control of whitefly: ऊसावरील पांढऱ्या माशीचे नियंत्रण

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा ऊस पिकामध्ये विशेषतः ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत आढळतो. परंतु सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक दिसत आहे. ऊसावरील पांढरी माशी ही किड शेतकऱ्याला नवीन असल्यामुळे शेतकरी तिला लोकरी मावा किंवा पिठ्या ढेकूण संबोधत आहेत. control of whitefly या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. कारण या किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उत्पादनात साधारणतः 25 ते 30 टक्क्यापर्यंत घट होते तर साखर उताऱ्यात 3 ते 4 युनिटने घट होते. या माशीचा प्रादुर्भाव लागवडीच्या ऊसापेक्षा खोडवा उसात अधिक आढळतो.

control of whitefly
control of whitefly

 control of whitefly: किडीची ओळख

महाराष्ट्रात अॅलिरोलोबस बॅरोडेन्सीस या पांढऱ्या माशीच्या प्रजातीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. 

पांढऱ्या माशीचा प्रौढ फिकट पिवळसर असून, पंखाच्या दोन्ही जोड्या पांढऱ्या रंगाच्या असतात. म्हणूनच त्यास पांढरी माशी म्हणून संबोधले जाते.  ही कीड वर्षभरात सुमारे 9 पिढ्या पूर्ण करते.

बाल्यावस्थेत ही कीड सुरुवातीस पिवळसर व नंतर काळसर करड्या रंगाची दिसते. तसेच तिच्या कडेला पांढऱ्या रंगाचे तंतू दिसतात. नंतर संपूर्ण बाल्यावस्था पांढऱ्या चिकट मेणाद्वारे झाकली जाते. तिथेच कोषावस्थेत जाते. प्रौढ मादी कोषातून बाहेर पडण्यासाठी T (टी)आकाराचे सूक्ष्म छिद्र तयार करते.

एकाच पानावर 500 पर्यंत कोष आढळून आले आहेत. पानाची मागची बाजू कोषामुळे पूर्णपणे काळी पडते.

हे ही वाचा: ऊस पिकावरील प्रमुख रोग व किडी आणि त्यांच्या नियंत्रणाचे उपाय.

सद्यस्थितीतील प्रादुर्भावाची कारणे

*शेतामध्ये पाणी साचून राहणे.

*नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त व अवेळी वापर.

*हवेतील जास्त आद्रता व ढगाळ वातावरण या किडीच्या प्रजननास पोषक ठरते.

*खोडव्याचे अयोग्य नियोजन.

नुकसानीचे स्वरूप

*या माशीचे प्रौढ व पिले ऊसाच्या पानातील पेशी मधून रस शोषतात. पिल्ले ही प्रामुख्याने पानाच्या खालच्या बाजूस राहून मोठ्या प्रमाणात रस शोषण करतात.

*या किडीच्या शरीरातून चिकट मधासारखा द्रव बाहेर पडतो, तो पानावर पडून त्यावर बुरशीची वाढ होते. परिणामी ऊसाच्या श्वसन व प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.

*control of whitefly पानांच्या खालच्या भागावर कोष तयार होऊन ती काळसर दिसू लागतात. याचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो व उत्पादनात घट होते.

*विशेषतः रुंद पानांच्या व मऊ प्रकारातील ऊसाच्या वाणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो.

*या किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उत्पादनात साधारणतः 25 ते 30 टक्क्यापर्यंत घट होते, तर साखर उताऱ्यात 3 ते 4 युनिटने घट होते.

control of whitefly: या किडीचे नियंत्रण कसे कराल?

  • रासायनिक खते विशेषतः नत्रयुक्त खते शिफारशीनुसारच वापरावीत.
  • खोडवा ऊसात खतांचा वापर न केल्यास, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. म्हणून खोडवा पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
  • ऊसाच्या शेतात पाणी साचल्यास त्वरित निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
  • पावसाचा ताण पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ राहिल्यास, सिंचनाची व्यवस्था करावी.
  • पांढऱ्या माशीसाठी पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत.
  • ज्या ऊसामध्ये आधीच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, अशा उसाचा खोडवा घेणे टाळावे.
  • शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. त्याकडे पांढऱ्या माशीचे प्रौढ कीटक आकर्षित होऊन चिकटतात, त्यामुळे त्यांची संख्या कमी होते.
  • निंबोळी अर्क (5%) किंवा ॲझाडिराक्टीन(1000 पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी.
  • रासायनिक कीटकनाशकची फवारणी शक्यतो टाळावी. त्याऐवजी मित्र कीटक ऊसाच्या शेतीमध्ये सोडावे.
  • जर प्रादुर्भाव जास्त असेल तर अॅसिफेट(75 एस पी) 20 ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस(40 इसी) 40 मिली किंवा क्विनोलफोस(25 इसी) 30 मिली किंवा डायमेथोएट(30 % प्रवाही) 40 मिलि. प्रति पंप (15 लिटर पाण्यात) फवारणी करावी.

बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या इतर कीटकनाशकांची माहिती कृषी तज्ञांकडून घेऊन त्यांचा वापर करावा.

Leave a Comment