सध्या अनेक भागात अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांना पुराने वेढले आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अतिवृष्टी, पावसाची ओढ, प्रतिकुल हवामान, किड किंवा रोग अशा घटनांमुळे पिकांचे नुकसान होत असते. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून, केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री पिक विमा योजना'(PMFBY) सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया भरून आपल्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे. बाकी विम्याचे हप्ते सरकार भरणार आहे. या योजनेनुसार अनेक शेतकऱ्यांनी crop insurance (पीक विमा) भरलेला आहे. परंतु तरीही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहेत. कारण ते आपल्या झालेल्या नुकसानीची तात्काळ तक्रार नोंदवत नाहीत.
विमा कंपनीच्या नियमानुसार पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी त्वरित म्हणजेच 72 तासाच्या आत विमा कंपनीला माहिती द्यावी लागते. त्यानंतर या संबंधित विमा कंपन्या जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतात. आपले प्रतिनिधी पाठवून नुकसानीचे पंचनामे करतात. त्याचा रिपोर्ट जिल्हास्तरीय समितीकडे(DLJC) सादर करतात. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. ही तक्रार विमा कंपनीकडे कशी नोंदवावी? याविषयीची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. विमा कंपनीला मोबाईल वरून,
ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याच्या स्टेप्स/पायऱ्या खालील प्रमाणे आहेत.
1. तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून crop insurance (क्रॉप इन्शुरन्स) हे ॲप डाऊनलोड करा.
2. त्यामधील continue as guest हा पर्याय निवडा.
3. त्यानंतर Crop Loss (पीक नुकसान) हा पर्याय निवडा.
4. यातील ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ या पर्यायावर क्लिक करा.
5. यानंतर तुमच्या मोबाईल (रजिस्टर्ड) नंबर टाका.
6. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो टाका.
7. पुढच्या टप्प्यात हंगाम- खरीप(सध्याचा), वर्ष-2024, कोणत्या योजनेअंतर्गत विमा आहे ती योजना आणि राज्य निवडा.
8. नोंदणीचा स्त्रोत CSC निवडा. यात पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाकून क्लिक करा.
9. ज्या गट क्रमांकामधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची आहे तो गट नंबर निवडा. (कारण प्रत्येक गटासाठी वेगळी माहिती भरून तक्रार करायची आहे. पावती एकच असली तरी गट दोन किंवा जास्त असू शकतात.)
10. पुढे नुकसान नक्की कशामुळे झाले त्या ठिकाणी excess rainfall किंवा inundation(अतिवृष्टी किंवा पूर) हा पर्याय निवडा.
11. घटनेचा दिनांक- ज्या दिवशी नुकसान झाले ती तारीख टाकावी.
12. पीक वाढीचा टप्पा- यामध्ये सध्यातरी standing crop हा पर्याय निवडावा आणि नुकसानीची टक्केवारी टाकावी.
13. नुकसानग्रस्त/बाधीत पिकाचा फोटो काढून सबमिट करा.
14. यानंतर तक्रार यशस्वीरित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा docket id तुम्हाला मिळेल, तो जतन करून ठेवावा. कारण यावरच तुम्हाला crop insurance (पिक विमा) मिळतो.
crop insurance महत्त्वाच्या बाबी:
आपण चालू वर्षाचा crop insurance (पिक विमा) भरलेला असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसानीची तक्रार करताना रोग व कीड यांची पूर्वसूचना देऊ नये अन्यथा अर्ज रद्द होईल.
पीक नुकसानीची पूर्वसूचना(तक्रार) ही 72 तासाच्या आत देणे बंधनकारक आहे.
विमा कंपनीला पूर्वसूचना देण्याच्या पर्यायी पद्धती:
- प्रधानमंत्री पीक विम्याच्या वेबसाईटवरूनही तुम्हाला तक्रार करता येईल.
त्यासाठी तुम्हाला https://pmfby.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर त्यावरील ‘रिपोर्ट क्रॉप लॉस’ या पर्यायावर क्लिक करून कोणत्या इन्शुरन्स कंपनीमध्ये विमा काढला आहे, ती कंपनी निवडावी लागेल. त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या माहितीनुसार सर्व तपशील भरून झाल्यानंतर आपल्याला एक नंबर मिळेल तो जतन(सेव्ह) करून ठेवायचा आहे. कारण तो नंबर म्हणजेच आपल्या तक्रारीची दखल आहे.
- 14447 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुम्ही कंपनीला पूर्वसूचना देऊन crop insurance पीक विम्याचा क्लेम करता येईल. परंतु यामध्ये अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे ‘मोबाईल ॲप’चा पर्याय सुरक्षित आणि सोपा आहे.
आजच्या घडीला अनेक शेतकरी बांधव या अस्मानी संकटात सापडलेले आहेत. तरी अशा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवावी ही अपेक्षा…