युरिया खतामधील नत्राची मात्रा पिकांना तात्काळ लागू पडते. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. पिके हिरवीगार, तजेलदार दिसतात. नत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती करते. प्रकाशसंश्लेषणाद्वारे पिकाचे अन्न बनवण्यास मदत करते. यामुळे पिकाची झपाट्याने कायिक वाढ होते, चांगली फुले व फळे लागतात. पिकामध्ये प्रथिने तयार होण्यासाठी नत्र आवश्यक आहे. तसेच इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत ही कमी असते. या सर्व कारणांमुळे नत्रयुक्त रासायनिक खतामध्ये युरियाचा वापर Urea Use सर्वाधिक होतो.

युरियामध्ये 46% अमाईड नत्र असते. खत पाण्यात पूर्णपणे विरघळते. याशिवाय युरियाची मात्रा पिकाला विभागून देतात. त्यामुळे युरियाला अधिक पसंती दिली जाते. मात्र अलीकडे युरियाचा Urea Use वारेमाप वापर होत आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे. युरियामुळे पिकांची फक्त शाकीय वाढ होते, रोग, किडीचा वाढता प्रादुर्भाव आणि उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे युरियाचा काटेकोर वापर करण्याची गरज आहे.
युरियाचा अवाजवी वापर कसा टाळायचा?
- पिकांना खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे आणि मिळालेल्या अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे.
- नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा. याशिवाय हिरवळीच्या खतांचाही वापर करावा.
- नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत. युरिया जर पारंपरिक पद्धतीने शेतात फेकून दिला तर अमोनियमचे, अमोनिया गॅसमध्ये रुपांतर होऊन तो लगेच हवेत उडून जातो. म्हणून युरिया नेहमी जमिनीत पेरून द्यावा.
- युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझोटोबॅक्टर किंवा ॲसिटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. जिवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये 15 ते 20% नत्राची बचत होते. उसामध्ये 50 टक्क्यांपर्यंत बचत होते.
- पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा.
- कोरडवाहू शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत.
- ऊस, केळी, बीटी कापूस यांसारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा Urea Use विभागून द्यावी.
- चोपणयुक्त जमिनीत युरिया हे शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताबरोबरच द्यावे. याठिकाणी युरिया खताची मात्रा 25 टक्क्यांनी वाढवून द्यावी.
- आपल्या राज्यातील 52 टक्के जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे. अशा जमिनीत युरियाला पर्यायी अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यावर पिकांना नत्राबरोबर गंधक हे अतिरिक्त अन्नद्रव्य मिळून त्याचे चांगले परिणाम दिसतात.
- फवारणीद्वारे(नॅनो युरिया) दिला तर अत्यंत कमी खतामध्ये चांगले परिणाम दिसतात.
- देशात उत्पादित होणारा आणि आयातीत युरिया सर्व उत्पादक व पुरवठादार यांना नीम कोटिंग करूनच पुरवठा व विक्री करणे बंधनकारक आहे.
योग्य प्रमाणातच वापरा युरिया
- अमोनियम हे अस्थिर संयुग असते. जमिनीत नैसर्गिकरीत्या आढळणारा नायट्रोझोमोनस जिवाणूच्या मदतीने तो नाइट्राईटमध्ये रुपांतरीत होतो. लगेच नायट्रोबॅक्टर जिवाणूच्या मदतीने नाइट्रेट तयार होते.
- भात पीक सोडून इतर सर्व पिके नत्र फक्त नाइट्रेट स्वरुपातच घेतात. याचा अर्थ असा, की पीक अन्न म्हणून सरळ युरिया घेत नाही, तर नाइट्रेट घेते. या रुपांतरासाठी जमीन जिवंत असायला हवी.
- जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर पाहिजे. त्यामुळे जमिनीत हवा आणि ओलाव्याचे योग्य प्रमाण टिकून राहते. उपयुक्त जिवाणू, बुरशी व इतर जिवांची चांगली वाढ होते. यासाठी रासायनिक खताबरोबर चांगले कुजलेले शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खते दरवर्षी जमिनीत मिसळावीत.
युरिया वाया जाण्याची कारणे
- युरियाचे अमोनिफिकेशन होताना हवेशी संपर्क आला, की अमोनिया वायू तयार होऊन तो हवेत उडून जातो. या क्रियेला होलाटीलाईझेशन असे म्हणतात. हे नुकसान सर्वांत जास्त म्हणजे दिलेल्या युरियाच्या जवळपास 55 ते 60 टक्के असते.
- जेव्हा युरिया नाइट्रेट स्वरुपात येतो, तेव्हा पिकाची मुळे त्याला कोशिकांमध्ये शोषून घेतात. परंतु, जमिनीत जर ओल खूप जास्त असेल तर चल नाइट्रेट घटक मुळांपासून दूर खोल जमिनीत पाण्याबरोबर झिरपून जातो. याचे प्रमाण 20 ते 22 टक्के आहे.
- पिकांच्या मुळांबरोबर नत्रासाठी स्पर्धा करणारे काही जिवाणू जमिनीत राहतात. आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी जिवाणू नाइट्रेट शोषून घेऊन सेंद्रिय स्वरुपात रुपांतरीत करतात. पीक हे नत्र घेऊ शकत नाही याला इंमोबिलायझेशन (स्थिरीकरण) म्हणतात. युरियामधील फक्त 30 ते 35 टक्के नत्र पिकाला मिळते.
- ज्या जमिनीला पाट पद्धतीने पाणी दिले जाते, तिथे चिखल तयार होतो. मातीतील हवेची जागा पाणी घेते. मुळांची अन्न व पाणी घेण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन ही सर्वोत्तम पद्धत आहे.
भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण- धोकादायक!
शेतकरी मोठ्या प्रमाणात Urea Use युरीया सारख्या रासायनिक खतांचा वापर करतात. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जलप्रदूषण होते. जर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल, तर त्याचा परिणाम सर्वप्रथम लहान बालकांवर होतो. ‘ब्लू बेबी सिंड्रोम’सारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. रक्ताभिसरणासंबंधातील आजार निर्माण होतात.
आपल्या देशातील 440 जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये भूजलातील नायट्रेट धोकादायक पातळीवर आढळून आल्याचे केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.
केंद्रीय भूजल मंडळाचा अहवाल काय?
केंद्रीय भूजल मंडळाने (सीजीडब्ल्यूबी) ‘वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024’ प्रकाशित केला आहे. या अहवालात देशातील विविध राज्यांमधील भूजलाची गुणवत्ता दर्शविण्यात आली आहे. भारतातील 440 जिल्ह्यांमध्ये भूजलातील नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीवर आढळून आले आहे. तपासणीसाठी गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये 20% नायट्रेटचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) यांनी पिण्याच्या पाण्यासाठी निर्धारित केलेल्या 45 मिलीग्रॅम प्रति लीटर मर्यादेपेक्षा जास्त आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रेटचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढले आहे, त्यात महाराष्ट्रातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांचा समावेश आहे.
नायट्रेटचे प्रमाण वाढल्याचे परिणाम काय?
भूजलात नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढणे, ही गंभीर बाब असून यामुळे पर्यावरण आणि आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत:बागायती क्षेत्रात नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असले, तरी ग्रामीण भागात अनेक गावे विहीर, बोअरवेल, हातपंपांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाण्याचे स्रोत दूषित असले, तर याचा धोका जास्त आहे. नळाद्वारे पाणी पुरवण्यात येत असले, तरी ते किती प्रमाणात शुद्ध आहे, यावरही शंका असते.
अहवालातील इतर निरीक्षणे कोणती?
भूजल गुणवत्ता तपासण्यासाठी देशभरातील एकूण 15 हजार 259 निरीक्षण स्थाने निवडण्यात आली. यापैकी 25% विहिरींचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला. जल पुनर्भरणाचा गुणवत्तेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर 4 हजार 982 ठिकाणांहून भूजलाचे नमुने घेण्यात आले. ‘वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024’ नुसार, 9.04% नमुन्यांमध्ये फ्लोराइड पातळीदेखील सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त होती.
तसेच 3.55% नमुन्यांमध्ये आर्सेनिक दूषित आढळून आले.
काही राज्यांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण जास्त आहे. त्यात पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. पंजाबच्या काही भागात आणि छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातही आर्सेनिकची पातळी जास्त आढळून आली आहे.
फ्लोराइडचे प्रमाण वाढल्यामुळे फ्लोरोसिस होऊ शकतो आणि आर्सेनिकचे प्रमाण वाढल्यास कर्करोग किंवा त्वचेचा रोग होण्याची शक्यता असते.
भूजल गुणवत्तेच्या अहवालातून आणखी एक चिंतेची बाब आढळून आली आहे. अनेक भागात भूजलामध्ये युरेनियमची पातळी वाढली आहे.
युरीयाच्या अतिरेकी वापराचे गंभीर परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:
1. मातीची गुणवत्ता खराब होणे:
युरीयाचा अतिरेकी वापर मातीचा pH कमी करतो, ज्यामुळे माती आम्लीय बनते.
युरिया खताच्या अवाजवी वापरामुळेमुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब : नत्र यांचे
गुणोत्तर कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते.
Urea Use मातीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होऊन उपजाऊपणा कमी होतो.
2. पाण्याचे प्रदूषण:
मातीतील अतिरिक्त नायट्रोजन भूजलात मिसळतो, ज्यामुळे पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढते.
पिण्याचे पाणी दूषित होऊन आरोग्याला धोका निर्माण होतो.
3. हवामानावर परिणाम:
युरीयाचा अतिरेकी वापर हरितगृह वायूंच्या (जसे की नायट्रस ऑक्साईड) उत्सर्जनाला चालना देतो, ज्यामुळे जागतिक तापमानवाढ होते.
4. पिकांवरील परिणाम:
सुरुवातीला उत्पादन वाढते, पण दीर्घकाळात मातीच्या क्षमतेमध्ये घट होते.
अतिरिक्त नायट्रोजनमुळे झाडे नाजूक होतात आणि कीड-रोगांची शक्यता वाढते.
Urea Use दुष्परिणाम कमी करण्याचे उपाय:
- संतुलित खतांचा वापर करा (सेंद्रिय व रासायनिक खतांचे संयोजन).
- माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा वापर करा.
- एकात्मिक पोषण व्यवस्थापनाचा अवलंब करा.
- हरित खतांचा व कंपोस्टचा वापर वाढवा.
युरीयाचा योग्य वापर करून आपण मातीची गुणवत्ता टिकवून ठेवू शकतो आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमतेसाठी मदत करू शकतो.
हे ही वाचा…
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
प्रश्न1. पिकाला एक किलो नत्र देण्यासाठी किती युरिया द्यावा?
उत्तर: पिकाला एक किलो नत्र देण्यासाठी 2.17 किलो युरिया द्यावा.
प्रश्न2. युरियाचा वापर कमी करण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर कसा करावा?
उत्तर: युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझोटोबॅक्टर किंवा ॲसिटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. जिवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये 15 ते 20% नत्राची बचत होते.
प्रश्न3. युरियाचे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात?
उत्तर: युरियामुळे त्वचा, डोळे आणि श्वसनमार्गाला जळजळ होऊ शकते. ते अन्नमार्गात प्रवेश केल्याने विषबाधा होऊ शकते. नायट्रेटची उच्च पातळी प्रजनन आणि श्वसन प्रणाली, प्लीहा, थायरॉईड आणि मानवांमधील मुले आणि प्रौढांच्या मूत्रपिंडासाठी हानिकारक आहे. हे लहान मुलांसाठी देखील हानिकारक आहे.