सर्वसामान्य गरीब नागरिक हा केंद्रबिंदू मानून राज्य शासन विविध योजनाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यांमध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवत ‘लाडका शेतकरी अभियान 2024’ Ladka Shetkari Abhiyan राज्यात सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रात होत असलेल्या क्रांतीची, नवीन बदलांची माहिती मिळावी, आधुनिक शेतीला चालना मिळून राज्यातील कृषि क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी कृषि विभागाने परळी येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे. ड्रोनद्वारे फवारणी, नॅनो युरिया, नॅनो डीएपी वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जवळपास 30 टक्क्यांनी कमी होवून उत्पन्नात जवळपास 20 टक्के वाढ होईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील कृषि महोत्सव 2024 येथे व्यक्त केला.
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गतवर्षी सोयाबीन, कापूस या पिकांना कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी आवश्यक ई-पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आता ई-पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री पिक विमा योजना:
शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी’ हेच शासनाचे धोरण असून राज्यातील कांदा, सोयाबीन, कापूस आणि दुधाला योग्य मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टल:
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. तसेच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यासोबतच परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
Ladka Shetkari Abhiyan विशेष आकर्षण:
पाच दिवसीय चालणाऱ्या या कृषि महोत्सवात कृषि साहित्य प्रदर्शनासोबतच पशुप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसात विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होणार आहे. तसेच याठिकाणी धान्य, रानभाजी महोत्सव होणार आहे. प्रदर्शनात महिला बचतगटांसाठी साहित्य विक्रीची दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा स्वतंत्र विभाग देखील याठिकाणी आहे. या पाच दिवसीय महोत्सवाला राज्यातील शेतकरी बांधवानी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रात न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगून ते म्हणाले की, केवळ 1 रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे कृषिमंत्री श्री. चौहान म्हणाले.
सर्वसामान्य गरीब नागरिक हा केंद्रबिंदू मानून राज्य शासन विविध योजनाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. राज्यातील सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
5 दिवसीय कृषि महोत्सवात शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगांची माहिती देण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून 400 पेक्षा अधिक दालनांतून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, प्रयोगांची माहिती दिली जाणार असल्याने त्यांचे उत्पन्न वाढीसाठी हा महोत्सव Ladka Shetkari Abhiyan उपयुक्त ठरेल.
या दिमाखदार सोहळ्यास केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच विधानपरिषद सदस्या आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमातील प्रमुख बाबी/घोषणा:
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात.
परळीत दिमाखदार सोहळ्यात राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन.
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हफत्याचे वितरण; एका क्लिकवर 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा.
Ladka Shetkari Abhiyan-सोयाबीन-कापूस अनुदान वितरणाच्या पोर्टलचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण.
सरकारला बहीण, भाऊ आणि शेतकरी सुद्धा लाडका, हे आम्ही कामातून सिद्ध केलं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2023च्या सोयाबीन-कापूस अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द – धनंजय मुंडेंची मागणी अन मुख्यमंत्र्यांची घोषणा
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी 6 हजार कोटी रुपयांची तरतूद – देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना मोफत व दिवसा वीज देणार, महाराष्ट्र जलसंपन्न बनवण्यासाठी कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील पीक विम्याचे संपूर्ण पैसे अदा करू – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान
नॅनो खतांच्या वापरासाठी राज्याला पाठबळ देणार – चौहान यांची घोषणा
महाराष्ट्राच्या कृषी महोत्सवाचे चौहान यांच्याकडून कौतुक.
शेतीविषयक आणखी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
2 thoughts on “Ladka Shetkari Abhiyan 2024 लाडका शेतकरी अभियान 2024: मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा.”