ड्रोन म्हणजे काय?
ड्रोन हे हवेत उडणारे मानवविरहित स्वयंचलित वाहन आहे. जसे जमिनीवरून आपण ट्रॅक्टर सारख्या वाहनाला विविध यंत्र व अवजारे जोडून शेतीची कामे करतो. त्याचप्रमाणे Drone in Agriculture/ड्रोन हे हवेतून उडणारे मानव विरहित वाहन आहे. हे उपकरण जमिनीवरून रिमोट कंट्रोलच्या साह्याने नियंत्रित केले जाते. किंवा ड्रोनला एका विशिष्ट संगणकीय प्रणाली द्वारे वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्याची सोय केलेली असते. त्यामुळे स्वायत्तपणे(autonomous) शेतातील विविध क्रिया केल्या जाऊ शकतात.
8 -10 वर्षांपूर्वी एखाद्या लग्न समारंभामध्ये ड्रोन वरील कॅमेराच्या सहाय्याने चित्रीकरण केले जायचे त्यावेळी ड्रोन हा लोकांच्या कुतूहलाचा विषय होता. आता मात्र ही संकल्पना सामान्य होत गेली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा फवारणीसाठी ड्रोनचा वापर करत आहेत. परंतु याचा नेमका वापर कसा करायचा याचे योग्य प्रशिक्षण असणारे लोक कमी आहेत. शेतकऱ्यांमध्ये तर त्याच्या वापराबाबत आणि क्षमतेविषयी अजूनही उत्सुकता आहे.
Drone in Agriculture/ड्रोन चे प्रकार:
हवेत उडण्याच्या तत्त्वानुसार ड्रोनचे साधारणत: चार प्रकार पडतात.
1. फिक्स्ड विंग ड्रोन(Fixed Wing Drone)
2. एक रोटर ड्रोन (Single Rotor Drone)
3. अनेक रोटर ड्रोन (Multi Rotor Drone)
4. फिक्स्ड विंग रोटर हायब्रीड ड्रोन(Fixed Wing Rotor Hybrid Drone)
यापैकी शेतीची कामे करण्यासाठी अनेक रोटर ड्रोन (Multi Rotor Drone) हा ड्रोन वापरला जातो. या ड्रोनविषयी माहिती आपण पाहूया:
या ड्रोनमध्ये 3 किंवा त्यापेक्षा अधिक रोटर्स एका विशिष्ट प्रकारच्या पात्यासह असतात. त्यामुळे ड्रोनला एक प्रकारची उचल (लिफ्ट) मिळते. रोटर्स सोबत जोडलेल्या मोटर्समुळे रोटरचा वेग बदलला जातो.
त्यामधून निर्माण होणारा ‘थ्रस्ट’ हा ड्रोनच्या वजनापेक्षा जास्त, तेवढाच किंवा कमी राखता येतो. त्यानुसार ड्रोन वर उडू शकतो, खाली येऊ शकतो, स्थिर राहू शकतो, एकाच ठिकाणी घिरट्या घालू शकतो.
या प्रकारचे ड्रोन/Drone in Agriculture आहे त्या जागेवरून सरळ वर जाऊ शकतात किंवा खाली येऊ शकतात. म्हणजेच हा ड्रोन कमी जागेत उड्डाण घेवू शकतो.
अनेक रोटर ड्रोनचे फायदे:
1) विशेषतः छोट्या क्षेत्रावर फवारणी करणे, मॅपिंग म्हणजेच नकाशे काढणे, सर्वेक्षण व पाहणी अशा कामांसाठी मल्टी रोटर ड्रोनचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला आहे.
2) कार्यक्षमता थोडी कमी असली तरी, हवेत उडत असताना या ड्रोनचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येते.
3) आपल्या गरजेप्रमाणे हवेत वर, खाली, मागे – पुढे उडवता येतात.
4) आवश्यकतेनुसार स्थिर किंवा घिरट्या घालत ठेवू शकतो.
5) छोट्या जागेतही वापरणे शक्य. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे ड्रोन वापरायला उपयुक्त आहेत.
अनेक रोटर ड्रोनच्या मर्यादा:
1) या ड्रोनला हवेत उडण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता असते.
2) जास्त वेगाने उडू शकत नाही.
3) हवेत जास्त काळ राहू शकत नाही.
शेतकऱ्यांना कमी किमतीत अगदी सहज ड्रोन उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे किसान ड्रोन योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये सुरू केली. शेती व्यवसाय सुलभ व्हावा यासाठी केंद्र सरकार शेतीमध्ये ड्रोन/Drone in Agriculture चा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत या तंत्रज्ञानाचा लाभ पोहोचण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने,
1.ठिकठिकाणी ड्रोनची प्रात्यक्षिके करून दाखवली जात आहेत.
2. शेतामध्ये ड्रोनच्या चाचण्या घेतल्या जातआहेत.
3.शेतकऱ्यांना ड्रोन वापराचे धडे दिले जात आहेत.
4.ड्रोन वापरताना कोणती काळजी घ्यावी लागणार याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
नमो ड्रोन दिदी योजना:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला शेतकऱ्यांसाठी ‘नमो ड्रोन दिदी योजना’ सुरु केली आहे. देशातील महिलांचा शेतीमधील सहभाग सातत्याने वाढत आहे. महिलांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून 2024-25 आणि 2025- 26 या दोन वर्षांच्या कालावधीत हे ड्रोन महिला बचत गटांना वितरित केले जाईल. प्रत्येक महिला बचतगटांना ड्रोन व इतर उपकरणे खरेदी करण्यासाठी 8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. तसेच गरजेनुसार बँकेकडून कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध होइल. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे पात्र बचत गटातील महिलांची निवड केली जाईल. निवडलेल्या महिलेची या ग्रामीण भागातील ‘ड्रोन सखी’ म्हणून निवड केली जाईल. तसेच, खत कंपन्यांच्या माध्यमातून ड्रोन पायलट व खते, कीटकनाशकांच्या फवारणीचे 15 दिवस प्रशिक्षण दिले जाईल.
अर्ज कोठे आणि कसा करावा?
नमो ड्रोन दीदी योजना सुरू झाली असून जे महिला बचत गट ड्रोन योजनेत अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज प्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयाला भेट द्यावी.
भविष्यात पिकावरील रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव शोधणे, पीक आरोग्य निरीक्षण, पीक उत्पादन आणि पीक नुकसानीचे जलद मूल्यांकन करण्यासाठी ड्रोनचा वापर होणार.
कृषी ड्रोन फवारणी प्रणालीचे फायदे:
1. वेळ बचत : खांद्यावर पंप घेऊन फवारणी करण्यासाठी अधिक वेळ लागतो सर्व शेतात फिरून फवारणी करावी लागते या कामासाठी भरपूर वेळ वाया जातो. ड्रोन मुळे कमी वेळेत कमी श्रमात फवारणी होते.
2. सुरक्षाः मनुष्याला कीटकनाशकाच्या संसर्गापासून दूर ठेवते आणि विषबाधा आणि उष्माघातापासून प्रतिबंधित करते.
3. उच्च कार्यक्षमता: दररोज 8-10 एकरांवर फवारणी करता येते. पारंपारिक फवारणी पद्धतीपेक्षा 10 पटीने अधिक कार्यक्षम.
4. पर्यावरण संरक्षण: निश्चित स्थिती व निश्चित दिशा देऊन कीटकनाशकांचे फवारणी करता येते, त्यामुळे पाणी व मातीतील प्रदूषण कमी होते.
5. औषध/कीटकनाशकांची बचत: मोठ्या प्रमाणात अॅटोमिझेशन, रासायनिक धुके पिकाच्या सर्व स्तरांवर दाबले जाऊ शकतात आणि 30% पेक्षा जास्त कीटकनाशके वाचवू शकतात.
6. खते आणि पाण्याची बचत: अल्ट्रा लो व्हॉल्यूम फवारणी तंत्रज्ञान वापरता येते, पाण्याचा वापर पारंपारिक फवारणीच्या 10% आहे.
7. कमी खर्च: पैसा, वेळ, औषध, खते यामध्ये बचत.
3 thoughts on “Drone in Agriculture/ किसान ड्रोन योजना/ नमो ड्रोन दिदी योजना 2024”