बाजरी हे खरीप व रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. हे पाण्याचा ताण सहन करणारे व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे.
खालील सुधारित तंत्राचा वापर केल्यास बाजरी Bajari lagwad या पिकाचे भरपूर उत्पादन आपण मिळवू शकतो.
Bajari lagwad जमीन
उन्हाळी बाजरीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलकी ते मध्यम जमीन निवडावी जमिनीचा सामू (pH) हा 6.2 ते 7.7 असावा.
पूर्व मशागत
शेतजमिनीची लोखंडी नांगराने 15 सेंटीमीटर पर्यंत खोल नांगरट करावी व जमीन उन्हात तापू द्यावी. जमीन चांगली तापल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचे अवशेष काडी-कचरा, काशा-कुंदा वेचून शेत स्वच्छ करावे. दुसऱ्या कुळवणीपूर्वी एकरी 2 टन शेणखत किंवा 1 टन गांडूळ खत शेतात पसरावे म्हणजे कुळवणी बरोबर ते जमिनीत समप्रमाणात मिसळले जाईल.
पेरणीची वेळ
उन्हाळी बाजरीची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान केल्यास अधिक उत्पादन मिळते. जानेवारी महिन्यात तापमान 10° c पेक्षा खाली गेलेले असल्यामुळे त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो, अशा परिस्थितीत पेरणी, थंडी कमी झाल्यावर Bajari lagwad करावी. मात्र उन्हाळी बाजरीची लागवड 10 फेब्रुवारी नंतर करू नये, कारण उष्ण हवामानात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी कमी उत्पन्न मिळते.
बियाणे आणि बीज प्रक्रिया
पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो चांगले, निरोगी बियाणे वापरावे. अरगट आणि गोसावी(केवडा) रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे.
1. 20% मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया (अरगट रोगासाठी) करावी-
बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास, पेरणीपूर्वी बियाण्यास 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 2 किलो मिठ विरघळावे.
2. मेटॅलॅक्झील 35 एसडी याची बीजप्रक्रिया (गोसावी/केवडा रोगासाठी)-
पेरणीपूर्वी बियाण्यास 6 ग्रॅम मेटॅलॅक्झील 35 एसडी प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
3. अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया-
साधारण 25 ग्रॅम अझोस्पिरीलम प्रति किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. त्यामुळे 20 ते 25 % नत्र खताची बचत होऊन, उत्पादनात 10 % वाढ होते.
तसेच स्फुरद विरघळविणा-या जिवाणूची 25 गॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
Bajari lagwad सुधारित व संकरित जाती
उन्हाळी हंगामासाठी बाजरीच्या खालील सुधारित व संकरित वाणांची पेरणी करावी.
जी.एचबी. 558, प्रो ऍग्रो 9444, 86एम.13, 86एम.64, 86एम.66, एन.एम.एच.73, एन.एम.एच.75, आय.सी.एम.व्ही.221, आय.सी.टी.पी.8303 लोह 10.2,बि.जी.बी.एच 222(पांढरी), शबरी, निर्मल 5286, नाथ सीड-1717, डी.बी.एच.739 (धन्या सीड), के.एस.बी.एच.66 (मुरली), बाजरा-2240 (महिको), एच.टी.बी.एच.42 42 (हायटेक), 86एम74 (पायोनीर).
पेरणीची पद्धत
पेरणीपूर्वी शेताला पाणी देऊन वापसा आल्यावर पेरणी करावी. जमिनीच्या उतारानुसार 5 ते 7 मीटर लांबीचे व 3 ते 4 मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत. Bajari lagwad पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी व दोन ओळीतील अंतर 45 सेंटिमीटर आणि दोन रोपांमधील अंतर 15 सेंटीमीटर ठेवावे.
बियाणे तीन ते चार सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर पेरू नये.
रासायनिक खतमात्रा
माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खते द्यावीत. मध्यम जमिनीसाठी हेक्टरी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश.
हलक्या जमिनीसाठी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश असे खत नियोजन करावे.
पेरणीचे वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. त्यानंतर 25 ते 30 दिवसांनी उरलेले अर्धे नत्र द्यावे. झिंकची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी 20 किलो झिंक सल्फेट पेरणी करताना द्यावे.
रोपांची विरळणी
अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी रोपांची संख्या मर्यादित असावी. त्यासाठी पेरणीनंतर 20 दिवसांनी विरळणी करावी. दोन रोपातील अंतर साधारण 10-15 सेंटीमीटर ठेवावे.
उगवण विरळ झाल्यास उगवणीनंतर 7 ते 8 दिवसांनी नांगे भरून घ्यावे.
तण नियंत्रण व आंतरमशागत
पेरणी केल्यापासून सुरुवातीचे किमान 30 दिवस शेत तणविरहित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण याच कालावधीत पीक व तण यांच्यात स्पर्धा होत असते. तन नियंत्रणासाठी ॲट्राझीन या तण नाशकाची 400 ग्रॅम प्रति एकर, पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी जमिनीवर दाट फवारणी करावी.
तसेच तणांचा बंदोबस्त करण्यासाठी दोन वेळा कोळपण्या आणि गरजेनुसार खुरपणी करावी.
पाणी व्यवस्थापन
पेरणीनंतर चार दिवसांनी शेताला हलके पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या 5 ते 6 पाळ्या द्याव्यात.
पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी.
दुसरे पाणी पीक पोटरीत असताना 35 ते 45 दिवसांनी.
तिसरे पाणी दाणे भरतेवेळी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
किड नियंत्रण
कीड
बाजरी पिकातील किडीचे नियंत्रणाबाबत बरेचदा दुर्लक्ष केले जाते. या पिकावर केसाळ अळी, खोडकिडा, सोसे अथवा हिंगे, टोळ या किडीचा प्रादुर्भाव होतो. यामुळे 50 ते 60 टक्के उत्पन्न घटू शकते. त्यासाठी योग्य वेळी नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे.
रोग
बाजरी पिकावर प्रामुख्याने गोसावी (केवडा), अरगट, काजळी, करपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.
आपल्या कृषीतज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशक व बुरशीनाशक यांची वेळोवेळी फवारणी घेऊन आपल्या पिकाचे संरक्षण करावे.
काढणी व मळणी
बाजरीचे कणीस हाताने दाबले असता त्यातून दाणे सुटणे, तसेच दाताखाली दाणा चावल्यानंतर कट्ट असा आवाज आल्यास पीक कापणी योग्य आहे असे समजावे. ताटाची कणसे विळ्याने कापून, गोळा करून, वाळवून मळणी यंत्राने मळणी करावी.
mahitibaddal dhanyvad.