farmer id शेतकऱ्यांसाठी डिजिटल आयडी, काय आहेत फायदे…

तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे farmer id ‘किसान कार्ड’ असणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाकडे एक वेगळा आधार क्रमांक आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचे एक ओळखपत्र farmer id तयार केले जाणार आहे. यामध्ये शेतीसह शेतकऱ्यांची मूलभूत माहिती समाविष्ट केली जाणार आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेतजमिनीचे जिओ रेफरन्सिंग (भू-संदर्भीकरण) केले जाणार आहे.

farmer id
farmer id

farmer id किसान कार्ड म्हणजे काय?


देशातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत, डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने ‘फार्मर आयडी कार्ड’ तयार करण्याची योजना आखली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबाराला त्यांचा आधार क्रमांक लिंक करायचा आहे. सातबारावर एकापेक्षा अधिक नावे असल्यास त्या सर्वांचे आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य आहे. यात शेतकऱ्यांच्या जमीन नोंदीचा तपशील जोडला जाईल. तसेच या कार्डमध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहितीबरोबरच, पेरणी केलेल्या पिकाचा तपशीलही नोंदविला जाईल. भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ याच unique farmer id फार्मर आयडीच्या माध्यमातून मिळणार आहेत. जसे की, किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी मिळणारे 6000/- रुपये शेतकरी ओळखपत्र असल्याशिवाय मिळणार नाहीत.

“केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी “ॲग्रीस्टॅक” योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ‘युनिक फार्मर आयडी’ आणि त्यांच्या लँड रेकॉर्डला जोडण्याची ( लिंक करण्याची ) मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

फार्मर आयडी कसा काढायचा?

शेतकऱ्यांना farmer id हे ओळखपत्र देण्यासाठी देशभरात (प्रत्येक गावात) शिबिरे आयोजीत केली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी गावोगावी ज्या ठिकाणी कॅम्प होतात, त्या कॅम्पमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या सोबत सातबारा उतारा, आपले आधार कार्ड व आधार कार्ड सोबत लिंक असणारा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. गावातील शेतकऱ्यांनी या कॅम्पमध्ये उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक farmer id तयार करून घ्यायचा आहे. प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला एक युनिक आयडी दिला जाईल.

farmer id
farmer id

farmer id शेतकरी ओळखपत्राचे फायदे

1. पी. एम. किसान सन्मान योजनेचे अनुदान मिळवणे.

2. किसान क्रेडिट कार्ड बनवणे.

3. पिक विमा भरणे, त्याअंतर्गत परतावा मिळवणे.

4. जिओ रेफरन्सिंगचे माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीचे डिजिटल नकाशे उपलब्ध होतील. पीक व शेतीविषयक सर्वेक्षण करून घेता येईल.

5. शेतीमालाची एम.एस.पी. च्या दराने विक्री करणे.

6. कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत कृषी निविष्ठा व इतर सेवांचा लाभ मिळवणे.

7. कोणती पेरणी करायची, बियाणे कोणते वापरायचे? याबाबत कृषी तज्ञांचे योग्य ते मार्गदर्शन मिळवणे.

8. तसेच जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी हे farmer id कार्ड आवश्यक ठरणार आहे.

9. सध्या शेतकऱ्यांना कृषी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक वेळी पडताळणी करावी लागते. यासाठी खर्चही होतो, वेळ वाया जातो आणि मनस्ताप होतो, तो वाचणार आहे.

10. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात ते वाचणार आहेत.

11. बँकांच्या जाचाशिवाय घरबसल्या ऑनलाईन पीक कर्ज उपलब्ध होणार आहे.

12. या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे शेतीसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा जसे की माती परीक्षण, माती आयडी कार्ड उपलब्ध होणार आहेत.

इतकेच नाही तर सरकारलाही या farmer id कार्डच्या माध्यमातून कोणता शेतकरी, कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत आहे. कोणत्या शेतकऱ्याकडे कोठे, किती जमीन आहे; हे एका क्लिकवर समजणार आहे.

चालू हंगामात किती शेतकऱ्यांनी, कोणते पीक घेतले हे समजणार आहे.

या (data base) माहिती संचावरून  शेतकऱ्यांना पीकाविषयी वेळोवेळी, हवामानातील बदलानुसार योग्य ते मार्गदर्शन करणे सुलभ होणार आहे.

त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांनी युनिक फार्मर आयडी farmer id तयार करून घेणे महत्वाचे ठरणार आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने गावोगावी होणाऱ्या या कॅम्पमध्ये सहभागी होऊन आपला फार्मर आयडी क्रमांक काढावा…

1 thought on “farmer id शेतकऱ्यांसाठी डिजिटल आयडी, काय आहेत फायदे…”

Leave a Comment