Maize: Dietary Importance and maize process busineass

मकाचे आहारातील महत्त्व व प्रक्रीयायुक्त पदार्थ

तृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात, जनावरांसाठी पशुखाद्य (Animal Feed) आणि कुक्कुट खाद्य (Poultry Feed) म्हणून उपयुक्त आहे. अनेक देशांमध्ये मका हे गरीब कुटुंबांचे मुख्य अन्न आहे. पारंपरिक पद्धतीने मका जात्यावर / गिरणींमध्ये दळून त्याच्या पिठाचा वापर भाकरी / रोटी बनविण्यासाठी केला जातो. मक्यापासून विविध प्रकारच्या maize process प्रक्रिया करून अनेक प्रक्रिया पदार्थ आणि औषधी उत्पादने तयार करता येतात.

Maize: Dietary Importance and maize process busineass
Maize: Dietary Importance and maize process busineass

मका हे पीक उष्ण हवामानात वाढणारे असल्यामुळे याचे उत्पादन अनेक देश मुख्य पिक म्हणूनही करतात यामध्ये अमेरिकेतील, पेरू, इक्वाडोर, बोलिव्हिया अश्या देशांचा समावेश आहे. मका पिकविणाऱ्या देशांचा जर विचार केला तर अमेरिका सर्वात वरच्या क्रमांकावर असून जगात मका उत्पादनात भारताचा ९ वा क्रमांक लागतो. भारतात मक्याची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड होते. उत्तर भारतात मक्याचा उपयोग आहारात मोठ्या प्रमाणात होतो.

मका हे जगातील तिसरे महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे.

मका पिकाचे विविध प्रकार आहेत. प्रकारानूसार मक्याचे विविध वाण आहेत.

१) साधा मका – अन्नधान्य म्हणून, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य तसच मूल्यवर्धीत पदार्थ तयार करण्यासाठी साधा मका वापरला जातो.   

२) प्रथिनयुक्त मका – अन्नधान्य म्हणून आणि मूल्यवर्धीत पदार्थ निर्मीतीसाठी प्रथिनयुक्त मका उपयुक्त आहे. मक्याच्या शक्ती-१ या जास्त प्रथिनयुक्त जातीपासून लहान मुलांसाठी प्रथिनयुक्त आहार करता येतो.

३) चाऱ्यासाठी मका – बऱ्याच भागात जनावरांच्या आहारातील मका हे प्रमुख चारा पीक आहे. हिरव्या मक्यापासून उत्तम प्रतीचा मूरघास तयार करता येतो.

मका पिकाची लागवड आणि व्यवस्थापनासाठी या लिंक वर क्लिक करा.

मक्यामध्ये अन्नघटकांचे प्रमाण:

मक्याचे दाण्यामध्ये स्टार्च ६७.७४%, फॅट ३.९ ते ५.८%, प्रथिने ८.१ ते ११.५%, मिनरल १.३७ ते १.५ %, साखर १.१६ ते १.२२% असते. हे प्रमाण वेगवेगळ्या वाणाच्या उत्पादनात कमी – अधिक असते.

मकामध्ये ‘अ’ जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते ज्याच्यामुळे आपल्याला रातआंधळेपनावर मात करता येते.

मक्यावर दोन प्रकारे प्रक्रिया करतात.

कोरडी प्रक्रिया :-

कोरड्या प्रक्रियेमध्ये मकास अंकुरविरहित प्रक्रिया करून त्यापासून  कणी,रवा,पीठ, पोहे,  आणि पशुखाद्य तयार करता येते.

ओली प्रक्रिया:-  

ओल्या प्रक्रियेमध्ये बियास अंकुर आणून  आणून मग प्रक्रिया करतात व त्यावर  प्रक्रिया करून आपण तेल, सायरप, स्टार्च, डेक्ट्रोज साखर पेये, जीवनसत्त्वे, अॅमिनो अॅसिड, औषधे, सेंद्रिय आम्ले व अल्कोहोल इ.प्रकारचे पदार्थ बननवू शकतो.

प्रक्रियायुक्त पदार्थ

            मक्यापासुन विविध पृक्रियायुक्त पदार्थ पदार्थ तयार करतात त्यामध्ये पोहे,कॉर्नतेल, हाय फ्रक्टोज सिरप, लॅक्टिक अॅसिड, ग्लुटेन, स्टार्च एत्यादी पदार्थ बनवता येतात

१) पोहे, रवा,पीठ:-

जसे आपण गव्हाची मळणी व दळणी करतो तसेच मकाची दळणी हि  मिलिंग मशीन द्वारे किवा दळणीयंतत्रा द्वारे करून आपनाला पोहे, रवा, पीठ बनवता येतात.

२) कॉर्नतेल :-

मुख्यतः मक्याच्या अन्कुरापासून आपल्याला कॉर्नतेल मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या  प्रेशर मसीन वापरून आपल्याला  यातून तेल काढता येते. हे तेल जगातील उत्कृष्ट तेल असून मानवी आरोग्यास चांगले असते. त्यामुळे याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. तसेच भिजलेल्या बियाच्या लगद्यावर प्रक्रिया करून  आपल्याला इथेनॉलही  मिळते.

3) हाय फ्रक्टोज सिरप :-

आयसोमेरिझम या तंत्राचा वापर करून दोन हाय फ्रक्टोज सिरप तयार केला जातो. हा सिरप साखरे इतकाच किंबहुना त्यापेक्षाही ४२% जास्त गोड आहे. यामुळे अन्न उत्पादनाच्या याचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो.

४) लॅक्टिक अॅसिड :-

मक्यापासून लॅक्टिक अॅसिड मिळते त्याचा उपयोग फळांची जेली, अर्क, पेये, मिठाई लोणची अशा पदार्थांना स्वाद आणण्यासाठी होतो.

५) ग्लुटेन :-

तसेच मक्यापासून ग्लुटेन हे वेट मिलींग प्रक्रियेतून तयार होते. यात प्रथिने व अन्नद्रव्ये असतात.  हे ग्लुटेन औषधांच्या गोळ्यांचे आवरण बनवण्यासाठी वापरतात.

६) स्टार्च:-

मक्याच्या दाण्यापासून उत्तम प्रकारचे स्टार्च मिळते या स्टार्चचा उपयोग प्लास्टिक, अक्रीलक, अडेसिव्ह, कास्टिंग, मोल्ड, असिड, इ. बनवण्यासाठी साठी केला जातो.

Maize 1
मकाचे आहारातील महत्त्व व प्रक्रीयायुक्त पदार्थ

इतर उपयोग :-

साधा मका अगर कोवळे दाणे असणारे कणीस भाजून अगर उकडून खाण्यासाठी मोठा वापर केला जातो.

याचा वापर बेबी सूप, सलाड, वडा, भजी,भाजी इ.साठी उपयोग होतो.

अनेक देशांमध्ये मका हे गरीब कुटुंबांचे मुख्य अन्न आहे. पारंपरिक पद्धतीने मका जात्यावर / गिरणींमध्ये दळून त्याच्या पिठाचा वापर भाकरी / रोटी बनविण्यासाठी केला जातो.

मका Maize जेल आइसक्रीम आणि बेकरी व्यवसायात वापरतात.

इथेनॉल तयार करता येते. मद्यार्क कणीपासून अल्कोहोल, बिअर, विस्की, इ. तयार करतात.

मकासाखर औषधांमध्ये तसेच बेकरी व्यवसायामध्ये वापरली जातात.

पाचक प्रणाली – मक्याच्या कणीसामध्ये फायबर असते. हे पाचक प्रणाली सुधारण्यात मदत करते. याद्वारे गॅस, आंबटपणा आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते. हे पाचन तंत्र निरोगी ठेवते.

डोळ्यांसाठी – मक्याच्या कणीसामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि जीवनसत्त्वे असतात. ते डोळे निरोगी ठेवतात. आहारात मक्याच्या कणीसाचा समाविष्ट केल्याने दृष्टी सुधारू शकते.

कोलेस्ट्रॉलसाठी – मक्याच्या कणीसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉ लची पातळी कमी करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये जीवनसत्त्वे असतात. हे नवीन पेशी तयार करते. हे मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यास मदत करते.

कर्करोग रोखण्यासाठी – फिनोलिक फ्लॅव्होनॉइड्स अँटीऑक्सिडेंट मक्याच्या कणीसामध्ये असतात. कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी हा एक चांगला स्त्रोत आहे. याशिवाय त्यात फ्यूरिक अॅसिड असते. हे कर्करोगापासून संरक्षण करण्यात मदत करते.

रक्तातील साखर नियंत्रण – स्टार्च आणि फायबर मक्याच्या कणीसामध्ये असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आपण आपल्या आहारात याचा समावेश करू शकता. प्रतिकारशक्ती – मक्यामध्ये मॅग्नेशियम आणि आर्यन मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. मक्यामध्ये झिंक आणि फॉस्फरस हेही असल्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते.

प्रतिकारशक्ती – अनेक लोक नेहमीच आजारी पडतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशांनी आपल्या आहारात मक्याचे कणीस घ्यावे कारण त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, जस्त, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.

माहीती आवडल्यास शेतकऱ्यांना, ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा…

ए. सी. रासकर/के. के. गिराम

Leave a Comment