आपल्या रोजच्या जेवणातील पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी आणि अन्नपदार्थ सजवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर हमखास केला जातो. अगदी सकाळच्या नाश्त्याचे पोहे असोत, की संध्याकाळच्या जेवणातील झणझणीत रस्सा असो, प्रत्येक गृहिणीची पहिली पसंती कोथिंबीरीलाच असते. कोथिंबिरीचा वापर हा घरा-घरांमध्ये, हॉटेलमध्ये, लग्न समारंभ व जेवणावळीचे कार्यक्रमात चटणी, कोशिंबीर, कोथींबीरीच्या वड्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे या कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. व्यवस्थित नियोजनपूर्वक कोथिंबीर लागवड kothimbir lagwad करून आपण हमखास नफा मिळू शकतो.
हवामान:
कोथिंबिरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते. अति पावसाचा प्रदेश सोडून वर्षभर कोथींबीरीची लागवड केली जाते. खरीप, रब्बी व उन्हाळी या तिनही हंगामात हे पीक घेतले जाते. उन्हाळ्यात एप्रिल, मे महिन्यातील लागवड विशेष फायदेशीर ठरते, कारण या काळात मागणी वाढलेली असते आणि उत्पादन कमी निघते. कारण 35 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यास उत्पादनात घट येते. 20 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची चांगली वाढ होते.
जमीन:
कोथिंबीर पिकाच्या लागवडीसाठी भारी, मध्यम कसदार, परंतु पाण्याचा निचरा होणारी जमिनी निवडावी. सेंद्रिय खते भरपूर असलेले हलक्या जमिनीतही कोथिंबीरीचे चांगले पीक घेता येते. जमिनीचा pH 6 ते 8 च्या दरम्यान असावा.
बियाणे/सुधारित वाण:
कोथिंबीर लागवडीसाठी शेतकरी गावरान धने किंवा संकरित वाणांची निवड करतात. सुधारित वाणांमध्ये खालील व्हरायटी भरघोस उत्पादन मिळवून देतात.
kothimbir lagwad सुधारित वाण: रुची, कास्ती, गौरी, सुरभी, जळगाव धना, हिसार सुगंध, V-1, V-2, पंचगंगा, प्रिया, जयपुर, अर्का किरण, अर्का वैभव, पंजाब कोथिंबीर-1, कोईमतुर-1, J-214, D-92, K-45, RCR-684 इत्यादी.
पेरणीसाठी एकरी 25 किलो बियाणे वापरा.
पेरणीआधी लाकडी फळीने रगडून धने फोडावेत.
पेरणीपूर्वी बियाणे 12 तास भिजत ठेवावेत.
पेरणीआधी बियाण्यास बीजप्रक्रिया जरूर करावी.
kothimbir lagwad लागवडीचा हंगाम:
कोथिंबिरीची लागवड आपण वर्षभर करू शकतो. पण खालील हंगामात व्यवस्थित नियोजन केल्यास, बाजारपेठेचा अंदाज असल्यास निश्चित कमी कालावधीत भरपूर नफा मिळवू शकतो.
खरीप- जून, जुलै
रब्बी – ऑक्टोबर, नोव्हेबर
उन्हाळी – एप्रिल, मे महिन्यात.
पेरणी पद्धत:
कोथींबीरीच्या लागवडीसाठी शेत उभे-आडवे नांगरून चांगले भुसभुशीत करावे.
त्यानंतर एकरी 6 ते 8 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकावे. त्याबरोबर बेसल डोसही (एकरी DAP-50किलो, पोटॅश-25किलो, हुमिक ऍसिड -5किलो) टाकू शकता.
3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करून बियाणे समप्रमाणात पडेल, अशा पद्धतीने फोकून (फेकून) पेरावे.
बियाणे मातीने झाकून हलकेसे पाणी सोडा.
उन्हाळ्यात पेरणी करत असाल तर हे वाफे अगोदर भिजवून घ्यावेत आणि त्यानंतर वापसा आल्यावर पेरणी करावी.
तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर लगेच (48 तासापूर्वी) पेंडामिथेलिन 30% एकरी 700 मिलि. ते 1 लिटर फवारावे.
बियाणे भिजवून पेरले असल्यास 8 ते 10 दिवसात चांगले उगवून येईल. भिजवले नसल्यास 15 ते 20 दिवस लागतील. त्यानंतर पाणी देणे, खत व्यवस्थापन, फवारणी याकडे लक्ष द्यावे.
kothimbir lagwad कीड व रोग:
कोथिंबीर या पिकावर फारसे रोग व किडी दिसून येत नाहीत.
मर व भुरीचा प्रादुर्भाव कधीतरी दिसतो.
याच्या नियंत्रणासाठी खालील औषधांच्या फवारणी घ्याव्यात.
मर /कीड:
इमिडाक्लोप्रिड-17.8%sl (कॉन्फिडोर): 10मिली. प्रती पंप
किंवा
थायोमिथॉक्झाम-25%wg (ऍक्ट्रा किंवा अरेवा): 10 ते 15ग्रॅम प्रती पंप
भुरी:
साफ: 30ग्राम प्रती पंप
किंवा
इंडेक्स: 10ग्रॅम प्रती पंप
किंवा
नेटिवो: 10ग्रॅम प्रती पंप
पाणी व खत व्यवस्थापन:
बेसल डोस दिला असेल तर बियाणे उगवून आल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी एकरी 20 किलो युरिया द्यावा.
फवारणी करणार असाल तर उगवणीनंतर,
15 ते 20 दिवसांनी 19:19:19 – 50 ते 75 ग्रॅम प्रति पंप
25 ते 30 दिवसांनी 12:61:00 – 75 ग्रॅम प्रति पंप
35 ते 40 दिवसांनी 13:40:13 – 75 ग्राम प्रति पंप
45 दिवसानंतर 13:00:45 – 75 ग्रॅम प्रति पंप
या प्रमाणात फवारणी घेऊ शकता. पिकाचे निरीक्षण करून मायक्रोन्यूट्रिएंट, टॉनिक, कीटकनाशक, बुरशीनाशक यांचा फवारणीत समावेश करावा.
कोथिंबीर पिकास नियमित पाणी देणे आवश्यक आहे. हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, तर उन्हाळ्यात दर 5 दिवसांनी पाणी द्यावे. आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे नियोजन करावे.
काढणी व उत्पादन:
पेरणीनंतर 2 महिन्यांनी कोथिंबिरीला फुले येतात. त्यापूर्वीच हिरवीगार, कोवळी, लुसलुशीत असताना कोथिंबिरीची काढणी करावी. म्हणजेच साधारण 15 ते 20 सेंमी. उंचीची, फुले येण्यापूर्वीची कोथिंबीर उपटून तिच्या जुड्या बांधाव्यात. गोणपाटात व्यवस्थित लपेटून, बांबूच्या टोपलीत व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवावी.
पावसाळा आणि हिवाळा या दोन हंगामात कोथिंबीर पिकाचे एकरी 4 ते 5 टन उत्पादन मिळते, तर उन्हाळ्यात 2.5 ते 3 टन उत्पादन निघते. चांगला नफा मिळवायचा असेल तर उन्हाळी कोथिंबीर फायदेशीर ठरते.
हे ही वाचा:
वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQ):
1. कोथिंबीरीची लागवड कधी करावी?
वर्षभर आपण कोथिंबिरीची लागवड करू शकतो परंतु खालील हंगामात केलेली लागवड फायदेशीर ठरते.
खरीप- जून, जुलै
रब्बी – ऑक्टोबर, नोव्हेबर
उन्हाळी – एप्रिल, मे महिन्यात.
2. पेरणीपूर्वी बियाणे किती वेळ भिजवायचे?
पेरणीपूर्वी साधारण 12 ते 24 तास बियाणे भिजत ठेवा.
3. बाजारपेठेसाठी कोथिंबीर किती दिवसात तयार होते?
बाजारपेठेसाठी हिरवी कोथिंबीर 45 ते 50 दिवसात तयार होते.