शेतकर्यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या वर्षी या योजनेअंर्तगत खरीप हंगामासाठी 100 % अनुदानावर ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप’ वितरीत केले जाणार आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकर्यांना आवाहन केले आहे. favarni pump yojana या उपकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता:
- शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
- सदर शेतकऱ्याने यापूर्वी ‘कृषी यांत्रिकीकरण’ योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- यापूर्वी कोणत्याही योजनेमधून फवारणी पंपासाठी अनुदान घेतलेले नसावे.
favarni pump yojana आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. 7/12 उतारा
3. 8-अ दाखला
4. बँक पासबुक
5. मोबाईल क्रमांक(आधार लिंक असलेला)
6. स्वयंघोषणापत्र
7. जातीचा दाखला (लागू असल्यास)
अर्ज कसा करावा:
शेतकरी स्वतः मोबाईल, संगणक, लॅपटॉप वरुन अर्ज करू शकतात. हे शक्य नसेल तर नजीकच्या कोणत्याही ई-सेवा केंद्र मधून सदर योजनेसाठी अर्ज करता येईल. ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावरून या योजनेसाठी अर्ज करु शकतात.
महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. त्यानंतर वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर टाकावा.
यापूर्वी आधार नोंदणी केली असेल तर युजर आयडी व पासवर्ड टाकावा.
त्यानंतर अर्ज करा या पर्यायावर जावे.
त्यानंतर ‘कृषी यांत्रिकीकरण’ पर्याय समोर दिसत असेल त्यावर क्लिक करावे.
आपल्यासमोर मुख्य घटक बाबीवर क्लिक करून तपशील या बाबीवर क्लिक करावे.
त्यानंतर मनुष्यचलित अवजारे या घटकाची निवड करावी.
पुढे पीक संरक्षण अवजारे यामधील ‘बॅटरी स्वयंचलित फवारणी पंप’ हा प्रकार निवडा.
या योजनेसाठीच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि ‘जतन’ या बटणावर क्लिक करा.
शेवटी अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा. आपल्या समोर आलेल्या सर्व सूचना वाचून घ्या आणि ‘ओके’ बटणावर क्लिक करा.
त्यानंतर ‘मेक पेमेंट’ (Make Payment) या बटणावर क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला 23.60 रुपये एवढे शुल्क भरावे लागते.
यासाठी प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावर क्लिक करून पेमेंट करा व पेमेंटच्या पावतीची प्रिंट काढून घ्या.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर आठवड्याला लॉटरी पद्धतीने अर्जाची निवड केली जाणार आहे. यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून घ्या.
तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती (स्टेटस) बघायची असेल तर अर्ज केलेल्या बाबी या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर ‘छाननी अंतर्गत अर्ज’ या पर्यावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील पाहता येईल.
याबाबत अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तेही या योजनेचा लाभ घेतील…
शेतीविषयक आणखी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.