Arrowing in sugarcane ऊसाला तुरा येणे योग्य की अयोग्य?

सध्या Arrowing in sugarcane ऊसाला आलेल्या तुऱ्याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने तुरा आल्यामुळे उसाची वाढ थांबते, उत्पादन घटते, ऊसाला दशी पडते व हलका होतो अशी चर्चा ऐकायला मिळते. अशी अवस्था आल्यानंतर तीन महिन्यात ऊस तोडला तर उत्पादन अथवा साखरेवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. पण तुरा येऊन फुले झडू लागल्यावर ऊसामधल्या रसाची गुणवत्ता ढासळू लागते. परंतु ऊसाला तुरा का येतो याविषयी शास्त्रीय दृष्ट्या कोणीच बोलत नाही. याविषयीची तांत्रिक माहिती कृषी तज्ञांच्या आणि अनुभवी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवातून आपण या लेखात घेणार आहोत.

Arrowing in sugarcane
Arrowing in sugarcane

Arrowing in sugarcane ऊसाला तुरा येण्याची प्रक्रिया

ऊसाला तुरा येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ऊसामध्ये नवीन वाण निर्माण करण्याच्या दृष्टीने तुरा Arrowing in sugarcane येणे व त्यावर बीजधारणा होणे या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण शेतक-यांच्या शेतावर ऊसाला तुरा येणे ही बाब मात्र अनिष्ट आहे. नैसर्गिकरीत्या ऊसाला 10 ते 12 महिन्यांत तुरा येतो. वाढीच्या अवस्थेतून प्रजनन अवस्थेत बदल होत असताना ऊसाच्या वाढ्यातील पानांमध्ये फ्लोरिजीन हार्मोन निर्माण होऊन फुलोरा/तुरा येतो.

ऊस लागवडीचे आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू असे तीन हंगाम आहेत. यापैकी कोणत्याही हंगामात ऊसाची लागण केली तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ऊसाला तुरा येतो. ऊस तोडणीच्या अगोदर 15 ऑगस्टच्या दरम्यान ऊसाच्या वाढणाऱ्या कोंबात नवीन पान तयार होण्याऐवजी तुरा (ऍरोइंग) येतो. या तुर्‍यावर असणारी लहान पाने उमलत जाऊन तुरा बाहेर पडण्यास साधारण 15 नोव्हेंबर चा काळ उजाडतो.

लवकर किंवा उशिरा पक्व होणाऱ्या जातीनुसार/व्हरायटीनुसार हा कालावधी बदलतो. आपल्याकडे साधारण नोव्हेंबर पासून साखर कारखाने सुरू होतात. या काळातच  ऊसामध्ये साखरेची योग्य टक्केवारी तयार झालेली असते. आणि ही साखर तयार व्हावी यासाठी निसर्गाने तुऱ्याच्या निर्मितीचा हा काळ निश्चित केला आहे.

तुरा येण्याच्या क्रियेवर परिणाम करणारे घटक

Arrowing in sugarcane पाणथळ शेतजमीन:

शेतामध्ये पाणी साठून रहात असेल तर तुरा येण्याचे प्रमाण जास्त राहते. एरवी तुरा न येणा-या को-6304 सारख्या वाणालासुद्धा पाणथळ स्थितीत तुरा येतो.

पाण्याचा ताण :

पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते.

नत्राची कमतरता :

पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो म्हणून या काळात 25% वाढीव नत्राची मात्रा देवून पुढे पंधरा दिवसांनी थोडा पाण्याचा ताण दिला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते. साखरेचा उतारा वाढतो. पावसाळी किंवा मिरगी डोस देण्याची काही ठिकाणी पद्धत या दृष्टीने महत्त्वाची आहे.

अनुवंशिक घटक

तुरा येण्याचे प्रमाण अनुवंशिक घटकावर अवलंबून असते. को-7219, कोसी-671, को-94012  या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को-740, को-7125, को-8014, को-265 मध्ये तुरा उशीरा येतो.

खोडव्यापेक्षा लागवडीच्या उसात तुरा जास्त येतो. पाचटाचा वापर केलेल्या क्षेत्रात तुरा कमी येतो.

रात्रीचे आणि दिवसाचे तापमान, हवेतील आद्रता, सातत्याने पडणारा पाऊस, जमिनीत साचून राहणारे पाणी, पीक वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध नत्राची कमतरता, चुकीचा लागणीचा हंगाम यामुळे ऊसाला तुरा Arrowing in sugarcane येण्यास उत्तेजन मिळते.

ऊसात साखर तयार होण्याची प्रक्रिया

आपण जर 15 ऑगस्ट पूर्वी ऊस खाल्ला तर अजिबात गोड लागत नाही पण तोच ऊस नोव्हेंबर मध्ये गोड कसा होतो? या पाठीमागील विज्ञान समजून घेणे गरजेचे आहे.

ऊस शेतीमध्ये ऊसाची उगवण, फुटवा, वाढ आणि पक्वता या ऊस वाढीच्या 4 अवस्था आहेत. या वेगवेगळ्या अवस्थेतील पानांच्या रचनेचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. ऊसाला 10 ते 12 हिरवी पाने असतात. ऊसाला दर 12 दिवसांनी एक नवीन पान तयार होत असते. सुरुवातीला उगवणीची अवस्था ही 15 ते 30 दिवसात पूर्ण होते. पहिले आलेले पान अतिशय लहान असते. त्यापुढील प्रत्येक पान पहिल्या पानापेक्षा मोठे तयार होते. सुरळीतले पहिली दोन पाने ही बाल पाने असतात. वरून मोजले असता तिसऱ्या पानापासून कार्यक्षम पाने तयार होतात. 3,4,5,6 ही सर्वात कार्यक्षम म्हणजे साखर तयार करणारी पाने असतात. सातव्या पानाच्या पुढील 10 ते 12 हिरव्या पानांच्या गुच्छातील पाने ही वृद्धत्वाकडे झुकत जाणारी पाने असतात. ऊसाची पाने सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणातून साखरेची निर्मिती करत असतात.

Arrowing in sugarcane
Arrowing in sugarcane

Arrowing in sugarcane ऊसाची तोड

ऊसाला सुरुवातीच्या काळात पानात तयार होणाऱ्या साखरेपेक्षा, जास्त साखरेची गरज ही वाढीसाठी असते. वाढीसाठी साखरेची ही गरज जसजशी वाढत जाते, तसतसे मागील पानापेक्षा पुढील पान मोठ्या आकाराचे तयार होते. एकदा 10 ते 12 पानांचा गुच्छ तयार झाला की पानात तयार होणारी सर्व साखर वाढीसाठी पुरेशी ठरते. आणि याच काळात ऊसाच्या वाढीला सुरुवात होते. या काळात मागील पानाइतक्याच आकाराचे पुढील पान तयार होते. असे चक्र पक्वता अवस्थेपर्यंत सुरू राहते. पक्वता काळ सुरू झाला की नवीन पानाऐवजी तुरा तयार होतो आणि शाकीय वाढ थांबते. 15 ऑगस्टच्या दरम्यान हा काळ सुरू होतो. यानंतर तयार होणाऱ्या पानाकडे लक्ष दिल्यास मागील पानापेक्षा पुढील पान लहान तयार होते. त्यामुळे पानात तयार होणाऱ्या साखरेपेक्षा वाढीसाठी कमी साखर वापरली जाते आणि शिल्लक साखर ही ऊसाच्या पेरात साठवली जाते. या साठत जाणाऱ्या साखरेमुळे नोव्हेंबर नंतर ऊसामध्ये गोडी यायला लागते.

या दरम्यानच साखर कारखाने सुरू होतात. शेतकऱ्यांना उसाचा दर टनावर मिळतो आणि म्हणूनच शेतकरी टनाच्या (टनेज/ॲव्हरेज) पाठीमागे धावत असतो. त्यामुळे माझा ऊस तुटेपर्यंत त्याची वाढ चालूच राहिली पाहिजे. कारण ऊस जितका वाढेल तितके मला उत्पादन मिळणार, हेच त्याच्या डोक्यात असते. बाकी साखरेचा उतारा कारखाना बघून घेईल, त्याचा मी विचार करण्याचे काहीच कारण नाही. शेतकऱ्यांची ही मानसिकता लक्षात घेऊनच काही तज्ञ मंडळी तुरा येणे योग्य नाही. तुरा येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे याबाबत मार्गदर्शन करतात. याउलट योग्य वेळी तुरा येऊन साखर उतारा कसा जास्तीत जास्त मिळेल याविषयी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

तुऱ्याचे नियंत्रण करण्याचे फायदे

उष्ण कटिबंधामध्ये तुऱ्याचे नियंत्रण केलेल्या ऊसाचे टनेज वाढते.

साखरेचे प्रमाणसुद्धा वाढते.

ऊसाची वाढ चालू राहते.

समशीतोष्ण कटिबंधात मात्र तुरा येवो अथवा न येवो नोव्हेंबरपासून येणाऱ्या थंडीमुळे ऊसाची वाढ थांबलेलीच असते.

त्यामुळे तुऱ्याचे Arrowing in sugarcane नियंत्रण करुन फारसा फायदा होत नाही.

पण एक फायदा मात्र असा होतो की, मार्च महिन्यानंतर जरी ऊस तुटला तरी साखरेचे प्रमाण कमी होत नाही.

आपल्या काही सूचना, तज्ञ मते, प्रतिक्रिया असतील तर जरूर कमेंट करा. आपल्या अनुभवी मतांचा आदर आणी स्वीकार निश्चित केला जाईल.

Leave a Comment