Bhendi lagwad भेंडी उत्पादनाचे तंत्र

भेंडी हे कमी कालावधीत, अधिक उत्पन्न देणारे महत्त्वाचे भाजीपाला पीक  आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्य भेंडी लागवड Bhendi lagwad वर्षभर केली जाते. स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठेत  भेंडीला  मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निर्यातीसाठी भेंडीला वर्षभर मागणी असते. उन्हाळी हंगामात निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन सहज घेता येते.

Bhendi lagwad
Bhendi lagwad

मात्र वातावरणात सतत होणाऱ्या प्रतिकूल बदलामुळे भेंडी पिकाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता कमी येत आहे. भेंडीच्या उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी शास्त्रीय पद्धतीने भेंडी लागवडीसाठी कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

जमीन व हवामान :

  • भेंडीचे पीक हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.
  • भेंडी पिकाला उष्ण, दमट हवामान चांगले मानवते. 25° ते 35° सेल्सिअस तापमानात वाढ चांगली होते.
  • भेंडीला जास्त थंडी सहन होत नाही.  20 अंशापेक्षा कमी तापमानात उगवण क्षमता कमी होते.
  • तसेच जास्त तापमान आणि कमी आर्द्रता काळात पिकाची वाढ थांबते.
  • 42 अंशापेक्षा अधिक तापमानात फुलगळ वाढून उत्पादन कमी होते.
  • समशितोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान  असल्यास वर्षभर भेंडीची लागवड करता येते.
  • दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

लागवडीचा हंगाम :

खरीप:  जून  – जुलै

रब्बी : थंडी सुरु  होण्यापूर्वी

उन्हाळी : 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान करावी.

भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते.

Bhendi lagwad लागवड :

  • शेत जमिनीची चांगली नांगरणी करावी. त्यानंतर 2-3 कुळवणी करून जमीन भुसभुशीत करावी.  एकरी  10 टन शेणखत टाकून घ्यावे.
  • सरी आणि वरंबा किंवा सपाट जमिनीवर लागवड करावी. चांगल्या वाढीसाठी व अधिक उत्पादनाकरिता निंबोळी पेंड किंवा कोंबडी खताचा वापर करावा.
  • खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर 45-60 सेंमी ठेवावे.  उन्हाळ्यात 30-45 सेंमी ठेवावे.  दोन  रोपांमध्ये 15-20 सेंमी अंतर राहील, अशा हिशोबाने बी टोकावे. जमिनीचा पोत बघून अंतर कमी-जास्त करावे.
  • बिया 2 ते 3 सेमी खोलीवर पेरल्या पाहिजेत आणि मातीने झाकल्या पाहिजेत. उगवण चांगली होण्यासाठी पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे.
  • प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास जमिनीमध्ये ओलावा टिकवून राहतो. भेंडी पिकाची वाढ व उत्पादनामध्ये वाढ होते.
  • आच्छादनामुळे अधिक प्रमाणात फुलांची संख्या, उत्कृष्ट प्रकारे फळधारणा, जास्तीचे फुटवे आणि फळांचे वजन वाढून उत्पादनामध्ये वाढ होते.

सुधारित जाती :

भेंडी पिकासाठी वाणाची निवड करताना वाणाचे उत्पादन, वाणाचा परिपक्व कालावधी, कीड व रोगास प्रतिकारक्षम, बाजारपेठेतील मागणी या बाबींचा विचार करून भेंडीच्या वाणाची निवड करावी.

अधिक उत्पादनासाठी कृषी विद्यापीठाने अंकुर 40, महिको 10, सिलेक्शन 2-2,फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय, पंजाब-7, वर्षा उपहार, परभणी भेंडी, फुले विमुक्ता, पुसा सावनी, कामिनी, पुसा मखमाली, राधिका या सुधारित जातीची शिफारस केली आहे.

Bhendi lagwad बियाणे प्रमाण :

लागवडीसाठी एकरी 4 ते 6 किलो बियाणे लागते. लागवडीचे अंतर, बियाणे उगवणक्षमता आणि हंगामानुसार बियाणे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.

पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्यात भिजवून, नंतर बियाणे काढून सावलीत कोरडे करून पेरणी करावी.

आंतरमशागत :   

साधारणतः 2 ते 3 आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. एकरी 28 ते 30 हजार रोपांची संख्या ठेवावी.

सरी वरंबा पद्धत मध्ये पिकाला मातीची भर देऊन घ्यावी.

गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करून तण काढावे.

तणनाशकाचा वापर करूनही तणाचे नियंत्रण करता येते.

बासालींन तणनाशक 800 मिली, 200 लिटर पाण्यातून पेरणीपूर्वी फवारावे. तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. तणनाशकाचा फावरणीनंतर 7 दिवसांनी पेरणी करावी.

खत  व्यवस्थापन :

  • भेंडीच्या पिकाला एकरी 10टन चांगले कुजलेले शेणखत, 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे.
  • नत्र वाढीच्या अवस्थेनुसार विभागून द्यावा (लागवडीनंतर 30 ते 60 दिवसांनी).
  • फवारणी व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
  • भेंडी पीक फुलोऱ्यात असताना 2% युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर 10-15 दिवसांनी दुसरी एक फवारणी करावीयामुळे पीक उत्पादनात वाढ होते. 

पाणी व्यवस्थापन :

  • हवामानाची परिस्थिती आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन पिकाला ठराविक अंतराने पाणी द्यावे. सर्वसाधारणपणे, भेंडीला वाढीच्या सुरुवातीच्या काळात दर 5 ते 7 दिवसांनी एकदा आणि फळधारणेच्या अवस्थेत दर 3 ते 4 दिवसांनी एकदा पाणी द्यावे.
  • भेंडी पिकाला ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. ठिबक सिंचनमुळे पानावरील रोग आणि तणांच्या वाढीस प्रतिबंध होतो, कारण पाणी थेट झाडांच्या मुळापर्यंत पोहोचते. त्यामधून खतव्यवस्थापन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करता येतो. विशेषतः उन्हाळी भेंडीसाठी ही सिंचन पद्धती खूपच फायदेशीर ठरते.

कीड-रोगाचे नियंत्रण :

Bhendi lagwad
Bhendi lagwad

भेंडी पिकावर भुरी रोग, हळद्या रोग (यलो व्हेन मोझॅक), पानांवरील ठिपके, तुडतुतुडे,  मावा, पांढरी माशी , शेंडा व फळे पोखरणारी अळी, मावा या प्रकारच्या कीडरोगाचा प्रादुर्भाव  होण्याची शक्यता असते. 

त्यामुळे पिकाचे वेळच्या वेळी निरीक्षण करून कीड-रोगाची लक्षणे दिसून आल्यास कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली  तातडीने उपाय योजना कराव्यात.

रासायनिक कीटकनाशके आवश्यक तेव्हाच वापरावीत.

प्रकाश सापळा किंवा गंध सापळ्याचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

Bhendi lagwad काढणी :

भेंडी 4 ते 6 इंच लांब आणि कोमल असतात तेव्हा भेंडीची कापणी केली जाते. जास्त पिकलेल्या भेंड्या कडक आणि तंतुमय बनू शकतात, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता कमी होते. ताज्या उत्पादनाचा सतत पुरवठा  करण्यासाठी शेतकऱ्यांनी दर 2 ते 3 दिवसांनी वारंवार भेंडीची कापणी करावी.

धारदार चाकू किंवा कात्री वापरून भेंड्या काळजीपूर्वक कापल्या पाहिजेत.  झाडाला किंवा इतर भेंडीना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कापणी केलेल्या भेंडीचा ताजेपणा आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ताबडतोब वर्गीकरण, प्रतवारी (त्यामधील रोगट व कुरूप फळे काढून टाकावी) आणि योग्य पॅकेजिंग सामग्रीमध्ये पॅक करावे.

भेंडीच्या जातीनुसार एकरी120 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते.

हे ही वाचा.

वांगी पिकाचे भरघोस उत्पादन

Leave a Comment