DAP Fertilizer Price: डीएपी खताचे भाव वाढणार नाहीत; शेतकऱ्यांना दिलासा

नवीन वर्षापासून DAP Fertilizer Price डीएपी खताचे भाव वाढणार, अशा बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले होते. पण केंद्र सरकारने अनुदान वाढवल्याने डीएपीचे भाव स्थिर राहणार आहेत. डीएपी खताची 50 किलोची बॅग 1,350/- रुपयांना मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील भाववाढीचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

DAP Fertilizer Price
DAP Fertilizer Price

डीएपी खतांतून पिकांना फॉस्फरस आणि नायट्रोजन मिळते. त्यामुळे पिकांना सुरवातीला वाढीच्या अवस्थेत खूपच फायदा होतो. डीएपीच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करते. देशभरातून वर्षाला किमान 105 ते 110 लाख टन डीएपीचा वापर होतो.

मात्र मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने डीएपी महाग होत आहे. कारण हा कच्चा माल कंपन्यांना आयात करावा लागतो. आंतरराष्ट्रीय खत बाजारात डीएपीच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून भरमसाठ वाढत आहेत. त्याचा परिणाम देशातील दरावरही होत आहे. पण देशात खतांच्या किमतीवर आपल्या सरकारचे नियंत्रण आहे. खत कंपन्या मागील काही महिन्यांपासून डीएपीचे दर वाढविण्याची मागणी करत होत्या. केंद्र सरकारनेही डीएपीचे दर वाढविण्याला परवानगी दिली होती. मात्र खतांवरील अनुदानाचा फेरविचार केला नव्हता. त्यामुळे देशात 1 जानेवारीपासून डीएपीचे भाव वाढतील, असा अंदाज होता.

DAP Fertilizer Price शेतकऱ्यांमध्ये चिंता

शेती पिकासासाठी सतत लागणाऱ्या रासायनिक खतांच्या, वाढणाऱ्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. रासायनिक खतांचा कंपन्याकडून नवीन वर्षात 1 जानेवारीपासून दरवाढ केली जाणार आहे. साधारण या खतांच्या किंमती प्रतिबॅग 150 ते 200 रुपयांनी महागणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा बातम्या गेले काही दिवस आपल्या कानावर येत होत्या.

डीएपीच्या एका बॅगची किंमत 1,350 रुपये होती. पण ही दरवाढ झाली असती तर डीएपी ची किंमत 1,550 रुपये होईल, अशी भीती असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. पण केंद्र सरकारने खतांवरील अनुदान वाढवल्याने डीएपीचे भाव स्थिर राहण्यास मदत होणार आहे. म्हणजेच डीएपीच्या सद्या तरी कोणतीही भावात वाढ होणार नाही.

DAP Fertilizer Price  डीएपी खतावर शेतकऱ्यांना मिळणार विशेष अनुदान

2010 पासूनच पी अँड के खतांवर ‘न्यूट्रीयट बेस सबसिडी’ दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात डीएपी खते मिळतात. केंद्र सरकारने जुलै महिन्यात खरीप आणि रब्बी हंगामासाठी 2024-25 साठी डीएपी खताच्या अनुदानासाठी प्रति मेट्रिक टन 3 हजार 500 रुपयांप्रमाणे अंदाजित 2 हजार 625 कोटी रुपयांची तरतूद केली होती. आता त्याचप्रमाणे देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या काळात पुढील आदेशापर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डीएपी खतांच्या अनुदानासाठीतून DAP Fertilizer Price डीएपीच्या किंमती नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे.

कॅबिनेटने बुधवारी (दि. 1-1-2025) पासून डीएपीसाठी प्रतिटन 3,500/- रुपये विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 3 हजार 850 कोटी रुपयांचे एकरकमी विशेष पॅकेज देण्यात येणार आहे. हे अनुदान पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे.अर्थात हे अनुदान शेतकऱ्यांना नव्हे, तर खत कंपन्यांना दिलं जातं. परंतु या अनुदानामुळे मात्र शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध होते.

कारवाई करणार…

शेतकऱ्यांवर खतांच्या दरवाढीचा बोजा पडू नये यासाठी सरकारने खतांचे अनुदान वाढवले आहे. शेतकऱ्यांकडून एका बॅगसाठी 1,350/- रुपयांपेक्षा जास्त पैसे घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

– अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री

Leave a Comment