Soyabean lagwad:सोयाबीन लागवड सुधारित तंत्रज्ञान

प्रस्तावना:  सोयाबीन हे भारतातील तेलबिया पिकापैकी एक मुख्य पीक आहे. देशातील या पिकाखालील क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्राचा मध्य प्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो सोयाबीन पिकाच्या मुळावरील गाठी मुळे ६० ते १०० किलो/ हेक्टर नत्र जमिनीमध्ये स्थिरीकरण केले जाते, तसेच सोयाबीनच्या पानगळीमुळे आपल्या शेतात सेंद्रिय कर्ब वाढतो. कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन व चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. त्यासाठीच, Soyabean lagwad सुधारित तंत्रज्ञान समजून घेणे गरजेचे आहे.

Soyabean lagwad

Soyabean lagwad
Soyabean lagwad

जमिनीची निवड:

Soyabean lagwad: सोयाबीन या पिकासाठी मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची, गाळाची जमीन योग्य असते. हलक्या जमिनीमध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी येते. ज्या जमिनीत पाणी साठवून राहते त्या जमिनी सोयाबीनची उगवण (Germination) चांगली होत नाही.

पूर्वमशागत:

जमीन खोल नांगरून उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी १० टन वापरावे.

बेसल डोस:

रासायनिक खताचे मात्रा प्रति एकर (माती परीक्षणाच्या अहवालानुसार रासायनिक खत व्यवस्थापन करावे)

१.युरिया ४० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २०० किलो, एम ओ पी३० किलो, निंबोळी पेंड ५० किलो, गंधक १० किलो पेरणीच्या वेळी द्यावे. किंवा

२. 12:32:16 १००किलो, निंबोळी पेंड ५० किलो, गंधक १० किलो.

वरीलपैकी कोणताही १ डोस वापरू शकता.

सर्व खते एकत्रित मिसळून पेरणीपूर्वी जमिनीवर विस्कटून द्या, नंतर सरी सोडा.

किंवा दोन चाड्यांच्या पापरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून घ्या.

सोयाबीन हे द्विदल वर्गीय पीक असल्यामुळे संपूर्ण रासायनिक खतांची मात्रा पेरणीच्या वेळेसच द्यावी.

पेरणी व लागवडीचे अंतर:

खरीप मध्ये १५ जून ते १५ जुलै दरम्यान पेरणी करावी.

किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, पेरणी करताना जमिनी किमान ६ इंच ओल असावी.

बियाणाची खोली: हलक्या जमिनीत ५ सेंटीमीटर व भारी जमिनीत ३ सेंटीमीटर पर्यंत पेरणी करावी.

साडेतीन फुटी सरीला दोन बगली नऊ इंचा वरती ३ बिया.

ऊस पिकामध्ये सोयाबीन आंतरपीक असेल तर भुंड्यावरती एक ओळ, नऊ  इंचावर ३ बिया.

Soyabean lagwad-बियाणे निवड:

सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे विकत घेण्याची आवश्यकता नाही ज्यावर्षी आपण प्रमाणित बियाणे विकत घेऊन वापरले जाईल त्यानंतर ते बियाणे आपण तीन वर्षासाठी वापरू शकतो.

जर घरगुती बियाणे वापरायचे असेल तर पेरणी करण्यापूर्वी त्यांची उगवण क्षमता चाचणी करून पहावी. यामध्ये जर ७० टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असेल तर ते बियाणे म्हणून पेरणीस वापरावे परंतु उगवण क्षमता ६० टक्के असल्यास १० टक्के अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे.

आपल्या जमिनीच्या मगदूराप्रमाणे आपण कोणते वाण पेरावे? याविषयीची माहिती जाणून घेऊया…

जमिनीनुसार सोयाबीन वाणाची निवड:

भारी जमिनीसाठी:

जर तुमची जमीन भारी असेल, तर पाण्याची उपलब्धता असेल, तर तुम्ही मध्यम ते उशिरा येणाऱ्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे.  कारण जेवढे वाण उशिरा येईल तेवढे भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन सोयाबीनचे मिळू शकते. त्यामुळे भारी जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळवून देणाऱ्या वानांमध्ये फुले संगम, फुले किमया, फुले दूर्वा, पी.के.व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस -१००३९),एम. ए.यु.एस-७१, एम. ए.यु.एस- ६१२, फुले कल्याणी अशा प्रकारची सोयाबीनचे वाण भारी जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात वापरली जातात.

मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी :

जर तुमची जमीन मध्यम स्वरूपाची असेल, तर त्या जमिनीमध्ये सोयाबीनचे वाण निवडताना ९५ ते १००दिवसांमध्ये येणाऱ्या वानाची निवड करा. एम.ए.सी.एस.-१४६०, आर.व्ही.एस.एम.- १८, एम.ए.यु.एस-१५८, एम. ए.यु.एस.- ६१२, जे.एस. – ३३५, जे.एस.- ९३०५, पी.के. व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस-१००३९), एम.ए.यु.एस.- ७२५ अशा प्रकारचे सोयाबीनचे वाण मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये निवडणे योग्य ठरेल.

हलक्या जमिनीसाठी:

हलकी जमीन असेल, तर त्या जमिनीमध्ये कमीत कमी कालावधीमध्ये येणाऱ्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे, कारण जास्त कालावधी मध्ये येणाऱ्या वाणाची निवड केल्यास व पाण्याची उपलब्धता नसल्यास हलक्या जमिनीतील सोयाबीनचे पीक वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हलक्या जमिनीसाठी ८५ ते ९० दिवसांमध्ये येणाऱ्या वाणाची निवड करणे योग्य ठरविता येईल. एम.ए.सी.एस. -१४६०, आर.व्ही.एस.एम.-१८, एम.ए.यु. एस-१५८, एम. ए.यु.एस.-६१२, जे.एस. -३३५, जे.एस.-९३०५, पी.के. व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस-१००३९), एम.ए.यु.एस.-७२५ या जातींची निवड हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर करावी.

प्रति एकरी बियाणाचे प्रमाण:

पेरणीसाठी: ३० किलो

बी बी एफ यंत्राद्वारे पेरणी करण्यासाठी: २० ते २२ किलो

टोकन पद्धतीसाठी: १५ ते १८ किलो

बीजप्रक्रिया:

बियाण्याचे रोग व किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या क्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. यामुळे बिया भोवती सुरक्षित कवच तयार होते व रोपांना जमिनीत प्रस्थापित होण्यास मदत होते. बियाण्यांची उगवण उगवण शक्ती वाढून उत्पादनात वाढ होते परिणामी रोग नियंत्रणाच्या खर्चात बचत होते.

बीज प्रक्रिया करताना सगळ्यात अगोदर बुरशीनाशकाची नंतर कीटकनाशकाची व शेवटी जैविक बीजप्रक्रिया करावी.

बुरशीनाशक(Fungicide).. कीटकनाशक (Insecticide).. जैविक (Rhizobium)

“१०किलो बियाण्यासाठी बीजप्रक्रिया”

बुरशीनाशक: कॉर्बोक्सिन ३७.५ % + थायरम ३७.५ %ws…३०ग्रॅम, किंवा ५० ग्रॅम ट्रायकोडर्मा

कीटकनाशक: थायमेथॉक्साम ३० % FS… १००मिली (गरजेनुसार थोडे पाणी)

जैविक: २५० ग्रॅम रायझोबियम + २५० ग्रॅम पी. एस. बी. +  २५० ग्रॅम के. एस. बी.

कृषी विभागाच्या शिफारशीनुसार सोयाबीन बियाण्यांचे काही सुधारित वाण:

१. के डी एस ७५३ फुले किमया .. कालावधी ९५ ते १०० दिवस

२. के डी एस ७२६ फुले संगम .. कालावधी ९० ते १०५ दिवस

३. के डी एस ३४४ फुले अग्रणी .. कालावधी ९० ते १०५ दिवस

४. एम ए यु एस १५८ भट .. कालावधी ९३ ते ९८ दिवस

५. डी एस २२८ फुले कल्याणी .. कालावधी ९५ ते १०५ दिवस

६. जे एस ९३०५ .. कालावधी ९० ते ९५ दिवस

७. ए एम एस १००१ पीडीके व्ही यलो गोल्ड .. कालावधी ९५ ते १०० दिवस

८. एम ए सी एस ११५८ .. कालावधी ९५ ते १०० दिवस

तणनाशके वापर करावयाचा असल्यास:

उगवणीपूर्वी:

पेरणीनंतर २४ ते ४८ तासाच्या आत ऑक्सिफ्लोरफेन (गोल) प्रति लिटर १ मिली किंवा पेंडामिथिलिन प्रति लिटर १ मिली फवारणी करावी.

उगवणीनंतर:

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी एमेझिथायपर (१०%SL)प्रति लिटर २ मिली फवारणी.

आंतरमशागत:

  • आवश्यकतेनुसार सोयाबीनमध्ये दोन कोळपण्या कराव्यात.
  • पहिली कोळपणी पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी.
  • दुसरी कोळपणी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी.
  • तसेच आवश्यकतेनुसार एक ते दोन हात खुरपणी करावी.
  • सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना(पीक ४०ते६० दिवसाचे असताना) कोणतीही आंतरमशागत करू नये.
Soyabean lagwad
Soyabean lagwad

पाणी व्यवस्थापन:

सोयाबीन हे खरीप हंगामातील पीक असल्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता नाही. परंतु सोयाबीनच्या काही संवेदनशील अवस्थेत पावसाने ताण दिल्यास खालील अवस्थेत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

  • पिकाला फांद्या फुटताना म्हणजेच पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी.
  • फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी.
  • शेंगा भरण्याच्या अवस्थेत साधारणतः पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी.

Soyabean lagwad-एकात्मिक कीड व्यवस्थापन:

चिकट सापळे: रस शोषणाऱ्या किडीसाठी.. पिवळे १०-१५ चिकट सापळे व निळे ५ चिकट सापळे प्रति एकरी लावावे.

कामगंध सापळे: तंबाखू वरील पाने खाणारी अळी व घाटे आळी साठी.. ४-५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावे.

पक्षी थांबे: अळीवर्गीय किडीसाठी.. किमान वीस पक्षी थांबे प्रति एकरी लावावे.

रासायनिक पीक संरक्षण व विद्राव्य खतांचा फवारणी द्वारे वापर:

आपल्या कृषी सेवा केंद्राच्या सल्ल्यानुसार फवारणीचे नियोजन करावे.

काढणी:

सोयाबीनच्या शेंगांचा रंग पिवळट तांबूस झाल्यानंतर काढणी करावी. किंवा जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार ९५ ते ११० दिवसात काढणी करावी. पिक काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते. लेख आवडल्यास इतरांना शेअर करा… धन्यवाद!

1 thought on “Soyabean lagwad:सोयाबीन लागवड सुधारित तंत्रज्ञान”

Leave a Comment