Potassium Schoenite- पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय?

                 Potassium Schoenite  (पोटॅशियम शोनाईट)  हे १०० % पाण्यात विरघळणारे (Water Soluble) खत आहे. त्यामुळे  हे जमिनीतून (फेकून/ विस्कटून), ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते.   हे खत म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांचा डबल सल्फेट सॉल्ट आहे. यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत.या खतामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे ऑक्साईड  फॉर्ममध्ये  असते त्यामुळे पिकाला या अन्नघटकासोबतच ऑक्सीजन ची उपलब्धता वाढते. म्हणजेच पिकाच्या वाढ व विकासाला चालना देणारे हे एक आदर्श खत आहे.

Potassium_Schoenite
https://www.marathisheti.in/ Potassium_Schoenite

हे खत पिकाच्या कोणत्या अवस्थेत (कधी)वापरावे?

● पोटॅशमुळे फळे व भाजीपाला पिकांची फुगवण तर होतेच, याशिवाय  पानांचा हिरवा रंग व पर्यायाने त्यांची कार्यक्षमता मॅग्नेशियम मुळे कायम राहते.

● कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणावर गरज लागते, कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये  भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात.

● पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित परिणाम दिसून येतो. उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.

● गंधकामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती व फळांची टिकाऊ क्षमता वाढते तसेच पिकाची पक्वता लवकर व एकसारखी होते.

● जमिनीतील कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम या धनभारित (कॅटायन्स) अन्नद्रव्यांचे परस्पर प्रमाण त्या मातीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी (धन व ऋण आयन यांची देवाण- घेवाण करण्याची क्षमता) ठरवण्यासाठी Potassium Schoenite कारणीभूत ठरते.

● पोटॅशियम शोनाईटमध्ये  पोटॅशियम व मॅग्नेशियम ही अन्नद्रव्ये असल्याने, मुळांच्या कक्षेतील कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुधारते. त्यामुळे  मुळांच्या टप्यातील अन्नद्रव्ये जास्तीत जास्त प्रमाणात मुळांकडून शोषून घेतली जातात.

https://www.marathisheti.in/ Potassium_Schoenite
https://www.marathisheti.in/ Potassium_Schoenite

Potassium Schoenite वापरण्याची पद्धत व फायदे:

● ऊस पिकासाठी देत असल्यास लागणीनंतर ६ महिन्यांनी,  भाजीपाला पिकांसाठी फळवाढ व तोडयाच्या काळात, फळ पिकांसाठी फळवाढीच्या काळात, कांद्यासाठी रोपे लागणीनंतर २ ते २.५ महिन्यांनी, बटाटयासाठी भर देताना व आले-हळदीसाठी पाचव्या महिन्यानंतर वापरावे किंवा या काळात दर १२ ते १५ दिवसांनी २-३ फवारण्या कराव्यात.

● पोटॅशियम शोनाईटमुळे पिकाला वातावरणाशी अनुकूलन साधण्यास मदत होते. म्हणजेच पिकावर पाण्याचा ताण येत नाही. हिवाळ्यात थंडीचा फारसा परिणाम होत नाही एकंदरीत पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

वापरण्याचे प्रमाण :

जमिनीतून – फळे व भाजीपाला पिकांसाठी फळांचे सेटिंग झाल्यावर एकरी २५ किलो एकदा द्यावे.

ड्रीपमधून – फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोड्याच्या काळात एकरी ३ ते ५ किलो दर आठवडयाला ४ ते ५ वेळा सोडावे.

फवारणीतून –फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोडयाच्या काळात एकरी १ किलो फवारणीसाठी वापरावे.

कोणकोणत्या पिकामध्ये शेतकरी वापरू शकतात?                                        

फर्टिगेशनसाठी:  ऊस, आले, हळद,  कांदा,  द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती.

पानांवरील फवारणीसाठी:  सर्व पिकांना वापरता येते परंतु, स्फुरद युक्त खतामध्ये तसेच कॅल्शिअम व सल्फेट सारख्या खतामध्ये मिसळून Potassium Schoenite फवारणी साठी वापरू नये.

            आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कमेंट करा, लेख आवडल्यास शेअर करा…

5 thoughts on “Potassium Schoenite- पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय?”

Leave a Comment