रासायनिक खतांच्या वापराने पीक उत्पादनात भरघोस वाढ झाली. परंतु दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किंमतीत वाढच होत आहे. तसेच या रासायनिक खतांच्या शिफारशींचे तंतोतंत पालन न झाल्यामुळे त्याचा अनिष्ठ परिणाम आपल्या शेत जमिनीवर होत आहे. आपण विशिष्ट पिकासाठी Khat vyavsthapan (अन्नद्रव्याचे व्यवस्थापन) करतो, त्यावेळी फक्त रासायनिक खतांनाच महत्व देतो आणि सेंद्रिय खते, जिवाणू खते, पाणी व्यवस्थापन, पिकांची फेरपालट याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम आपल्या जमिनीच्या भौतिक, रासायनिक, आणि जैविक घटकावर तर होतोच पण उत्पादनावरही होतो. रासायनिक खतांचे व्यवस्थापन/ Khat vyavsthapan करण्यापूर्वी आपल्याला जमिनीचे गुणधर्म, जमिनीत उपलब्ध असणारे अन्नद्रव्य आणि त्या पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्ये यांची माहिती असणे आवश्यक आहे. या सर्व घटकांचा ताळमेळ घालून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी पीक लागवडीपूर्वी,
आपल्या शेत जमिनीचे माती परीक्षण करावे.
माती परीक्षणातून आपल्याला जमिनीचे गुणधर्म आणि उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती होईल. आपण आजपर्यंत फक्त नत्र, स्फुरद आणि पालाश याच गोष्टींचा अन्नद्रव्य व्यवस्थापनात वापर करत होतो. परंतु माती परीक्षणामध्ये, आपल्याला सध्या दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ही दिसू लागली आहे. जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण या घटकांनाही Khat vyavsthapan खत व्यवस्थापनात दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे किमान तीन वर्षांनी माती परीक्षण करून घेऊन आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करावी. जेणेकरून कोण कोणती पिके घेतल्यानंतर या घटकांमध्ये काय बदल होतात हे लक्षात येईल.
Khat vyavsthapan एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन:
यावर उपाययोजना म्हणून जमिनीची योग्य मशागत करून जमिनीत चांगले कुजलेले शेणखत, गांडूळ खत यासारख्या सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा.
शक्य असल्यास मुख्य पीक लागवडी पूर्वी किंवा मुख्य पिकातच आंतरपीक म्हणून हिरवळीची पिके घेऊन ती फुलोरा अवस्थेत जमिनीत गाडावीत.
माती परीक्षण अहवालानुसार पिकाची पहिली खतमात्रा देताना शिफारशीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट, डीएपी, एमओपी, एसओपी यासारख्या खतांचा वापर करावा जेणेकरून पीक वाढीच्या अवस्थेत पिकांना त्याचा फायदा होईल.
पिकवाढीच्या अवस्थेनुसार दुसरी, तिसरी,… खतमात्रा देताना अगोदर पिकातील तन व्यवस्थापन करून युरिया, अमोनियम सल्फेट 24:24:00, 19:19:19 यासारखी सहज उपलब्ध होणारी विद्राव्य खतांची मात्र द्यावी.
यानंतर लगेच जमिनीची हलकी मशागत करून, पिकास पाणी द्यावे जेणेकरून ही अन्नद्रव्य पिकांना तात्काळ लागू होतील.
याप्रमाणे रासायनिक खतांचा संतुलीत वापर करताना मुख्य, दुय्यम, व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अंतर्भाव सुरुवातीपासूनच करावा, जेणेकरून वाढीच्या अवस्थेत त्यांची कमतरता भासणार नाही.
ऍझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, पीएसबी, रायझोबियम यांसारख्या जैविक खतांचा वापर आपण बीज प्रक्रिया करताना तसेच उभ्या पिकात सुद्धा करू शकतो. परंतु रासायनिक खताबरोबर यांचा वापर शक्यतो टाळावा.
जैविक आणि सेंद्रिय खतामुळे जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या आणि संचार वाढून जमीन सुपीक बनते.
त्यामुळे सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक या घटकांचा संतुलित समावेश हा आपल्या खत व्यवस्थापनामध्ये असला पाहिजे.
बरेचदा जमिनीतून दिलेली अन्नद्रव्य पिकांना योग्य त्या प्रमाणात उपलब्ध होतीलच असे नाही. परिणामी पिकाची वाढ, पातेगळ, फुलगळ, फळगळ, रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादनाची प्रत यावर परिणाम दिसून येतो.
फवारणीतून जर विद्राव्य खतांची पूर्तता केली तर या समस्या बऱ्याच अंशी कमी होतील.
अशा पद्धतीने सर्वच घटकांना महत्त्व देऊन आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे ही आता काळाची गरज बनली आहे. शेती व्यवसायाचे बदलते स्वरूप लक्षात घेता कृषी विज्ञान केंद्रही या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्रसार करत आहे.
Khat vyavsthapan: रासायनिक खतांचे संयोजन
कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार संतुलीत खत नियोजनासाठी, रासायनिक खतांचे विविध पर्याय खाली देत आहे.
आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा व शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा…
5 thoughts on “Khat vyavsthapan : रासायनिक खतांचा समतोल वापर”