Bhuimug lagvad भुईमूग लागवड सविस्तर माहिती

भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात तेलबियांची एकूण नऊ पिके घेतली जातात. भुईमूग हे अन्नपिक म्हणूनही Bhuimug lagvad लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. हे पीक सूर्यप्रकाशाच्या कालावधीला जरी संवेदनक्षम असले तरी, वेगवेगळ्या हवामानात जुळवून घेऊ शकते.

Bhuimug lagvad
Bhuimug lagvad

जमीन:

भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमिन योग्य असते. अशा प्रकारच्या भुसभुशीत जमिनीत मुळांची वाढ चांगली होऊन, आऱ्या सहजतेने जमिनीत जातात त्यामुळे शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

पूर्वमशागत:

भुईमुगाची मुळे व मुळावरील नत्राच्या गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच भुईमुगाच्या शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत करून घ्यावी. यासाठी जमीन किमान 15 से.मी. खोल नांगरून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात.

पेरणीची वेळ:

खरीप: जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लवकरात लवकर पेरणी करावी.

रब्बी: सप्टेंबर शेवटचा आठवडा ते 15 ऑक्टोबर पर्यंत पेरणी करावी.

उन्हाळी: जानेवारीमध्ये 15 तारखेच्या आसपास किंवा थंडी कमी झाल्याबरोबर 15 फेब्रुवारी पर्यंत पेरणी करावी.

Bhuimug lagvad पेरणीची पद्धत:

भुईमुगाची लागवड ही पेरणी व टोकण पद्धतीने करता येते. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 30 से.मी व दोन रोपातील अंतर 10 से.मी ठेवावे.

रुंद वरंबा पद्धत किंवा गादी वाफा पद्धतीने लागवड करायची असल्यास ट्रॅक्टरच्या सहाय्याने 90 सेंमी. रुंदीचे वाफे तयार करून घ्यावे किंवा पूर्व मशागतीनंतर शेतामध्ये 1.20 मीटर अंतरावर छोट्या नांगराच्या साह्याने 30 सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात त्यामुळे 0.90 मीटर (90 सेंमी.) रुंदीचे गादीवाफे तयार होतात. वाफ्याची उंची 15 ते 20 सेंटीमीटर ठेवावी. रुंद वाफ्यावर दोन ओळीतील अंतर 30 सेमी. व 2 रोपातील अंतर 10 सेमी. ठेवून टोकन पद्धतीने Bhuimug lagvad भुईमुगाची लागवड करावी.

बियाणे:

सुधारीत जाती:

Bhuimug lagvad
Bhuimug lagvad

बियाण्याचे प्रमाण:

शेंगा पेरणीपूर्वी 8 ते 10दिवस अगोदर फोडून घ्याव्यात.  त्यामधील फुटके, किडके, साल निघालेले, बारीक बी निवडून बाजूला काढावेत. सर्वसाधारणपणे एकरी 40 ते 45 किलो बियाणे लागते.

बीजप्रक्रिया:

पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रियेनंतर प्रती 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम व 250 ग्रॅम स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले हे बियाणे सावलीत वाळवावे व लगेच पेरणीसाठी वापरावे.

पाणी व्यवस्थापन:

खरीप: पेरणीनंतर 60 ते 70 दिवसाच्या काळात जर पावसाचा खंड पडला तर पीकाच पाणी द्यावे.

रब्बी: जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याच्या 8 ते 10 पाळ्या लागू शकतात.

उन्हाळी: पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. संपूर्ण उगवण झाल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे नियोजन करावे. पाण्याच्या तिसऱ्या पाळीच्या दरम्यान पीक फुलोऱ्यात येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा, यामुळे पिकाला भरघोस फुले येण्यास मदत होते. पुढे शेंगा पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

भुईमूग खत नियोजन:

पूर्व मशागत करत असताना शेवटच्या कुळवणीच्या अगोदर एकरी 4 टन म्हणजेच किमान 5 ते 7 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीच्या वेळी 20 ते 22 किलो युरिया आणि 120 ते 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 100 किलो जीप्सम द्यावे.  कॅल्शियम व गंधक हे भुईमुगासाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्य आहेत. जिप्सम मध्ये 24% कॅल्शियम व 18% गंधक असते. आऱ्या सुटताना 100 किलो जिप्सम दिल्यास उत्पादनात वाढ होते.

Bhuimug lagvad तण व्यवस्थापन :

पेरणीनंतर 48 तासांच्या आत स्टॅम्प किंवा गोलपैकी कोणतेही एक तणनाशक शिफारशीत मात्रेने जमिनीवर फवारावे.  

त्यानंतर जर उभ्या पिकात वापरायचे असल्यास, तण 1-2 इंचाचे असताना इमॅझिथायपर (परस्यूट) 250 मिली प्रतिएकर जमिनीत ओल असताना  वापरावे.

आंतर मशागत

पेरणीनंतर नांग्या आढळून आल्यास (डाले पडल्यास)बी टोकून  ते ताबडतोब भरावेत. 10 ते 12 दिवसांच्या अंतराने  2 ते 3 कोळपण्या कराव्यात व 2 खुरपण्या (निंदण्या) द्याव्या.  शेवटची कोळपणी थोडी खोल करावी त्यामुळे पिकास मातीची भर लागते. भुईमूगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर कोणतीही आंतरमशागत करू नये.

पीक संरक्षण/कीड व रोग नियंत्रण:

भुईमुगावरील रोग:

भुईमूग या पिकावर प्रामुख्याने मूळकुजव्या,  टिक्का, तांबेरा आणि शेंडा कुजव्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली असल्यास या रोगाचे बऱ्यापैकी नियंत्रण होते. नंतर वाढीच्या अवस्थेत टिक्का व तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास 250ग्रॅम कार्बेन्डीझम 200लिटर पाण्यातून फवारावे.  तसेच एम -45, साफ,रोको, टील्ट या बुरशीनाशकांचाही सल्ल्यानुसार वापर करावा.

भुईमुगावरील किडी:

प्रामुख्याने भुईमुगावर मावा, फुलकिडे, तुडतुडे, रस शोषक किडी, पाने खाणारी आणि पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रादुर्भाव होत असतो.

मावा, तुडतुडे, फुलकिडे व रस शोषक किडी यांचा प्रादुर्भाव दिसतात 5 टक्के निंबोळी अर्काची 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन, क्विनॉलफोस अशा कीटकनाशकांच्या शिफारशीनुसार फवारण्या कराव्यात.

भुईमुगावरील फवारणी वेळापत्रक:

(खाली दिलेले प्रमाण हे 15 लिटरच्या पंपासाठी आहे)

फवारणी- 1 (पेरणीनंतर 12 ते 15 दिवसांनी)

19:19:19— 40 ग्रॅम

सिविड एक्स्ट्रॅक्ट—15 ग्रॅम

नीम तेल— 30मिली

या फवारणीमुळे पिकाची शाखीय वाढ होईल तसेच अन्न तयार करण्याची क्षमता वाढेल.

रसशोषक किडींचे नियंत्रण होईल.

फवारणी- 2  (पहिल्या फवारणीच्या 15 दिवसानंतर)

बोरॉन(20%)— 15 ग्रॅम

चीले. मायक्रोनुट्रिएंट— 15 ग्रॅम

साफ(कार्बेन्डीझम +मॅन्कोझेब)— 30 ग्रॅम

हमला(कलोरो+सायपर)— 30मिली

यामुळे पिकाला काळोखी येईल. अळी व टिक्का रोगाचे नियंत्रण होते.

फवारणी- 3 ( फुलोरा अवस्थेत)

00:52:34— 75 ग्रॅम

चीले. मायक्रोनुट्रिएंट— 15 ग्रॅम

टील्ट— 15मिली

या फवारणीमुळे मुळांची चांगली वाढ होईल फुलांची संख्या वाढेल टिक्का व तांबेरा रोगाचे नियंत्रण होईल.

फवारणी- 4 (शेंगा पोसताना)

00:00:50 किंवा पोटॅशियम शोनाईट— 75 ग्रॅम

बोरॉन(20%)— 15 ग्रॅम

प्रॉक्लेम (इमा. बेन्झोयट)— 8ग्रॅम

  • *फवारणी ही जमिनीत ओल असताना वापसा अवस्थेत करावी.
  • *आपल्या कृषी सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच औषध व पाणी यांचे योग्य प्रमाण घेऊन फवारणी करावी.
  • *फवारणी ही शक्यतो सकाळी 11च्याआत व संध्याकाळी 4 नंतर करावी.

उत्पादनाची काढणी साठवण:

भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगांची टरफले टणक बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवून पोत्यात भरून ठेवाव्यात.

आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर, खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.

लेख आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.🙏

3 thoughts on “Bhuimug lagvad भुईमूग लागवड सविस्तर माहिती”

  1. खुप छान माहितीआणि शास्त्रिय माहिती दिली आहे.असे माहितीपर ब्लॉगचे लेखन करावे ही सदिच्छा!

Leave a Comment