kanda lagvad कांदा लागवड  तंत्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण नियोजन

कांद्याशिवाय स्वयंपाकघर!  आपण  कल्पनाच करू शकत नाही इतका कांदा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा रोजच वापर केला जातो.  यावरूनच आपल्याला कळेल कांद्याला किती मागणी आहे आणि ही मागणी कायम वाढतच राहणार. घरोघरी, हॉटेल,  मोठमोठे रेस्टॉरंट इतकेच काय रस्त्याकडेची वडापावची गाडी यांच्याकडून नेहमीच कांद्याला मागणी असते. रोजच्या आहारातील भाज्या बनवताना कांदा हा लागतोच. अजूनही ग्रामीण भागात जेवायला बसले की कांदा फोडला जातो. असा हा कांदा कधी सोन्याच्या भावाने, तर कधी मातीमोल भावाने विकावा लागतो. प्रत्येक वेळची याची कारणे वेगवेगळी असू शकतील. पण कष्टाच्या जोरावर मातीतून सोने उगवणारा माझा शेतकरी राजा यामुळे डगमगत नाही किंवा उतमातही करत नाही.

          चला तर मग आपण या पिकाचे योग्य नियोजन करून अधिक उत्पादन कसे घ्यायचे?  kanda lagvad याविषयीची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.

kanda lagvad

हवामान:

महाराष्ट्रातील हवामान कांदा पिकासाठी वर्षभर अनुकूल असते त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये खरीप,  रब्बी आणि उन्हाळी अशा सर्वच हंगामात कांदा पिकवला जातो.  हवामानाचा विचार केला तर या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी थंड आणि कोरडे हवामान उपयुक्त असते.

kanda lagvad कांदा लागवडीचा हंगाम:

खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी, आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात कांद्याची लागवड केली जाते.

जमीन आणि पूर्व मशागत:

या पिकासाठी चांगली भुसभुशीत तसेच मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते.

जमीन जितकी भुसभुशीत असेल त्या प्रमाणात कांद्याची फुगवन चांगली होईल.  यासाठी उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी. कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीतील ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर आपल्या सोयीप्रमाणे गादीवाफे  किंवा सरी लागवडीसाठी रान तयार करा.

कांदा बियाणे/ सुधारित वाण:

बियाण्याची निवड करताना जे आपण बियाणं निवडणार ते आपल्या डोळ्यासमोरील असलं पाहिजे म्हणजेच  त्याचे उत्पादन कसं होत हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

खरीप हंगामासाठी- फुले समर्थ, बसवंत 780, ॲग्रीफाउंड डार्क रेड

रब्बी हंगामासाठी- बसवंत 780, फुले समर्थ , एन 2-4-1

उन्हाळी हंगामासाठी- एन 2-4-1,ॲग्रीफाउंड लाईट रेड, अर्का निकेतन

kanda lagvad बियाणे प्रति एकर:

नेहमीच्या पद्धतीमध्ये 3 ते साडेतीन किलो लागते.

ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार करायचे असल्यास एकरी 2 किलो बियाणे पुरते.

कांदा पेरणी:

आपण नेहमीच्या पद्धतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने कांदा पेरणी करू शकतो किंवा रोप लागण करूनही कांद्याची लागवड kanda lagvad केली जाते. पेरणीपूर्वी बियाण्याला बुरशीनाशक (बाविस्टिन) 2 ग्रॅम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा व्हेरीडे 5 मिली प्रति किलो या प्रमाणात लावावे. रोप लागण पद्धतीने कांदा लागवड करायची असल्यास खालील प्रमाणे नियोजन करावे.

कांदा नर्सरी व्यवस्थापन:

आपल्याला जर एक एकर kanda lagvad कांदा लागवड करायची असल्यास रोपवाटिकेसाठी 5 गुंठे जमीन लागते.

4*1मीटर लांबीचे 5 गुंठ्यामध्ये 5 बेड तयार करावेत.

बेडचा पृष्ठभाग (लेवल) सपाट करून 2 बेड मधील अंतर 60 ते 70 सेंटीमीटर ठेवावे.

बेड तयार करत असताना 5 गुंठ्यासाठी 2 किलो युरिया, 7 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 2 किलो पोटॅश हे खत शेणखतातून जमिनीत मिसळून घ्यावे. 20 दिवसानंतर पुन्हा 3 किलो युरिया द्यावा आणि सिंचन करावे.

लागवडीपूर्वी बेडवर बुरशीनाशकाची फवारणी करावी.

बीजप्रक्रिया केलेले बियाणे 2-3  सेंमी. खोलीवर पेरून मातीने झाकावे. बियाणे पेरणीनंतर  पेंडामिथालीन 1.5मिली/लिटर  या तणनाशकाची फवारणी करावी. लगेचच पाणी द्यावे.

साधारण 6 आठवड्यानंतर रोप (पुनर्लागवड साठी) काढायला तयार होतील.

पुनर्लागवड पद्धत / कांदा  रोप लागण:

लागवडी पूर्वी रोपांवर बुरशीनाशक आणि कीडनाशकाची प्रक्रिया करावी.  (बाविस्टिन 1 ग्रॅम + 0.5 मिली कॉन्फिडोर प्रति लिटर पाण्यात घेऊन रोपांची मुळे 15 मिनिटे बुडवून ठेवावीत).  रोपे लावताना अंगठ्याने जास्त दाबू नये त्यामुळे माना वाकड्या होण्याची शक्यता असते. लागवड करताना शेतात पुरेसा वाफसा असावा.

kanda lagvad सरी वरंबा पद्धत:

सरी सोडण्यासाठी पाडण्यासाठी छोट्या सरी यंत्राचा वापर करावा. जेणेकरून जास्त जमीन वरंब्यामध्ये व्यापली जाणार नाही. सरी वरंब्यामध्ये मध्यावर 45 गुणिले 10सेमी. वर सरीत रोप लागवड करावी. सरीच्या वरच्या भागात लावलेला कांदा चांगला पोसतो तर तळातील कांदा लहान राहतो. खरिपात ज्या शेतजमिनीत पाण्याचा निचरा होत नाही अशा शेतात कांदा लागवड ही सरी वरंब्यावर केलेली उत्तम. या पद्धतीने एक एकर क्षेत्रावर ती 1,68,000 इतकी रोपे बसतात.

kanda lagvad सपाट वाफा पद्धत:

ही पद्धत सरी वरंब्यापेक्षा फायदेशीर ठरते. या पद्धतीत चिंगळी कांद्याचे प्रमाण कमी राहते. यामध्ये जमिनीचा उतार बघून 5 ते 6 फूट रुंद 15 फूट लांबीचे वाफे तयार करावेत. जमीन सपाट असेल तर वाफ्याची लांबी आणखी वाढवावी. सपाट वाफ्यामध्ये लागवड नेहमी कोरड्या जमिनीत करावी आणि नंतर पाणी द्यावे. या पद्धतीने रोप लागवड केल्यास एक एकर क्षेत्रावर 2,08,000 इतकी रोपांची संख्या बसते. त्यामुळे उत्पादनात 20 % वाढ दिसून येते.

kanda lagvad रुंद गादीवाफा व ठिबक सिंचन पद्धत:

या पद्धतीने उत्पादित कांद्याचा दर्जा सुधारलेला दिसतो. रुंद गादीवाफ्यावर ठिबक द्वारे पाणी व खत व्यवस्थापन तंत्रामध्ये, 3 फूट रुंदीचे व 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावे लागतात. एका वाफ्यावर एक लॅटरल पसरून घ्यावी दोन ड्रीपरमध्ये 1.5 फूट अंतर ठेवावे. वाफ्यावर ठिबक सिंचन संच चालू करून वापसा येईपर्यंत पाणी द्यावे आणि वापसा आल्यावर 10 * 6 सेमी. अंतरावर लागवड करावी. दोन ओळीतील अंतर 10 सेमी. व दोन रोपातील अंतर 6 सेमी. एवढे ठेवले असता 3.25 फूट रुंदीच्या बेड वरती म्हणजेच एक चौरस मी. क्षेत्रावरती 85 रोपे बसतात म्हणजेच एक एकर क्षेत्रावर सरासरी 3,40,000 इतकी रोपे बसतात व कांदा उत्पादन सरीवरंबा पद्धतीपेक्षा जवळजवळ दुपटीने जास्त मिळते.

kanda lagvad त व्यवस्थापन:

कांद्याच्या रोपांची मुळे ही (तंतुमय) उथळ  असल्यामुळे ती जास्त खोलवर जात नाहीत. त्यामुळे खत व्यवस्थापनात या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लागवडीपूर्वी शेणखत किंवा गांडूळ खत अशा सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खते मिक्स करून दिल्यास या पिकाला चांगला फायदा होतो. रासायनिक खताच्या शिफारसीनुसार कांदा पिकाला एकरी 40 किलो नत्र, 25 किलो स्फुरद व 25 किलो पालाश लागते. यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी द्यावे. राहिलेले नत्र 20 व 45 दिवसांनी विभागून द्यावे. पुनर्लागवडीनंतर वाढीच्या सुरुवातीला तसेच कांदा पूर्ण वाढत असताना (म्हणजेच 2 महिन्यांपर्यंत) नत्राची आवश्‍यकता अधिक असते.

मात्र पूर्ण वाढल्यानंतर नत्राची आवश्‍यकता नसते. पूर्ण वाढल्यानंतर नत्र दिल्यास किंवा उशिरा दिल्यास डेंगळे व जोडकांदा येणे व साठवणीत कांदा सडणे अशा समस्या उद्‍भवतात. बेसल डोस मध्ये 10 किलो मायक्रोनुट्रीएंट आणि 8 किलो सल्फर प्रति एकरी वापरावे. 60 दिवसानंतर कांदा पिकाला कोणतेही वरखत देऊ नये.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज:

कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मँगेनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते. पातीचा रंग करडा, निळसर पडतो.

जस्ताची उणीव भासल्यास पाने जाड होऊन खालील बाजूला वाकतात. अशी लक्षणे दिसताच शिफारशीत खतमात्रेबरोबर झिंक सल्फेट 15 ग्रॅम, मॅंगेनीज सल्फेट 15 ग्रॅम, फेरस सल्फेट 40 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करावी.

कांदा पिकातील रोग, कीड व उपाय:

कांद्यावर मुख्यत्वे करून मावा, तुडतुडे, फुलकिडे  या किडीचा व करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. कांद्यावरील करपा व फुलकिडे यांच्या एकत्रित नियंत्रणासाठी कांदा लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी पहिली व त्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने 4 फवारण्या डायथेन एम-45(30ग्रॅम/15ली.पाणी) किंवा बाविस्टिन(15ग्रॅम/15ली.पाणी) किंवा टेबुकोनाझोल(15मिली./15ली.पाणी)यापैकी एका बुरशीनाशकासोबत फिप्रोनील 25 मिली/15ली.पाणी किंवा थायामेथोक्सम( 25% डब्ल्यूजी)  8 ग्रॅम/15ली.पाणी किंवा प्रोफेनोफोस(50ईसी.) 20मिली/15ली. पाण्यात मिसळून कीटकनाशक आलटून पालटून फवारावे. या फवारणीमध्ये स्टिकर चा जरूर वापर करावा.

कांदा पिकासाठी सिंचन/पाण्याचे नियोजन:

या पिकासाठी पाण्याची गरज ही जमीन, हवामान, हंगाम व लागवडीची पद्धत यावर अवलंबून असते. खरीप हंगामातील कांद्यासाठी 7 ते 8 पाण्याच्या पाळ्या तर रब्बी हंगामातील कांद्यास पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने 5 ते 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचनाचा वापर केला असल्यास एका ठिकाणी संच 2 ते 3 तास चालवावा व नंतर जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी लावावा. दर 6 ते 8 दिवसांनी तुषार सिंचनाने पाणी देता येते.

kanda lagvad तणनियंत्रण:

कांदा लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांनी ऑक्सीफोरोफेन (गोल) 15 मिली 15 लिटर पाणी + टर्गासुपर 25 मिली 15 लिटर पाणी दोन्ही एकत्रित मिसळून पहिली फवारणी व गरजेनुसार तीस दिवसाच्या आत वरील तणनाशकाची दुसरी फवारणी केल्यास तणाचे उत्तम व्यवस्थापन होते.

कांदा पिकासाठी फवारणी:

  1. कांदा पुनर्लागवडीपासून 15 आणि 40 दिवसांनी 19:19:19 या विद्राव्य मिश्रखताची 75 ते 100 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करावी.
  2. लागवडीनंतर 50 दिवसांनी: 13:00:45, 75 ग्रॅम + नायट्रेट कॅल्शियम 75 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करावी.
  3. पुनर्लागवडीपासून 60, 75 दिवसांनी: 00:52:5034, 100 ग्रॅम+ सूक्ष्म अन्नद्रव्ये 30 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे कंदाचा आकार वाढतो. कंद घट्ट होतात.
  4. कंद वाढीची अवस्था (लागवडीनंतर 90 दिवसांनी):  या अवस्थेत 00:00:50 किंवा पोटॅशियम शोनाईट हे खत 100 ग्रॅम+ बोरॉन 20 ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे फवारणी केल्यास कांद्याची फुगवण होते.

FAQ:  वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र.1         कांदा या पिकात सल्फर/गंधक वापरल्यामुळे काय फायदा होतो?

सल्फर/गंधकामुळे कांद्याचा तिखटपणा, वजन वाढते. साठवणीत कांदा जास्त काळ टिकतो. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.

प्र.2  कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे?

100 लिटर पाण्यामध्ये, 1ग्रॅम जिबिरलिक एसिड(GA)  हे द्रावण पिकाला फवारायचे आहे.

प्र.3          कांदा पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे?

कांदा रोपलागवडीनंतर 25 दिवसांनी धानुका वनकिल (क्विज़ालोफॉप एथिल 4% + ऑक्सीफ्लोरफेन 6% ईसी) 40 मिली + चिलेटेड झिंक 15 ग्रॅम/ 15 लिटर पाणी या प्रमाणात तणनाशकाची एकत्रित फवारणी करावी.  

1 thought on “kanda lagvad कांदा लागवड  तंत्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण नियोजन”

Leave a Comment