soyabean farming tips: सोयाबीन पीक सल्ला- सोयाबीन तण व्यवस्थापन- सोयाबीन कीड नियंत्रण- सोयाबीन फवारणी नियोजन

सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादनासाठी, शेतातील परिस्थिती लक्षात घेऊन खालील शिफारशींचा soyabean farming tips (टिप्सचा) वापर करावा.  गरजेनुसार स्थानिक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

soyabean farming tips
soyabean farming tips

सोयाबीन तण व्यवस्थापन:

सोयाबीन पिकाला सर्वसाधारण 15 दिवसापासून 25 दिवसांपर्यंत एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून तण नियंत्रण करावे. तणनाशकाचा वापर करायचा झाल्यास तज्ञांच्या सल्ल्यानुसार, आपल्या शेतातील तण रुंद पानाचे आहे, अरुंद पानाचे आहे का दोन्ही प्रकारचे आहे, आंतरपीक कोणते आहे या सर्व बाबींचा विचार करून तणनाशकाची निवड करावी.

गरजेनुसार सोयाबीन पिकात पेरणीनंतर साधारणतः 15 ते 20 दिवसांनी पहिली भांगलनी/डवरणी करावी. त्यानंतर दुसरी भांगलनी/डवरणी 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान म्हणजेच फुले लागण्याच्या आधी करावी. पिकाच्या फुलोरा अवस्थेत कोणतीच अंतरमशागत करू नये.

सोयाबीन कीड नियंत्रण:

सोयाबीन मधील किडीच्या प्रतिबंधासाठी सुरुवातीच्या अवस्थेत शेत  तणमुक्त ठेवावे, जेणेकरून चक्रीभुंगा किंवा खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही.

पिकामध्ये अगदी सुरुवातीला केसाळ अळी किंवा तंबाखू वरील अळी चा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्या अळया जाळीदार पानासह हाताने गोळा करून नष्ट कराव्यात.

पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत किडींच्या प्रतिबंधासाठी पहिल्या फवारणी मध्ये 5% निंबोळी अर्काचा वापर करावा.

सोयाबीन पिकामध्ये एकरी 8 ते 10 ‘T’ आकाराचे पक्षी थांबे तसेच 24 पिवळे चिकट सापळे लावावेत. यामुळे किडीबरोबरच पांढरी माशी तसेच खोडमाशीचे नियंत्रण होईल.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या वरील सर्व बाबींचा वापर करूनही पिकामध्ये चक्रीभुंगा किंवा उंटअळी आढळून आल्यास,

प्रोफेनोफोस 50% प्रवाही 25 ते 30 मिली प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी.

किंवा

कोराजन (क्लोरएन्ट्रा निलिप्रोल 18.5 % एस. सी.) 6 मिली प्रति 15 लिटर पंप.

किंवा

इमामेक्टिन बेंजोएट 5% एसजी 10 ग्राम प्रति 15 लिटर पंप. याप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी.

रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी लेबल क्लेमची (कोण-कोणत्या पिकासाठी, कोणत्या किडीसाठी इ.) शिफारस पहावी, प्रमाणानुसारच कीडनाशकाचा वापर करावा.

मागील काही वर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव पाहता ऑगस्ट मध्ये येणाऱ्या तंबाखू वरील अळीच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये कामगंध सापळे पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते दीड फूट उंचीवर लावावेत.

soyabean farming tips
soyabean farming tips

सोयाबीन खत व्यवस्थापन:

सोयाबीन पिकामध्ये पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी 2% युरिया किंवा 19:19:19  50ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे फवारणी करावी.

soyabean farming tips पीक संजीवकांचा वापर करावयाचा झाल्यास शिफारशीनुसारच करावा, अतिरेक टाळावा.

बरेचदा पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पाने पिवळी पडून वाढ खुटलेली दिसते अशावेळी 19:19:19 या विद्राव्य खताची फवारणी करावी. लोहाची कमतरता असल्यामुळे सुद्धा पाने पिवळी पडतात. अशा वेळी 10ग्रॅम चिलेटेड फेरस सल्फेट व 2ग्रॅम चुना मिसळून फवारणी करावी. पिकाचे निरीक्षण करून नेमकी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे याची शहानिशा करून तज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.

रासायनिक खते किंवा अन्नद्रव्य ही जास्त एकत्र मिसळून फवारणी टाळावी.

सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण पडल्यास किंवा पावसाचा खंड पडल्यास पोटॅशियम नायट्रेट(13:00:45)100 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी.

अति पाऊस झाल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी पेरणीपूर्वी सरींचे नियोजन करावे. पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने ठराविक अंतरावर चर पाडून अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. संततधार पाऊस असल्यास अतिरिक्त पाण्यामुळे पीक जमिनीतील अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकत नाही. परिणामी पिकाची वाढ खुंटते. यासाठी फवारणी द्वारे पोटॅशियम नायट्रेट(13:00:45) प्रति पंप 70 ते 100 ग्रॅम घेऊन फवारणी करावी.

पीक फुलोऱ्यावर असताना सुरुवातीच्या टप्प्यावर(तज्ञांच्या सल्ल्याने) नायट्रोबेंझिन 20%  30मिली प्रति पंप याप्रमाणे फवारणी करू शकता.

काही भागात सोयाबीनच्या पिकावर मुख्यत्वे पिवळा मोझॅक हा रोग दिसत आहे. या रोगामध्ये पानांवर पिवळे व हिरव्या रंगाचे चट्टे दिसतात. हळूहळू ते पूर्ण झाडांमध्ये पसरत जाऊन संपूर्ण झाडाची पाने पिवळी पडतात.  या रोगाचा प्रसार पांढरी माशी व मावा या रसशोषक किडींच्या माध्यमातून होतो.

या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी, पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस या रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

अशा शेतात पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता, soyabean farming tips शिफारशीनुसार फवारणी करावी.

बीटा सायफ्लुथ्रिन 8.49% अधिक इमिडाक्लोप्रीड 19.81% ओ.डी. (सोलोमन) हे संयुक्त कीटकनाशक 10 ते15 मिलि प्रती पंप.

किंवा

थायामेथोक्झाम अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन(अलीका) हे संयुक्त कीटकनाशक  5 मिलि. प्रति पंप फवारणीत वापरावे.

सतत व अधिक पावसामुळे काही भागात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य ॲंथ्रॅकनोज (पानावरील / शेंगावरील बुरशीजन्य ठिपके), रायझोेक्टोनिया एरिएल ब्लाईट (करपा) व रायझोेक्टेानिया रूट राॅट (मुळकुज/खोडकुज) या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सोयाबीन पिकावर बुरशीजन्य ठिपके किंवा करपा या रोगाचे लक्षणे आढळून आल्यास खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.

  • हेक्झाकोनॅझोल 5% इ.सी.(कॉन्टाफ) 20 ते 25 मिलि.प्रती पंप

किंवा

  • टेब्युकोनॅझोल 25.9 ई.सी.(फॉलिक्युअर) 20 मिलि. प्रती पंप

किंवा

  • टेब्यूकोनाझोल10% अधिक सल्फर 65%डब्ल्यू.जी.(स्वाधीन, हारू) या मिश्र बुरशीनाशकाची 30 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करू शकता.

सोयाबीन पिकाविषयी अधिक माहिती हवी असल्यास खालील लिंक वर क्लिक करा. 👇

https://marathisheti.in/soyabean-crop

शेतकरी मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास, तुमच्या मित्रांना पाठवा. आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा…

3 thoughts on “soyabean farming tips: सोयाबीन पीक सल्ला- सोयाबीन तण व्यवस्थापन- सोयाबीन कीड नियंत्रण- सोयाबीन फवारणी नियोजन”

Leave a Comment