Humani niyantran: हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अशा प्रकारे करा एकात्मिक व्यवस्थापन…

हुमणी ही जमिनीत राहून पिकांच्या मुळ्या खाऊन नुकसान करणारी बहुभक्षी कीड आहे. या किडीमुळे ऊस, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा अशा जवळजवळ सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. दरवर्षी या किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे वातावरणाचा समतोल बिघडून या किडीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये होणारे हवामानातील बदल, तसेच अवेळी पडणारा पाऊस यामुळे या किडीचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षापासून झपाट्याने वाढला आहे. हलकी जमीन व व पाण्याची कमतरता  हे हुमणी साठी अनुकूल आहे. या किडीचे लवकर नियंत्रण न झाल्यास 30 ते 70 टक्के पिकांचे नुकसान होऊ शकते  म्हणूनच हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी Humani niyantran एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Humani niyantran
Humani niyantran

हुमणी किडीची ओळख जीवनक्रम:

ज्या ठिकाणी वळवाचा पाऊस होऊन गेला आहे त्या ठिकाणी हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. मादी भुंगेरा नरापेक्षा मोठे असतात. या भुंगेरांचे सरासरी आयुष्य सुमारे 80 ते 90 दिवस असते.  भुंगेरे हे निशाचर कीटक आहेत जे  केवळ रात्रीच्या वेळी मिलनसाठी जमिनीतून बाहेर पडतात. संध्याकाळी बाभुळ, बोर, कडुनिंबाच्या झाडावर बसून रात्रभर पाने खातात. याच काळात नर व मादी यांचे मिलन होते. त्यानंतर मादी  3-4 दिवसांत मातीमध्ये साबुदाण्यांसारखी लांबट व गोल अंडी घालते.  एक मादी जवळपास 50 ते 70 अंडी घालते. त्या अंड्यामधून साधारण 9 ते 24 दिवसात आळ्या बाहेर पडतात. ही अळी म्हणजेच हुमणी. पिवळसर पांढऱ्या रंगाची ही अळी जमिनीत तीन अवस्थेमध्ये 5 ते 8 महिने जगते.

यापैकी पहिल्या अवस्थेतील अळी ही जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर जगते((25 ते 30 दिवस-जून महिना)). मात्र दुसऱ्या(30 ते 45 दिवस-जून,जुलै महिना) व तिसऱ्या अवस्थेतील (जुलै ते नोव्हेंबर) अळी पिकांच्या मुळ्या खाते आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. पूर्ण वाढ झालेली तिसऱ्या टप्प्यातील हुमणी अळी पांढऱ्या रंगाची आणि इंग्रजी ‘C’ आकाराची असते. तिचे पोट चकचकीत काळे आणि गुळगुळीत, तर तोंडाचा भाग हा जाड दणकट आणि गडद तांबूस असतो. तिसऱ्या अवस्थेत ही अळी कोषावस्थेत जाते (नोव्हेंबर, डिसेंबर) त्यानंतर साधारण 20 ते 25 दिवसांनंतर (जानेवारी, फेब्रुवारीत)  मातीत  भुंगा तयार होतो. प्रौढ भुंगेरे कोषमधून बाहेर पडतात आणि काही काळ जमिनीत  सुप्त अवस्थेत राहतात.  हे भुंगेरे  मे, जून मध्ये पहिल्या पावसानंतर बाहेर पडतात.

अशा प्रकारे अंडी, अळी, कोष, भुंगा या चार अवस्था एका वर्षात या किडीच्या जिवनक्रमात पूर्ण होतात. त्यापैकी तीन अवस्था या मातीमध्ये असतात. जमिनीमध्ये या तीन अवस्थेत ही अळी दोन वेळा कात टाकते.  ही अळी 6 ते 8 महिने जगू शकते. त्यानंतर भुंगेरे हे जमिनीवर( झाडावर) असतात. ते अडीच किलोमीटर पर्यंत उडू शकतात. त्यामुळे भुंगेरे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

कीटकांच्या जीवनचक्राचा अभ्यास केल्यास हे लक्षात येते की पावसाळ्यात कीटकांच्या विविध अवस्था जमिनीच्या बाहेर आढळतात. तथापि, बाकीच्या अवस्था या जमिनीच्या आत असतात. त्यामुळे एकूण व्यवस्थापन आराखड्यात भुंगेरे नियंत्रित करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.

Humani niyantran
Humani niyantran

Humani niyantran-भुंगेऱ्यांच्या बंदोबस्तासाठी…

  • पूर्ण कुजलेले शेणखत वापरा.
  • वळवाच्या पावसानंतर लक्ष ठेवून बाभुळ, बोर किंवा लिंबाच्या झाडांना काठीने हलवा जर भुंगेरे असतील तर ते खाली पडतील, ते एकत्रीत गोळा करून रॉकेल मिसळलेल्या पाण्यात बुडवून त्यांची विल्हेवाट लावावी. आजूबाजूच्या बाधित शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून एकत्रित हा प्रयोग  केल्यास, भुंगेरे अंडी घालण्याची संधी मिळण्यापूर्वीच नष्ट करता येतील
  • लाईट ट्रॅप/ प्रकाश सापळे (पत्र्याचा डबा) शेतामध्ये झाडाकडे तोंड करून लावा. ही पद्धत भुंगेरे, कीटकांना आकर्षित करते . गरम झालेल्या डब्यामुळे ते मरून जातील. नंतर ते एकत्र गोळा करून नष्ट करा.
  • यजमान झाडावर म्हणजेच ज्या झाडावर हे भुंगे आपली उपजीविका करतात अशा बोरी बाभळी, लिंब यावर क्लोरोपायरीफॉस+ सायपरमेथ्रीन (हमला,सुपर डी) 30 मिली प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी.

किंवा

  • इमिडाक्लोप्रिड(17.8 SL) 5मिली प्रती पंप या शिफारशीत प्रमाणात फवारणी करावी.

हुमणी अळीचे नियंत्रण:

  • पावसाळ्यात शेताजवळ अर्ध्या चंद्राच्या आकारात कडुनिंब, बोर किंवा बाभळीची पाने खाल्लेली दिसल्यास नियंत्रणाचे Humani niyantranउपाय करावेत.
  • एका सरळ रेषेत पीक पिवळे पडलेल्या शेतात प्रति घनमीटर 1हुमणी अळी दिसल्यास नियंत्रण  उपायांची अंमलबजावणी करावी.

भौतिक नियंत्रण:

  • हुमणीग्रस्त पिकामध्ये शक्य असेल तर अंतरमशागत करावी. खोल नांगरणी आणि कोळपणीमुळे हुमणीच्या अळ्या जमिनीवर येतात. एक तर पक्षी त्यांना वेचून खातात किंवा त्या उन्हामुळे मरून जातात. नंतर या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
  • शेतामध्ये वाहते पाणी (पाटपाणी) देऊन काही काळ साठवून ठेवावे. यामुळे अळ्या गुदमरून मरतील.
  • शेतातील तणांचा बंदोबस्त करावा.
  • शेणखत टाकताना जर  आळ्या आढळून आल्या तर मेटारायझियम एनिसोप्ली 1 किलो प्रति टन शेणखतात मिसळावे.
  • पीक काढणीनंतर लगेचच 15 ते 20 सें.मी. खोल नांगरट करावी. जमिनीवर आलेल्या आळ्या गोळा करून त्यांना रॉकेल मिसळलेल्या पाण्यात बुडवून नष्ट करणे अत्यावश्यक आहे.

Humani niyantran- रासायनिक नियंत्रण :

  • पीक लागवडीपूर्वी कार्बोफ्युरॉन दाणेदार सात किलो प्रति एकरी या प्रमाणात खतासोबत मिसळून द्यावे
  • उभ्या पिकात उपद्रव आढळल्यास ड्रीप मधून किंवा पाटपाण्यातून हमला, सुपर डी एकरी 1 लिटर  किंवा लेसेंटा एकरी 175 ते 200 ग्रॅम या प्रमाणात सोडावे.

रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतांना योग्यरित्या काळजी घेऊनच हाताळणी करावी.

या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी रासायनिक कीटकनाशकावरच जास्त अवलंबून राहतात. हमला, लेसेंटा, डेसीस यांची आळवणी करतात. पण हुमणीच्या बाबतीत कीटकनाशकाच्या वापराबाबत मर्यादा पडतात. कारण ही अळी जमिनीत (मातीत) असते, तिथेपर्यंत हे औषध पोहोचणे गरजेचे आहे. बरेच शेतकरी पाटपाण्यातून कीटकनाशक सोडतात पण ही कीड भुंड्यावर पिकाच्या बुडात असते. त्या ठिकाणी औषधाचा मारा होणे गरजेचे आहे तरच हुमणी मरेल, अन्यथा नाही.

किडनियंत्रणाच्या अनेक उपाययोजना करूनही समाधानकारक नियंत्रण होत नसल्यास त्यांची जैविक नियंत्रणाशी सांगड घालून एकात्मिक कीड नियंत्रण करावे.

जैविक नियंत्रण:

  • पिकावरील त्या किडीला खाणारे कीटक, प्राणी व रोगजंतूंचा वापर करून कीड नियंत्रण करणे, जेणेकरून आर्थिक नुकसानीची पातळी कमी होईल.
  • दीर्घकाळ नियंत्रणासाठी जैविक नियंत्रण खूप गरजेचे आहे.
  • कीड नियंत्रणासाठी, परोपजीवी बुरशी जसे की बिव्हेरिया बासियाना, बिव्हेरीया बैंगोनीटी, मेटॅरीझीअम एनीसोप्ली तसेच बॅसिलस पॉपिली जिवाणू यांचा वापर केला जाऊ शकतो. हे फायदेशीर जीव सेंद्रिय खतांमध्ये मिसळून कीड व्यवस्थापनासाठी वापर करता येतो.
  • यामध्ये परोपजीवी बुरशी म्हणजेच मेटारायझियम (एकरी 1लिटर) आणि बिव्हेरिया( एकरी 1 लिटर) 250 ते 400 लिटर पाण्यातून सोडावे, 7 ते 8 दिवसात मरून जाते.
  • एंटोमो पॅथोजेनिक नेमटोड हे फायदेशीर जीव आहेत जे छिद्रद्वारे किंवा तोंडाद्वारे होलोट्रोकिया हुमणीच्या शरीरात प्रवेश करून कीटकांना संक्रमित करतात. एकदा अळीच्या आत वाढतात आणि पुनरुत्पादित होतात, शेवटी अळीचा मृत्यू होतो. हे जीव नंतर मृत अळीतून बाहेर पडतात आणि त्यांचे जीवन चक्र चालू ठेवून, जमिनीतील इतर हुमणीचा शोध घेतात.

कोणत्याही किडीचे जैविक पद्धतीने नियंत्रण करत असताना त्या भागातील वातावरण, पीक पद्धती आणि उपद्रवी किडींच्या जीवनक्रमाचा अभ्यास असणे आवश्यक आहे. त्या किडींचे नैसर्गिक शत्रू माहीत असल्यास नियंत्रण लवकर करता येते. जैविक नियंत्रण करत असताना त्यासोबत रासायनिक कीटकनाशक वापरू नये.

जमिनीद्वारे पसरणाऱ्या किंवा उद्भवणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रण प्रभावी ठरते. तसेच यांच्या वापरामुळे पिकांच्या मुळांच्या संख्येत आणि लांबीत वाढ होते. पीक सशक्त व निरोगी राहिल्यामुळे उत्पादनातही भरीव वाढ होते असे निदर्शनास आले आहे. जैविक नियंत्रणामुळे पर्यावरण प्रदूषणाचा धोकाही टाळता येतो.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1.हुमणी कीड कशाप्रकारे पिकांचे नुकसान करते?

उत्तर– हुमणीची अळी प्रथम सेंद्रिय पदार्थ खाते आणि त्यानंतर पिकांची मुळे खाते. मुळाना नुकसान झाल्यामुळे झाडे पिवळी पडून वळतात, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

2. हुमणी किडीच्या जीवन चक्राच्या अवस्था कोणत्या आहेत ?

उत्तर – अंडी, अळी, कोष, भुंगा या चार अवस्था एका वर्षात या किडीच्या जिवनक्रमात पूर्ण होतात.

3. कोणत्या पिकात हुमणी चा प्रादुर्भाव होतो ?

उत्तर – महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस, हळद, भुईमूग,  सोयाबीन , अद्रक, ज्वारी, बाजरी, मका  व कापूस या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

4. हुमणी किडीचा प्रसार कसा होतो?

उत्तर – हुमणी ही कीड हलकी जमीन, कमी पाण्याच्या ठिकाणी ही जास्त प्रमाणात आढळते. तसेच शेणखताच्या माध्यमातून या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये होतो.

5. हुमणी नियंत्रणाचे Humani niyantran जैविक उपाय काय आहेत ?

उत्तर – अळी सुरुवातीला सेंद्रिय पदार्थावर जगते तेव्हा खरीप हंगामात जमिनीत शेणखत टाकताना,  खताबरोबर परोपजीवी बुरशी जसे की बिव्हेरिया बासियाना, बिव्हेरीया बैंगोनीटी, मेटॅरीझीअम एनीसोप्ली तसेच बॅसिलस पॉपिली जिवाणू यांचा वापर केला जाऊ शकतो.

2 thoughts on “Humani niyantran: हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अशा प्रकारे करा एकात्मिक व्यवस्थापन…”

Leave a Comment