गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti

गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti: सुमारे ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत. गांडूळ खताला नैसर्गिक शेतीचा पाया म्हणू शकतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या काही दशकात शेत जमिनीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी व अतीलोभापायी शेतीत रासायनिक खते, कीटकनाशके यांचा बेसुमार वापर चालू केला.  

जेव्हापासून शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले  तेंव्हापासून त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसू लागला.  पर्यायाने पाणी, प्राणी, पक्षी, मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.  वनस्पती सेंद्रीय पदार्थ निर्माण करतात.  शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिसळतात.  पिकांच्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंडया जमिनीवर पडतात.  शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करुन आपल्या बिळात नेतात व शेण खातात.  जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रीय पदार्थ जमिनीत मिसळतात.  जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात.  ते पदार्थ पुर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळचा आकार राहत नाही.  तेंव्हा त्याला ह्युमस असे म्हणतात.

गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti
गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti

ह्युमसची व्याख्या:

खनिज जमिनीत चांगल्याप्रकारे कुजलेला कमी अधिक स्थिर असलेला सेंद्रीय पदार्थ. हा सेंद्रीय पदार्थ कोलोईडल (colloidal) असतो.  त्याचा रंग काळा किंवा गडद तपकिरी असतो. त्यामध्ये सेंद्रीय स्वरुपात मूलद्रव्ये असतात.  मुख्यतः कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधक असतात.  इतर मूलद्रव्ये कमी प्रमाणात असतात.  जमिनीतील जिवाणू ह्युमसमध्ये राहातात.  सेंद्रीय पदार्थाचे ह्युमसमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला ’ह्युमीफिकेशन’ म्हणतात. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजण्याची क्रिया सतत चालू असते.  जिवाणुंमुळे सेंद्रीय पदार्थ कुजण्याची हळूहळू क्रिया होते, तेव्हा त्यातील अन्नद्रव्ये पिकासाठी मुक्त होतात.  भारी जमिनीत सेंद्रीय पदार्थ मिसळल्यास ती जमीन भुसभुशीत होते, व मशागत करणे सोपे जाते.  जमीन भुसभुशीत झाल्यावर पाणी मुरते, पाणी वाहून जात नाही.  त्यामुळे जमिनीची धूप कमी होते, हवा खेळती राहते.  जमिनीच्या पृष्ठभागावर पोपडा तयार होत नसल्याने पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली होते.  

गांडूळाचे प्रकार:

हजारो वर्षापासून गांडूळे अस्तित्वात असून त्यांचे रंग व आकार भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. गांडूळे जांभळी, लाल, तांबडी, निळी, हिरवी, तपकिरी व फिकट तांबूस अशा विविध रंगाची असतात.  सर्वसाधारण नेहमी आढळून येणारे गांडूळे ६ ते ८ इंच लांबीची असतात, मोठया प्रकारची गांडूळे जमिनीत ३ मीटर खोलीपर्यंत जातात.  गांडूळ खत निर्मितीसाठी ‘इसिनीया फेटीज’ ही परदेशी जात सर्वोत्तम आहे, असे संशोधनाअंती आढळून आले आहे. ‘पेरीओनिक्स एक्सकॅहेटस’  ही गांडूळाची स्थानिक जातसुध्दा गांडूळ खत तयार करण्यास चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे.  सध्या ‘इसिनीया फेटीज’  ही जात सगळीकडे गांडूळ खत निर्मितीसाठी मोठया प्रमाणात वापरात आहेत.  गांडूळांना वानवे, वाळे, केचळे, शिदोढ, काडू किंवा भूनाग अशा  नावाने ओळखले जाते.  प्राणीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे गांडूळे ‘ ऍनेलिडा’ या वर्गात मोडतात.  जगामध्ये गांडूळांच्या ३००० प्रकारच्या जाती आहेत. तर भारतामध्ये ३०० प्रकारच्या जातींचे गांडूळे आढळून येतात.

शरीर रचना:

गांडूळ हे अतिशय नाजूक मऊ व गुळगुळीत असते. त्याचे शरीर २ इंचापासून ते २ फूटांपर्यंत लांबट आकाराचे, रिंग्जने बनलेले असते.  ज्यांच्या मदतीने गांडूळाची हालचाल होते व त्यांना बिळांना घट्ट धरुन ठेवता येते.  गांडूळाच्या शरीराचा रंग त्याच्या रक्त्तातील हिमोग्लोबीनमुळे आलेला असतो.  वयात आलेल्या गांडूळाच्या गळयाभोवती एक उभट गोलाकार पट्टा असतो.  त्यास क्लायटेलम म्हणतात व ह्याच भागात जननेंद्रिय आढळतात.  गांडूळाला डोळे नसतात.  गांडूळाच्या अंगावर  प्रकाश संवदेनशील ग्रंथी असतात, त्यामुळे त्यास प्रकाशाची तीव्रता समजते.  ग़ांडूळास तीव्र प्रकाश सहन होत नाही कारण त्याची त्वचा ही ओलसर असते.   त्वचेतील हिमोग्लोबीन  प्राणवायुच्या कमी दाबात देखील कार्य करु शकत असल्यामुळे गांडूळे जमिनीत खोलवर राहू शकतात.

गांडूळाचा जीवनक्रम / आयुष्य:

गांडूळ हा उभयलिंग प्राणी आहे.  अंडावस्था, बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि प्रौढावस्था अशा चार त्याच्या जीवनक्रमाच्या अवस्था आहेत. गांडूळाचे आयुष्य १५ वर्षे असते.  तारुण्य अवस्थेमध्ये २ गांडूळे एकत्र आल्यानंतर दोन्ही गांडूळे एक कोष (ककून)टाकतात.  या कोषात १८ ते २० अंडी असतात.  प्रत्येक कोषातून ३ ते ४ गाडूळे बाहेर पडतात.  याप्रमाणे गांडूळांची एक जोडी ६ ते ८ पिल्लांना जन्म देते.  एक गांडूळ दर ७ ते ८ दिवसांनी एक कोष देते.  एक कोष पक्व होवून पिल्ले बाहेर येण्यास १४ ते २१ दिवस लागतात.  एका वर्षात गांडूळे १ ते ६ पिढया तयार करतात. 

गांडूळ  हा निरुपद्रवी  बीळ करुन रहाणारा प्राणी आहे. गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते.  त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते, परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता  येत नाही. कारण त्याला डोळे नसतात. त्यामुळे ज्याचा स्पर्श होईल त्याला ते खात सुटते.  जमिनीच्या आत बिळे करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते.  त्यामुळे  त्याला मातीचा स्पर्श होत राहतो आणि स्पर्श होईल ती माती खात ते सुटते आणि दिवसभरात भरपूर माती खाते.  ती माती त्याची भूक भागवायला उपयोगी नसते.  परंतु टनभर माती खाल्ल्यानंतर त्याची भूक भागण्यास आवश्यक असे थोडे बहुत सेंद्रीय पदार्थ  त्याला त्या मातीतून मिळते. निसर्गाने त्याच्या पोटामध्ये ती माती पचवण्याची शक्ती निर्माण केलेली आहे.  गांडुळ खत। नैसर्गिक शेती। Ggandul-khat-naisargik-sheti या निमित्ताने गांडुळ २४ तास वळवळ करत राहते आणि माती उकरून खाते.  त्यामुळे शेतातली जमीन भुसभुशीत होते.  अन्यथा हे काम करायला शेकडो रुपये देऊन ट्रॅक्टर तरी आणावा लागतो, किंवा सहा बैली नांगराने शेत नांगरावे लागते.  तेच काम गांडुळ करत असल्यामुळे जमीन आयतीच भुसभुशीत होऊन तिच्यातून हवा खेळणे शक्य होते.  ज्या जमिनीत भरपूर हवा खेळते त्या जमिनीतल्या पिकांच्या मुळांना हवा भरपूर मिळते.  पिकांच्या मुळाशी  पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्याही वाढते.  त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. हे सारे करत असताना जमिनीतली माती गांडुळाच्या पोटातून काही प्रक्रिया होऊन विष्ठेच्या रूपाने पुन्हा बाहेर पडते आणि आयतेच खत जमिनीला मिळतो. विष्ठेच्या बरोबरच गांडुळाच्या शरीरातून म्हणजे त्वचेतून काही द्रव्ये बाहेर पडत असतात.  या द्रव्यांचा उपयोग पिकांची वाढ करण्यासाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून होत असतो.  गांडुळाच्या विष्ठेचे विश्लेषण केले असता  त्यामध्ये, नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण पाच पट जास्त असते.  त्याच्या विष्ठेत स्फूरद सात पटीने जास्त तर पालाश अकरा पटीने जास्त असतो.  मुक्त चुनांश, मॅगनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा दुपटीने जास्त असतात. gandul-khat-naisargik-sheti गांडुळ मरण पावते तेव्हा सुद्धा ते शेतकऱ्याच्या उपयोगी पडते.  गांडुळाच्या शरीराचा सुद्धा खत म्हणून उत्तम उपयोग होतो.

गांडुळ खत म्हणजे प्रामुख्याने गांडुळाची विष्ठा.  गांडुळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेल्या मृद गंधयुक्त, काळसर रंगाच्या, वजनास हलके आणि  कणीदार दिसणा-या विष्टेस ”वर्मिकंपोष्ट ” असे म्हणतात.  यामध्ये नत्र, पालाश आणि स्फूरद हे तर जास्त असल्याचे आढळले आहेच.  परंतु त्यात इतरही काही गोष्टी आढळलेल्या आहेत. तिच्यामध्ये पिकांना उपयुक्त असलेली बुरशी आणि ऍक्टीनोमायसिटीस् असतात.  हवेतला नत्र जमिनीत स्थिर करणारे ऍझोटोबॅक्टर सारखे जीवाणूही गांडुळाच्या विष्ठेमध्ये मोठ्या संख्येने  आढळतात. त्याच्या विष्ठेमध्ये असलेले नेकार्डिया ऍक्टीनोमासिटस् किंवा स्ट्रेप्सोमायसेस यासारखे सूक्ष्म जीवाणू औषधासारखे  काम करतात आणि पिकांवर पडणाऱ्या रोगांवर इलाज करतात.  गांडुळाचे आतडे हे एक यंत्रच आहे.  त्याच्या आतड्यामध्ये मातीचे रुपांतर खतात करणारे शंभरहून अधिक जीवाणू सतत कार्यरत असतात. गांडुळाची मदत घेऊन शेती करणे   ‘बिनखर्ची शेती’ करण्यासारखेच आहे. म्हणजे गांडुळ खत, नैसर्गिक शेतीला वरदान आहे.

गांडुळ हा शेतकऱ्याचा मित्र कसा?

माती हे गांडूळाचे प्रमुख खाद्य आहे. गांडुळाच्या पोटातील निसर्गनिर्मित भट्टीत त्याचे खत तयार होते आणि ते विष्ठेतून बाहेर पडते.  म्हणजेच आपल्या शेतातली शेणखतासारखी सेंद्रीय खते पिकांना ताबडतोब उपयोगी करून देण्याचे काम गांडूळ  करत असतो.  म्हणूनच गांडूळ हे पिकांसाठी खाद्य तयार करणारे स्वयंपाकघर किंवा भटारखाना आहे.  हा भटारखाना म्हणजे एक प्रकारचा खताचा कारखानाच आहे. गांडुळाला दृष्टी नसते आणि ज्याला स्पर्श होईल ते खात सुटते आणि खाता खाता शेतातल्या मातीमध्ये असलेले अनेक रोगजंतू ते फस्त करत असते.  आपले शेत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगजंतूंपासून मुक्त ठेवण्यासाठी गांडुळाचा उपयोग ‘दवाखाना’  म्हणून होत असतो.  अनेक प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या शेतात गांडूळ भरपूर प्रमाणात असतात त्या शेतांमध्ये पिकावर  रोगही कमी पडतात.  कीडी आणि कृमींपासून होणारे रोग गांडुळामुळे  टळत असल्यामुळे पुढे होणारे नुकसान टळते.  औषधांवरचा खर्च गांडुळामुळे वाचतो.  अशा रितीने गांडूळ शेतामध्ये होणारे दोन मुख्य खर्च वाचवते. पहिला खर्च रासायनिक खतांचा आणि दुसरा खर्च जंतूनाशकांचा आणि औषधांचा.

अतिशय महत्वाचे: गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti

भौतिक सुपीकता:

गांडूळाच्या विष्ठेतील मातीची कणीदार संरचना असते, त्यामुळे ही विष्ठा पाण्याने वाहून जात नाही.  जमीन घट्ट बनत नाही, भुसभुशीत राहाते.  कणीदार संरचनेमुळे पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमिनीत मुरते, पृष्ठभागावरुन वाहून जात नाही.  जमिनीतील पाण्याचा योग्यप्रकारे निचरा झाल्याने जमिनीत हवा खेळती राहते.  गांडूळे नसलेल्या जमिनीपेक्षा गांडूळे असलेल्या जमिनीतून पाण्याचा निचरा ४ ते १० पटीने अधिक होतो.  गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व त्यामुळे सहजिकच पिकाचे उत्पादन वाढते.  गांडूळामुळे जमिनीची जलधारणाशक्ती २० टक्के ने वाढते.  पिकांना अधिक पाणी मिळते व पर्यायाने पाण्याचा ताण सहन करावा लागत नाही. गांडूळ बिळ करून राहते आणि त्यासाठी माती उकरत राहते. त्याच्या या माती उकरण्याच्या प्रक्रियेत जमिनीच्या खालच्या थरातली माती वर येते आणि वरच्या थरातली माती खाली नेऊन सोडली जाते. मातीची ही अदलाबदल मृदशास्त्रानुसार पिकांसाठी उपयुक्त असते आणि गांडूळ हे सारे काम कसलाही पगार न घेता करत असते.

जैविक सुपीकता:

गांडूळाच्या विष्टेत असलेले  ‘नेकार्डिया, ऑक्टिनोमायसिट्स व स्टेप्टोमायसेस’ सारखे जिवाणू अँटीबायोटिकस्स (औषधासारखे) सारखे परिणामकारक असतात. अशाप्रकारे गांडूळाची आतडी सुमारे एक हजार पटीपेपेक्षा अधिक संख्येने जिवाणूंची संख्या वाढवून एक प्रकारे नैसर्गिक रिऍक्टरचे (Bio-reactor) काम करतात.  तर विष्टेद्वारा बाहेर पडलेले सुक्ष्म जिवाणू जमिनीची जैविक सुपीकता वाढविण्याचे  कार्य करतात.

रासायनिक खते वापरल्यामुळे आपल्या जमिनी नापीक होत चालल्या आहेत, जमिनीची जास्त प्रमाणात धूप होत आहे. परिणामी जमिनीची उत्पादन क्षमता देखील कमी होते व आपल्याला शेतीमध्ये तोटा सहन करावा लागतो. यामुळेच आज आपण गांडूळ खत प्रकल्प विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गांडूळखत निर्मिती प्रकल्प:

गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. खड्डयाच्या जवळपास मोठी वृक्ष/झाडे नसावीत.  कारण झाडांची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात.  गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची  आवश्यकता असते.  त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे.  छपरामध्य दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्यांच्या दोन्ही बाजूने तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवा.  त्या दोन ओळीवर उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करुन सहा इंच उंचीचा थर द्यावा.  त्यामुळे गांडूळांना जाड  कच-यात आश्रय मिळेल.  दुसरा थर चांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्या स्लरीचा द्यावा.  तो उष्णता निरोधनाचे काम करील. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडूळांना  खाद्य  म्हणूनकामी येईल.  बीज रुप म्हणून या थरावर साधारण ३ x ४० फूटासाठी १० हजार गांडूळे समान पसरावीत.  त्यावर कच-याचा १ फूट जाडीचा थर  त्यावर  घालावा.  पुन्हा चार-पाच इंच कच-याचा द्यावा.  ओल्या पोत्याने / गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे.  गोणपाटामुळे  शेणखतामध्ये  गांडूळाची वाढ उत्तम होते.  त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत, उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोडयाची लिद यापासूनसुध्दा खत तयार होते. गांडूळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे.  शेणखत व सेंद्रीय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरुन गांडूळ खत तयार करता येते.  गांडूळ खाद्यामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकाचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड यांचा वापर होऊ शकतो.  मात्र हे खाद्य गांडूळासाठी वापरताना त्यामध्ये १:३ या प्रमाणात शेणखत मिसळणे आवश्यक आहे.  गांडूळखाद्य नेहमी  बारीक  करुन टाकावे, बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरीसूध्दा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते.  खड्डयामध्ये गांडूळे टाकण्याअगोदर गांडूळ खाद्यावर चार-पाच दिवस सारखे  पाणी मारावे.  म्हणजे त्यातील गरमपणा  नष्ट होईल.  सुक्ष्म जिवाणू संवर्धके (बॅक्टेरीयल कल्चर) वापरुन खत कुजविण्याच्या प्रक्रियेस  वेग देता  येतो.  त्यासाठी १ टन खतास अर्धा किलो जिवाणू संवर्धके वापरावीत.  या व्यतीरिक्त गांडूळखाद्य १ किलो युरिया व १ किलो सुपर फॉस्फेट प्रती टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रिया लवकर होवून गांडूळ खत लवकर तयार होईल.  गांडूळ खाद्य इतर प्राण्याप्रमाणे गांडूळांना खाण्याकरिता त्यांचे आवडी-निवडीचे अन्न लागते.  त्यामुळे गांडूळांची वाढ व प्रजोत्पादन झपाटयाने होते.  झाडांची पाने, कापलेले गवत, तण, काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकावू भाग, प्राण्यांची विष्टा (कोंबडयांची विष्टा वगळता ) कंपोस्टखत, शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडूळाचे आवडीचे आहेत.

गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत:

गांडूळखत हाताला भुसभुशीत व हलके लागते अशा स्थितीत गांडूळ खत तयार झाले असे समजावे. खत तयार  झाल्याचे दिसून आल्यावर दोन दिवस पाणी मारणे बंद ठेवावे.  म्हणजे वरचा थर कोरडा झाल्याने गांडूळे खाली जातात.  नंतर उघडया जागते  हलक्या हाताने काढून ढिग करावा.  उजेड दिसताच सर्व गांडूळे ही खालच्या बाजूला जमा होतात.  नंतर वरवरचा थर परत एकदा थंड जागेत साठवण्यास ठेवावा आणि परत वरील पद्धतीचा क्रमाक्रमाने अवलंब करुन गांडूळांना खाद्य पुरवून खताची निर्मीती सुरु ठेवावी.  गांडूळखत वेगळे करताना कुदळी, टिकाव, फावडे, खुरपे, यांचा वापर करुन नये, जेणे करुन गांडूळांना इजा पोहोचणार नाही.  या गांडूळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्याची विष्टा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते असे खत शेतामध्ये वापरता येते.  निरनिराळया पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष जमिनीत टाकावे.

आपल्याला  हा  लेख आवडल्यास  इतरांना  शेअर  करा.  धन्यवाद…

4 thoughts on “गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti”

Leave a Comment