Moringa farming/ Shevga lagwad शेवगा पीक ठरतेय फायदेशीर…

हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेवगा पीक ओळखले जाते. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यामध्ये असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या वनस्पतीचा प्रसार जगभरात झाला आहे. परंतु त्याची Moringa farming/ Shevga lagwad व्यापारी शेती भारत, पाकिस्तान, श्रीलंका व केनिया या देशातच केली जाते. भारतामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात शेवग्याची व्यापारी शेती केली जाते.

Moringa farming/ Shevga lagwad
Moringa farming/ Shevga lagwad

शेवगा हे सर्वांच्या परिचयाचे झाड आहे. भारतात घराभोवती किंवा शेताच्या बांधावर याची लागवड केली जाते. भारतीयांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा आवडीने वापर केला जातो. याशिवाय याच्या पानांची, बियांची पावडर केली जाते. त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. शेवग्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. दमा, मधुमेह या रोगासाठी औषध तयार करताना शेवग्याच्या पानांचा वापर केला जातो. पाणी निर्जंतुक करण्यासाठी शेवग्याच्या बियांची पावडर (1 हजार लिटर पाण्यासाठी 800 ग्रॅम पावडर) वापरण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

दिवसेंदिवस बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेता, आधुनिक तंत्राने शेवग्याची व्यापारी तत्त्वावर लागवड नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

लागवडीसाठी जमीन हवामान

शेवग्याची लागवड हलक्या, माळरान तसेच डोंगर उताराच्या जमिनीवरही करता येते. चोपण जमिनीत Moringa farming/ Shevga lagwad शेवग्याची लागवड करू नये. मातीचा सामू 6 ते 7.5 असावा.

शेवगा पिकाची लागवड उष्ण व समशीतोष्ण अशा दोन्ही हवामानात फायदेशीर ठरते. 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान पिकाच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते.

सुधारित जाती

1. जाफना

याला देशी शेवगा म्हणून ओळखतात. हा स्थानिक व लोकल वाण आहे. याच्या शेंगा चवदार असतात. या वाणाला वर्षातून एकदा म्हणजे फेब्रुवारीत फुले येतात आणि मार्च, एप्रिल, मे मध्ये शेंगा लागतात. एका झाडापासून 150 ते 200 शेंगा मिळतात.

2. रोहित-1

या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे लागवडीपासून 6 महिन्यात उत्पन्न सुरू होते. शेंगा सरळ, गोल व मध्यम लांबीच्या असतात. शेंगांचा रंग गर्द हिरवा असून चवीला गोड असतात. त्यामुळे निर्यातीतून (एक्सपोर्ट) भरपूर फायदा होतो.

3. कोकण रुचिरा

कोकण भागासाठी शिफारशीत केलेला हा वाण आहे. शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असतात. या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात. मध्यम साईजमुळे वजन कमी भरते.

4. पी. के. एम.-1

तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा वाण आहे. रोप लावणी नंतर 6 महिन्यात शेंगा सुरू होतात. महाराष्ट्रात या वाणाला वर्षातून दोनदा शेंगा येतात. शेंगा वजनदार व चविष्ट असतात.

5. पी. के. एम.-2

तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा वाण महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय होत आहे. शेवगा शेतीत या वाणाने क्रांती केली आहे. या वाणाच्या शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. लांब, वजनदार शेंगा यामुळे सर्वोत्तम बाजारभाव मिळतो. या वाणात एका देठावर 4 ते 5 शेंगांचा झुपका येतो हे या जातीचे वैशिष्ट्य आहे. या वाणाची परदेशात निर्यात केली जाते.

या वाणाखेरीज महाराष्ट्रात भाग्या, ओडिसी, प्रकाश-1, दत्त शेवगा कोल्हापूर, शबनम शेवगा, जे के व्ही- 1,3, कोईमतुर-1,2 या वाणाचीही लागवड केली जाते. मात्र 80 टक्के लागवड ही पी. के. एम.-2 ची आहे.

WhatsApp Image 2025 02 27 at 2.03.57 PM
Moringa farming/ Shevga lagwad

Moringa farming/ Shevga lagwad लागवड पद्धती

या पिकाची लागवड बियापासून तसेच काड्यापासून केली जाते. पिशवीत बी लावण्यापूर्वी गाळ, माती, पूर्ण कुजलेले शेणखत किंवा निंबोळी पेंड याचा वापर करून 2 सेमी. खोलीवर बी लावावे. बी लागवडीनंतर साधारणतः 25-30 दिवसात रोप पुनःलागवडीसाठी तयार होते. लागवडीसाठी 2 बाय 2 बाय 1.5 फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात चांगले कुजलेले शेणखत 2 घमेली/पाट्या, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 ग्रॅम फोरेट टाकून हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा, आळे तयार करून घ्यावे व चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्ड्यात एक रोप लावावे.

शेवगा पिकाची लागवड पाऊस पडल्यानंतर करावी. पाण्याची उपलब्धता असेल तर जून पासून जानेवारी पर्यंत केव्हाही केली तरी चालते.

शेवगा लागवड हलक्या जमिनीत 10 बाय 10 फूट अंतरावर करावी. एकरी 435 झाडे बसतात.

मध्यम व भारी जमिनीत 12 बाय 6 अंतरावर लागवड करावी. एकरी 600 झाडे बसतात.

छाटणी

शेवगा लागवडीनंतर साधारण 70 ते 75 दिवसांनी म्हणजेच झाडाची उंची 4 फूट झाल्यानंतर त्याचा वाढणारा शेंडा खुडावा. अशा पद्धतीने 3 फुटावरील सर्व भाग छाटून टाकल्यामुळे भरपूर फाटे/फांद्या फुटतात. झाडाची उंची मर्यादित राहते. नवीन येणाऱ्या फांद्यापासून अधिक शेंगाचे उत्पन्न मिळते. एका झाडाला 6 ते 10 फांद्या ठेवणे फायदेशीर ठरते. त्यामुळे झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे होते.

त्यानंतर पुढे दर दोन वर्षांनी एप्रिल-मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी, जेणेकरून झाड नियमित उत्पादन देईल.

खत व्यवस्थापन

शेवगा हे पिक कोठेही, कसेही आणि कोणत्याही जमिनीत येते, त्याला खत पाणी नसले तरी चालते हा समज चुकीचा आहे. शेवग्याची वाढ आणि उत्पादन हे केवळ जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्न घटकावर अवलंबून असले तरी, शेवग्याची शेती फायदेशीर ठरावी, यासाठी समतोल खत व्यवस्थापन आवश्यक आहे.

शेवग्याला दर 3 महिन्यांनी थोडी थोडी रासायनिक खते द्यावीत. लागवडीनंतर पहिल्या 3 महिन्यांनी प्रत्येक झाडास 100 ग्रॅम डीएपी हे खत द्यावे. पुढच्या 3 महिन्यांनी 10:26:26 हे खत 150 ग्रॅम द्यावे. याप्रमाणे झाडाचे वय जसजसे वाढत जाईल तसतसे खत मात्रेत प्रतिवर्षी 50 ग्रॅमने वाढ करावी. वर्षातून एकदा शेणखत किंवा लेंडी खत छाटणीनंतर साधारण जूनमध्ये द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतात मिसळून द्यावीत.

खते देताना गोलाकार आळे पद्धत किंवा झाडाजवळ 15 ते 20 सेमी अंतरावर पहारीने खते दिल्यास ती जास्त परिणामकारक ठरतात.

पाण्याचे नियोजन

शेवगा हे पीक कोरडवाहू असले तरी त्याला थोडेफार पाणी हे लागतेच. Moringa farming/ Shevga lagwad लागवडीच्या सुरुवातीस एक वर्षापर्यंत पाण्याचे व्यवस्थापन नियमित ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर जमिनीच्या मगदूरानुसार महिन्यातून एकदा पाणी दिले तरी चालते. सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर देखील करता येतो.

कीड रोग व्यवस्थापन

शेवग्याच्या झाडावर फारसा रोग व  किड आढळून येत नाही.

मात्र पावसाळ्यात पाने खाणारी अळी किंवा जाळे तयार करणारा कोळी पिकाचे नुकसान करतो. त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही एक कीटकनाशक शिफारशीत  मात्रेत फवारावे.(जसे की हमला 15 लिटर पाण्यात 30 मिली.)

फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास इमामेक्टिन बेंजोएट किंवा स्पिनोसॅड 45 एस.सी. यांची शिफारशीत मात्रेत फवारणी करावी.

करपा रोगामुळे पानावर काळे डाग पडल्यास कार्बेन्डाझिम किंवा मॅनकोझेब या औषधाची फवारणी करून नियंत्रण ठेवावे.

काढणी आणि उत्पादन

Moringa farming/ Shevga lagwad शेवग्याची लागवड केल्यापासून 6 महिन्यानंतर शेंगा लागतात. लागवडीनंतर पहिल्या 6 महिन्यात प्रत्येक झाडापासून सरासरी 3 ते 7 किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी 15 ते 20 किलो शेंगा मिळतात व पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे उत्पन्नात वाढ होते.

शेवग्याची शेंग रसरशीत असतानाच तोडणी करावी खूप टणक झाल्यास शेंगेची चव कमी होते, तसेच बाजारमूल्यही घटते.

ताजेपणा टिकवण्यासाठी शेंगा ओल्या गोणीत गुंडाळून विक्रीसाठी पाठवाव्यात.

एका झाडापासून वर्षाला 50 किलोपर्यंत शेंगा मिळतात.

आपल्याला ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा.

Leave a Comment