एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुधारित योजना Crop insurance scheme लागू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून खरीप हंगामासाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विमा काढण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक व ई-पीक पाहणी या गोष्टी सक्तीच्या आहेत.
ही नवी पिकविमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या कालावधीसाठी राहणार आहे. Crop insurance scheme यामध्ये खरीप हंगामासाठी 2 टक्के रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तर दोन्ही हंगामातील नगदी पिकासाठी 5 टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे.

योजनेचे स्वरूप
विम्याच्या भरपाईसाठी जोखीमस्तर 70 टक्के राहील. अधिसूचित पिकाचे मागील सात वर्षापैकी, सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षे व त्याला गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेत उंबरठा उत्पादन निश्चित केले जाणार आहे.
ही योजना 80 : 110 या सूत्रानुसार राबविली जात आहे. त्यामुळे विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या 110% दायित्व स्वीकारतील. महसूल मंडळात पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मंडलातील सरासरी उत्पादन काढण्यासाठी जिल्हा पातळीवर किमान 24 पीक कापणी प्रयोग होतील. तालुक्याला 16, महसूल मंडळात 10, तर गाव पातळीवर 4 पीक कापणी प्रयोग घेतले जातील. यासाठी 31 जुलै 2025पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. रब्बीसाठी ज्वारीकरीता 30 नोव्हेंबर 2025, गहू, हरभरा, कांद्यासाठी 15 डिसेंबर 2025 तर उन्हाळी भात व भुईमूग यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत राहील. Crop insurance scheme या योजनेमध्ये शेतकऱ्याला सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या किमान 7 दिवस आधी बँकेत अर्ज द्यावा लागणार आहे.
विमाहप्ता भरण्यासाठी तपशील…
*अन्नधान्य व गळीतधान्य पिके
खरीप हंगाम – विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी कमी असेल ते.
रब्बी हंगाम – विमा संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी कमी असेल ते.
*नगदी पिके (कापूस कांदा)
खरीप हंगाम – विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी कमी असेल ते.
रब्बी हंगाम – विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी कमी असेल ते.
विम्याचे कंत्राट घेतलेल्या कंपन्या
*भारतीय कृषी विमा कंपनी
मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोकचेंबर्स,
मरोळ मरोशी रोड, अंधेरी पूर्व,
मुंबई 400059
ई- मेल: pikvima @aicofindia.com
*आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
माणिकचंद आयकॉन, तिसरा मजला, प्लॉट नंबर 246, सी विंग, बंडगार्डन,
पुणे 411001
सुधारित योजनेतील समाविष्ट पिके
*तृणधान्य व कडधान्य पिके
खरीप हंगाम – भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका
रब्बी हंगाम – गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात
*गळीत धान्य पिके
खरीप हंगाम – भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन
रब्बी हंगाम – उन्हाळी भुईमूग
*नगदी पिके
खरीप हंगाम – कापूस, खरीप कांदा
रब्बी हंगाम – रब्बी कांदा
Crop insurance scheme योजनेचे उद्देश:
- नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
- शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
- कृषि क्षेत्रासाठी पतपुरवठ्यात सातत्य राखणे.
- उत्पादनातील जोखीम पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबर अन्नसुरक्षा पिकांचे विविध कारण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ होण्यास मदत होईल.
योजनेचे वैशिष्टे:
Crop insurance scheme योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे वैयक्तिक कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा संकेत स्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
या योजनेत कसे सहभागी व्हावे?
योजनेत सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्र. (AGRISTACK Farmer ID) असणे अनिवार्य असेल आणि पीक विमा नुकसान भरपाईसाठी, ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, 7/12, 8-अ, आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र यांचा समावेश आहे.
प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा. याशिवाय सी.एस.सी. केंद्रावरूनही आपले सरकारच्या मदतीने पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सी.एस.सी. विभागास 40/- रुपये मानधन केंद्र सरका रकडून देण्यात येणार आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत सी.एसी.सी. विभागाला देण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी हप्त्याच्या रकमेव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क सी.एस.सी. केंद्रचालकाला देऊ नये.
कधी मिळेल नुकसान भरपाई?
पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरठा उत्पादना पेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात भरपाई मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी https://pmfby.gov.in/ या वेबसाइटवर किंवा हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 14447 किंवा आपल्या नजीकच्या सीएससी केंद्र, कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
I blog quite often and I really appreciate your content.
Yoour article has really peaked my interest.
I’m going to bookmark your site and keep checking for new details about once per week.
I opted in for yoyr RSS feed too. https://Jobsleed.com/companies/11-winner-casino17/
Thanks for sharing your thoughts. I truly appreciate your efforts and
I am waiting for your further write ups thank you once again.
Hey there just wanted to give you a quick heads up.
The text in your content seem to be running off the screen in Internet explorer.
I’m not sure if this is a format issue or something to do with internet browser compatibility but
I figured I’d post to let you know. The design look great
though! Hope you get the problem fixed soon. Many thanks