वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या सर्वच पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. Gahu pikavaril rog niyantran गहू पिकावर करपा तसेच मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर घाटे अळी दिसत आहे. तर ज्वारी पिकावर खोडकीड, मावा, लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सर्वच बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बोरवेल, विहिरी यांना मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी हजारो एकरवर रब्बीचा पेरा केला आहे. राज्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, मक्का या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात ढगाळ हवामान, दव व धुक्यामुळे पिकांची वाढ खुंटलेली होती. तरीही शेतकऱ्यांनी खचून न जाता विविध फवारण्या करून आपले पीक जोपासले आहे.
इतके करूनही लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना अद्यापही बसत आहे. यापूर्वीच्या दोन लेखांमध्ये आपण ज्वारी पिकावरील किड नियंत्रण व हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन पाहिले आहे. या लेखात आपण गहू पिकाचे रोग व उपाय Gahu pikavaril rog niyantran यांची माहिती घेणार आहोत.
गायब झालेली थंडी व ढगाळ हवामानामुळे गहू पिकावर मावा किडीचा आणि करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या पिढीच्या विष्ठेद्वारे गव्हाच्या पानावर, खोडावर तसेच कोवळ्या शेंड्यावर असलेल्या माव्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करूनही, हा रोग व कीड आटोक्यात येत नसल्यामुळे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
मावा कीड
उष्ण, दमट आणि ढगाळ वातावरणामुळे या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. हि कीड पानातील अन्नरस शोषून घेते, तसेच काळ्या रंगाचा पदार्थ शरीरातून बाहेर टाकते.
प्रमाण वाढल्यास पाने चिकट होतात व पानांवर काळ्या रंगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पिकाच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा येतो.
तांबेरा/करपा
गव्हावरील तांबेरा/करपा हा प्रमुख आणि नुकसानकारक रोग असून, त्यामुळे दाणे सुकतात व जिऱ्यासारखे दिसू लागतात.
या रोगाचे खोडावरचा काळा तांबेरा, पानावरील नारिंगी तांबेरा आणि पिवळा तांबेरा असे प्रमुख तीन प्रकार आहेत.
सुरुवातीच्या काळात गहू पिकातील मावा व इतर रसशोषक कीड व तांबेरा रोग यांच्या एकत्रित नियंत्रणासाठी,
Gahu pikavaril rog niyantran फवारणी नियोजन
1. डायमोथोएट 30% ई.सी. 2 मिली. + कार्बेनडॅन्झिम 12 % + मॅंकोझेब 63 % डब्ल्यू पी घटक असलेले बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन असताना फवारणी करावी.
गरज भासल्यास पुढील फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी.
2. थायोमिथॉक्साम 25 % डब्ल्यू जी घटक असेलेले कीटकनाशक 1 ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल 1 मि.ली. प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन असताना फवारणी करावी.
Gahu pikavaril rog niyantran फवारणीचे नियोजन करत असताना आपल्या कृषी सेवा केंद्र संचालकांचा सल्ला जरूर घ्यावा.
हे ही वाचा…