Baby corn cultivation/2-3 महिन्याचे कोणते पीक घ्यावे? तेही कमी उत्पादन खर्चात!

मुख्य पीक घेतल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की, आता 2-3 महिने शेत पडून राहण्यापेक्षा कोणते पीक घेता येईल का? आपल्याकडे जर पशुधन असेल तर baby corn cultivation हा पर्याय आपल्यासाठी योग्य आहे, असे मला वाटते. म्हणूनच या बेबी कॉर्न पिकांविषयी माहिती देत आहे.

बेबी कॉर्न म्हणजे मक्याची लहान कोवळी कणसे. बेबी कॉर्न  हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेले एक जबरदस्त सुपरफूड आहे.  बेबी कॉर्नमध्ये अनेक  कार्बोहाइड्रेट्स, कॅल्शियम,  प्रोटीन्स , व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर आढळतात. Baby corn ही चवीला खूप छान आहेतच पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये आहेत. ते सॅलड म्हणून कच्चे खाता येते किंवा कॉर्न मंचुरियन, चिली पकोडे, कॉर्न मसाला असे बेबी कॉर्नचे अनेक पदार्थ बनवले जातात.  त्यामुळे मोठमोठे हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये बेबी कॉर्नची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याची पाने गुंडाळली असल्यामुळे त्यामध्ये कीटकनाशकांचा कोणताही परिणाम होत नसल्यामुळे Baby corn ची मागणी जास्त आहे.

Baby corn
Baby corn

Baby corn/ बेबी कॉर्न :शेतकऱ्यांना होतोय दुहेरी फायदा!

गहू आणि तांदूळ या पिकानंतर मका हे तिसरे महत्त्वाचे पीक मानले जाते. हे पीक वर्षांनुवर्षे भारतात घेत असल्यामुळे, बेबी कॉर्नचे उत्पादन घेण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांना काहीच अडचण नाही. विशेष म्हणजे बेबी कॉर्नचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी सरकारकडून मदत केली जाते. त्याबाबत आपल्याला अधिक माहिती आय.आय.एम.आर,  आय.सी.ए.आर, जी.ओ.व्ही.इन वेबसाईटवर मिळू शकते. बाजारपेठेतील वाढत्या मागणीचा विचार करता हे पीक शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. मका संशोधन संचालनालय, पुसा यांच्या अहवालानुसार बेबीकॉर्न चे उत्पादन सामान्य मक्याच्या लागवडी सारखेच आहे. परंतु काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते. यासाठी शेतकऱ्याने बेबी कॉर्न च्या उत्पादनासाठी मक्याच्या एकाच क्रॉस हायब्रीड जातीची पेरणी करावी. यासाठी एकरी 8 किलो बियाणे लागते.

बेबी कॉर्नच्या जाती:

व्ही.एल.- 78 हे भारतातील पहिले बेबी कॉर्न वान आहे. याबरोबरच सिंगल क्रॉस हायब्रीड एच.एम. – 4 हे देशातील सर्वोत्तम बेबी कॉर्न हायब्रीड आहे.  तसेच व्ही.एन.- 42, एच.ए.एम.- 129, गोल्डन बेबी  हे सुद्धा Baby corn बेबी कॉर्न चे उत्तम वान आहेत.

पूर्व मशागत:

बेबी कॉर्न च्या लागवडीसाठी शेताची नांगरणी करून माती भुसभुशीत करावी. लागवड आपण पेरणी किंवा टोकन या दोन्ही पद्धतीने करू शकतो. लागवडीच्या 2 रोपातील अंतर 15 सेंमी आणि 2 ओळीतील अंतर 45 सेंमी. ठेवावे. बियाणे 3 ते 4 सेंटीमीटर खोल पेरावे. यासाठी एकरी 8 किलो बियाणे लागते.

Baby corn लागवडीचा कालावधी:

खरीप हंगाम : 15 जून ते 15 जुलै

रबी हंगाम 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर

उन्हाळी : 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी

खत पाणी व्यवस्थापन:

बेबी कॉर्न च्या लागवडीसाठी जमीन तयार करताना एकरी चार ते पाच टन कंपोस्ट किंवा शेणखत वापरावे. रासायनिक खतमात्रेच्या पूर्तीसाठी एकरी 60किलो नत्र, 25किलो स्फुरद, 25किलो पोटॅश आणि 10किलो झिंक सल्फेट हे एकत्र मिसळून  3 भाग करावेत. पैकी 2 भाग पेरणीपूर्वीच शेणखताबरोबर द्यावेत. उरलेला 1 भाग 35 ते 40 दिवसांनी द्यावा.

या पिकावर फारसा कीड व रोगाचा परिणाम होत नाही. आपल्या कृषी सल्लागाराच्या सहाय्याने फवारणी नियोजन करावे.

या पिकात पाणी साचल्यास उत्पादनात घट होते. रोपांना वाढीच्या व फळधारणेच्या अवस्थेत पाण्याची गरज असते. पाण्याचा ताण मका पिकावर लगेच दिसून येतो, यानुसार सिंचन व्यवस्थापन करावे.

बेबी कॉर्न चे उत्पादन:

बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी अधिक झाडे लावावी जेणेकरून खताचा वापर कमी होईल. आपण नेहमीच्या मका पिका सारखेच याचे व्यवस्थापन करू शकतो. फक्त काढणीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी लागते. मक्याच्या कणसाला येणारा तुरा किंवा रेशमी केसाळ भाग 2 ते 4 सेंटीमीटर लांब झाला की बेबी कॉर्न तोडले जाते. काढणीनंतर पाने न काढल्यास बेबी कॉर्न बराच काळ ताजे राहते. एका पिकापासून 2 ते 4 तोडे घेतले जातात.

हे पीक आपल्याला दुहेरी फायदा मिळवून देते. बेबी कॉर्नच्या काढणीनंतर उर्वरित भाग आपण जनावरासाठी चारा म्हणून वापरू शकतो किंवा कापून,  सुखी पेंड (मुरघास) बनवता येतो. जनावरासाठी हे पौष्टिक खाद्य आहे की, ज्यामुळे जनावरांची दूध उत्पादन क्षमताही वाढते.

आज-काल अनेक सुशिक्षित पदवीधर या आधुनिक शेतीतून चांगली कमाई करत आहेत. आर्थिक दृष्ट्या विचार केला तर यातून खूप फायदा मिळू शकतो. एका एकरात बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी जवळपास 15 हजार रुपये खर्च येऊ शकतो यामधून एकरी 4 ते 6 क्विंटल उत्पादन घेऊन  लाखोंची कमाई होते.  हे पीक वर्षातून एकदाच नाही तर 3 ते 4 वेळा घेऊ शकता.

बेबी कॉर्नच्या या स्वादिष्ट आणि पौष्टिक गुणधर्मामुळे कॅनडा सरकारने भारत सरकारशी बेबी कॉर्नच्या आयातीसाठी करार केला आहे.

Baby corn बेबी कॉर्नची कापणी:

बेबी कॉर्न ची लागवड दक्षिण भारतात वर्षभर करता येते, तर उत्तर भारतात फेब्रुवारी ते नोव्हेंबर यादरम्यान आपण लागवड करू शकतो. रब्बी  हंगामात 110 ते 120 दिवसात उन्हाळी हंगामात 70 ते 80 दिवसात आणि खरिपात 55 ते 65 दिवसात आपण या पिकाची कापणी  करू शकतो. लागवडीनंतर साधारणतः 2 ते अडीच महिन्यांनी मक्याला लहान लहान कणसे येतात. ती मजुरांकरवी सकाळी काढून घेऊन गोण्यांमध्ये भरली जातात. खासगी कंपनी किंवा व्यापाऱ्यांना जागेवरच विक्री होते. काही शेतकरी स्वतः विक्री करतात किंवा  वाहनांमधून ती विक्रीसाठी पाठवतात.  सध्या करार शेतीत प्रति किलो 8 रुपये दर निश्‍चित केला आहे.  चाराविक्रीतून 15 ते 20 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.

हे ही वाचा- मका लागवड : खतनियोजन व कीड रोग व्यवस्थापन

1 thought on “Baby corn cultivation/2-3 महिन्याचे कोणते पीक घ्यावे? तेही कमी उत्पादन खर्चात!”

Leave a Comment