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये राहते.
शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरी, हत्तीघास(उंच वाढणारे गवत) सारखी पिके लावावीत. जेणेकरून उन्हाच्या झळांपासून पिकाचे संरक्षण होईल…