Drone Subsidy ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान

सध्या शेतकरी कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण स्वीकारू लागले आहेत. यामुळे त्यांची वेळ आणि पैशचीही बचत होत आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये फवारणी तसेच कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामासाठी देखील ड्रोनचा वापर वाढत आहे. Drone Subsidy ड्रोनच्या या वाढत्या वापरामुळे रोजगार निर्मिती होऊन रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात  उपलब्ध होत आहेत.

Drone Subsidy
Drone Subsidy

केंद्र शासनानेही आपल्या कृषी यांत्रिकीकरण अभियानामध्ये ड्रोन चा समावेश केला आहे. आता शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान Drone Subsidy दिले जाणार आहे. सन 2024-25 या वर्षासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत 100 ड्रोन खरेदीसाठी, महाराष्ट्र राज्याचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ड्रोन साठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषी पदवीधर अशा लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान काय आहे?

पिकावर रोग आल्यास किंवा रोग होऊ नये म्हणून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना भरमसाठ खर्च येतो.

केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेअंतर्गत ड्रोन चा समावेश करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना करता येणार ड्रोनद्वारे फवारणी

पिकावर फवारणी करणे हे अतिशय मेहनतीचे काम आहे. अनेकदा मोठ्या पिकामध्ये, मोठ्या क्षेत्रावर किंवा पाणी साचलेले शेतात फवारणी करणे खूपच जीकिरीचे असते.

यामध्ये शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळही खर्च होतो. शिवाय काही कीटकनाशकामुळे मानवी जीवितास धोका उद्भवू शकतो. अशा परिस्थितीत ड्रोनद्वारे फवारणी करणे सोपे झाले आहे.

WhatsApp Image 2025 01 06 at 2.30.52 PM 1 1
Drone Subsidy

कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर याविषयीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणाला मिळणार अनुदान?

स्वतः शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था यांना 40 % म्हणजे 4 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. कृषी व तत्सम पदवीधर यांना 50 % म्हणजे 5 लाख रुपये अनुदान दिले जाईल. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व सीमांतक महिला शेतकरी यांना 50 % म्हणजेच 5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

अर्ज कोठे व कसा करावा?

सन 2024-25 मध्ये ड्रोन हे उपकरण शेतकऱ्यांना, ऑनलाईन पद्धतीने सवलतीच्या दरात मागवण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण या घटकात ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer यावर अर्ज करावेत.

Drone Subsidy लाभार्थ्यांची निवड

लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून अर्ज सादर करावेत. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्राप्त झालेल्या अर्जातून लकी ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होईल.

                आपल्याला ही माहिती आवडल्यास, आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

Leave a Comment