Sanajivak-शेतीमध्ये संजीवकांचा सावध वापर       

Sanajivak- वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त असे घटक, की जे वनस्पतीच्या जैवरासायनिक क्रियेमध्ये (शरीरक्रियात) लक्षणीय बदल घडवून आणतात. वनस्पतींच्या शारीरिक क्रियावर ताबा ठेवणारी काही रासायनिक द्रव्ये नैसर्गिक रित्या वनस्पतीमध्ये तयार होत असतात. या द्रव्यांना संजीवके किंवा वनस्पती वृद्धी संप्रेरके असे म्हणतात. पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थेमध्ये वेगवेगळी संजीवके नैसर्गिकरीत्या  वनस्पतीमध्ये  तयार होत असतात.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यातील रासायनिक घटक वेगळे करून किंवा प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरीत्या संजीवके तयार करणे शक्य झाले आहे.  ही sanajivak अत्यंत अल्प प्रमाणात आणि शिफारशीनुसार वापरल्यास त्यांचा पिकांच्या वाढीसाठी, बहर धरण्यासाठी किंवा वाढ रोखून ठेवण्यासाठी वापर होतो.  पानांच्या माध्यमातून संजीवके पिकात शोषली जाऊन त्यांचा परिणाम लवकर मिळतो. त्यामुळे आधुनिक शेतकरी बाजारामध्ये वेगवेगळ्या नावांनी मिळणारी  ही संजीवके प्राधान्याने वापरत आहेत. त्याचा वापर समजून-उमजून किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. यासाठी त्यांची ओळख असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Sanajivak-शेतीमध्ये संजीवकांचा सावध वापर   
Sanajivak-शेतीमध्ये संजीवकांचा सावध वापर   

संजीवकांचे प्रकार

Sanajivak-ऑक्सिन्स

यांच्या वापरामुळे वनस्पतींच्या पेशींची लांबी वाढते.  उदा. आय. ए. ए., आय. बी. ए.

इंन्डोल 3 असिटिक ऍसिड(आय. ए. ए.)  हे निसर्गात आढळून येणारे Sanajivak संजीवक आहे.

वनस्पतीमध्ये कलम करताना भिन्न प्रकारच्या वनस्पती पेशींचा एकजीव करण्यासाठी ऑक्सिन्स वापरतात.

फळ पिके, फुलझाडे, विविध शोभेची झुडपे यांच्या अभिवृद्धीमध्ये ऑक्सिन्स चा वापर यशस्वीपणे करता येतो. 10 ते 100 पीपीएम पर्यंत पानावर व फळावर या ऑक्सिन्सची फवारणी केल्यास पानांची व फळांची अकाली गळती कमी होते. या संजीवकाचा (1000-10000 पीपीएम) फळधारणा आणि फळांची विरळणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा वापर करतात. वनस्पतीच्या छाट कलमांना मुळे फुटण्यासाठी तसेच मुळ्यांच्या संख्येत भरघोस वाढ करण्यासाठी यांचा वापर होतो.

सायटोकायनिन्स

ही संजीवके विशेषत: वनस्पती पेशी विभाजनासाठी वापरतात. उदा. कायनेटिन

बीज अंकुरणामध्ये बियांची सुप्तावस्था लवकर संपवण्यासाठी यांचा वापर होतो.  वनस्पतीची वृद्धावस्था टाळण्यासाठी हे sanajivak खूपच उपयोगी आहे.  प्रकाश संश्लेषण योग्य प्रकारे होण्यासाठी सायटोकायनिन्स उपयोगी आहेत.

जिब्रेलिन्स

या संजीवकांमध्ये पेशी विभाजनाची व पेशींची लांबी वाढवण्याची क्षमता असते. उदा. जी. ए.1 ते जी. ए.9.

बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी जिब्रेलिन्स गटातील संजीवकांमध्ये, बिया काही काळ भिजत ठेवल्यास बियांची उगवण लवकर व चांगली झालेली दिसते. वनस्पती वाढीचा वेग वाढवणे तसेच बियाविरहित फळ प्राप्त करण्यासाठी जिब्रेलिन्स sanajivak खूपच उपयोगी आहेत.

जी.ए.चा अनावश्यक वापर करू नये. गरज नसताना वापरल्यास पानांचा आकार फार मोठा होतो. फांद्या वाढतात. अनावश्यक वाढीने झाड ठिसूळ होते.

अँबसेसिक एसिड

हे वाढ रोधक संप्रेरक आहे, यामुळे पेशींना वृद्धवस्था येते.  अति प्रखर उन्हात पानगळ करुन बाष्पोच्छवास थांबवुन पाण्याची बचत करण्यासाठी हे sanajivak फायदेशीर आहे.

इथिलीन

हे सुद्धा वाढ रोधक संप्रेरक आहे.  वनस्पतीमधील इतर संप्रेरकांपैकी  फक्त इथिलीन नैसर्गिक स्थितीत वायुरुपात असत. फळांचा परिपक्व होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी (फळे लवकर पिकवण्यासाठी) हे उपयोगी आहे.

क्लोसीन/लिव्होसीन (क्लोरोमेकॉट क्लोराईड)

 क्लोसीन/लिव्होसीन या रसायनाचा उपयोग पिकाच्या कायिक(अवांतर) वाढीचे रूपांतर फळधारणेमध्ये करण्यासाठी करतात. हे sanajivak फवारल्यानंतर पिकाच्या फांद्या, उंची, पाने यांचा आकार व संख्या कमी वाढून, मिळालेल्या अन्नद्रव्याचा वापर हा पाते, फुले लागण्यासाठी  केला जातो. ज्यामुळे पिकाच्या अवास्तव वाढीवर नियंत्रण येते व त्याचा फायदा जास्त फूल, फळधारणेमध्ये होते. वेगवेगळ्या पिकांमध्ये लिव्होसीनचा वापर वेगवेगळ्या प्रकारे व वेगळ्या प्रमाणात होतो.

जसे सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद, मूग या व इतर अनेक पिकांमध्ये क्लोसीन/लिव्होनीसनचा वापर पीक कळी अवस्थेत असताना करावा. त्यानंतर वापरल्यास त्याचे परिणाम दिसत नाहीत.  प्रत्येक पिकांसाठी शिफारशीनुसार प्रमाण वापरावे.

एन.ए.ए (व्यापारी नाव- प्लॅनोफिक्स)

हे एक वनस्पती वाढ नियंत्रक आहे, त्यामध्ये अल्फा नॅफ्थाइल ऍसिटिक ऍसिड 4.5% (w/w) सक्रिय घटक आहे. प्लॅनोफिक्सचा वापर पातेगळ व फूलगळ कमी करण्यासाठी करतात. नैसर्गिक गळ जेव्हा मोठ्या प्रमाणात होते अशा वेळेस याचा वापर (4.5 मिली/पंप किंवा 45 मिली/एकर)  योग्य प्रमाणात करावा. 10 लिटर पाण्यात 5 मिलीपेक्षा जास्त वापरल्यास नुकसानसुद्धा होऊ शकते.  प्लॅनोफिक्सची पहिली फवारणी फुले येण्याच्या वेळी करावी आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 20 ते 25 दिवसांनी गरजेनुसार करावी.

एस्कॉर्बिक ऍसिड (क जीवनसत्त्व)

एस्कॉर्बिक ऍसिड हे प्रभावी प्रति-ऑक्सिडीकारक असल्याने ओझोनसारख्या प्रबळ ऑक्सिडीकारक प्रदूषकांना निष्प्रभ करू शकते. शिवाय प्रकाशसंश्लेषण क्रियेतही मोलाची भूमिका बजावते आणि सल्फर डाय ऑक्साइडसारख्या घातक प्रदूषकांनादेखील निष्प्रभ करते. बियाणांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी तसेच वनस्पतीच्या मुळांच्या वाढीचा वेग वाढविण्यासाठी एस्कॉर्बिक ऍसिड उपयोग होतो.  तसेच यामुळे वनस्पतीचे अतिनील किरणांपासुन पिकाचे संरक्षण होते. फळगळ कमी करण्यासाठी हे Sanajivak उपयोगी आहे. पिकांची रोग व किड प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी  हे फायदेशिर आहे.

स्टिमुलंट

पिकामधील अनेक प्रकारच्या गतिविधी वाढवण्यासाठी व पिकास उत्तेजक प्रेरक म्हणून स्टिमुलंटचा वापर करतात. ज्यामुळे पात्यांच्या व फुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते.  झाडाची सर्वांगीण वाढ जोरात होऊन, पानांचा आकार वाढतो.  झाडाची भूक वाढते आणि या सर्व परिणामांमुळे उत्पादनात वाढ होते. बाजारामध्ये शेकडो प्रकारचे स्टिमुलंट अनेक नावाने उपलब्ध आहेत; पण त्यातील विश्वासपात्र कंपनीने/व्यक्तींनी शिफारस केलेले वापरावे.

स्टिमुलंटचा वापर करताना जमिनीमध्ये ओलावा व अन्नद्रव्ये असावीत याची काळजी घ्यावी.  ओलावा कमी असेल किंवा खतांचा वापर मोजकाच असेल तर स्टिमुलंटचा वापर टाळावा.

नायट्रोबेन्झीन

हे फुलांची संख्या वाढविणारे उत्तेजक आहे. याच्या वापरामुळे पिकांच्या कॅनोपित (गर्द हिरवेपणा /घेरावात) वाढ होते. मादी व उत्पादित फुलांची संख्या वाढुन नर फुलांची संख्या तुलनेने घटते, परिणामी उत्पादनात वाढ होते.

नायट्रोबेंझीन हे त्वचेतून शोषले जाते. तसेच ते श्वसनमार्गाने किंवा पोटात गेल्याने विषबाधा होऊ शकते. नायट्रोबेंझीनच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास कर्करोग होऊ शकतोत्यामुळे याच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे.

ट्राइकंटेनॉल

ट्राइकंटेनॉल हे एक नैसर्गिक वनस्पती वाढ नियामक आहे. याचा उपयोग विशेषतः पीक उत्पादन वाढविण्यासाठी केला जातो. ट्राइकंटेनॉलचा वापर हा पिकाची प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढावी यासाठी करतात.  साधारणतः जेव्हा जास्त दिवस ढगाळ वातावरण असते व प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावून झाडाची वाढ खुंटते,  अशा वेळेस ट्राइकंटेनॉल  फवारल्यास प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये वाढ होते परिणामी  झाडाची झपाट्याने वाढ होते.

ह्युमिक अँसिड

हे एक भुसुधारक आहे. भारी जमिनीमध्ये वापरल्यास जमिनीतील सोडीयम किंवा मँग्नेशिअम व माती या मधील अणु तुटले जातात व जमिन हलकी (भुसभुशीत)  होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची चांगली वाढ होते. याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व हि अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात. बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते. ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते. जमिनीतील ह्युमस शेणखत, सेंद्रिय खते, गांडूळ खत, हिरवळीचे खत याचा वापर करून वाढवता येते. त्यासाठी शक्य तेवढा याचा वापर करावा व गरज भासल्यास ह्युमिक अँसिड वापरावे.

शॉक–अब

हे उत्पादन तणनाशकासोबत फवारण्यासाठी वापरतात. जेव्हा निवडक तणनाशके पिकामध्ये फवारले जातात तेव्हा तण नियंत्रित होते. मात्र, तणनाशकामुळे मुख्य पिकालासुद्धा थोडा शॉक लागतो.  काही ठिकाणी पिकामध्ये पिवळेपणा येतो. कुठे पिकाची वाढ खुंटते, अशा वेळेस मुख्य मुख्य पिकावर तणनाशकाचा परिणाम जास्त जाणवणार नाही यासाठी तणनाशकासोबत  वापरतात.

सप्तधान्यांकुर एक उत्तम नैसर्गिक संजीवक

Sanajivak-शेतीमध्ये संजीवकांचा सावध वापर   
Sanajivak-शेतीमध्ये संजीवकांचा सावध वापर   

सप्तधान्यांकुर अर्क हे एक उत्तम नैसर्गिक संजीवक आहे, याच्या वापरामुळे पिकाची प्रत आणि उत्पन्न वाढते.

हे बनविण्यासाठी आवश्यक साहित्य :

*तीळ, मुग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, गहू प्रत्येकी 100 ग्रॅम

*पाणी  200 लिटर

*गोमुत्र 1 लिटर

Sanajivak तयार करण्याची पध्दत:

1.  प्रथम एका वाटीमध्ये 100 ग्राम तीळ घ्या व ते भिजत ठेवा.

2.  दुसऱ्या दिवशी एका मोठ्या भांड्यामध्ये मुग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, गहू प्रत्येकी 100 ग्रॅम घ्या.

हे सर्व एकत्र मिसळून त्यामध्ये धान्य भिजेल एवढे पाणी टाका.

3.  तिसऱ्या दिवशी धान्य पाण्यातून काढून घ्या आणि एका ओल्या फडक्यात बांधा व मोड येण्यासाठी लटकून ठेवा भिजवलेले पाणी फेकून देऊ नका.

4.  अंदाजे 1सेमी. मोड आल्यानंतर हे सर्व धान्य एकत्रीत बारीक मिश्रण (पेस्ट) करून घ्या.

5.  त्यानंतर 200 लिटर पाणी 1लिटर गोमुत्र,  कडधान्य भिजवलेले पाणी तयार केलेली बारीक पेस्ट  मिसळून घ्या.  गोणपाटाने 4 तास झाकून ठेवा.

6.  4 तासानंतर पुन्हा ढवळून, गाळून घ्या आणि त्याची फवारणी करा.

फवारण्याची वेळ

*पीक 21 ते 35 दिवसाचे असताना.

*फुलकळी अवस्थेत असतांना फवारणी करणे.

*फळ किवा शेंगा लहान असताना.

* दाणे भरत /(दुधावर) असताना, दाणे पोसण्यासाठी.

                                आपल्याला ही माहिती आवडल्यास मित्रांना जरूर शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. धन्यवाद…

1 thought on “Sanajivak-शेतीमध्ये संजीवकांचा सावध वापर       ”

Leave a Comment