Lavala weed control- लव्हाळा तणाचा 100% बंदोबस्त: असे करा पीकनिहाय नियंत्रण

तणामुळे पिकाचे खूपच नुकसान होते. त्यामुळे तण नियंत्रण ही शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आणि गुंतागुंतीची समस्या ठरली आहे. कारण एक तर या कामासाठी मजूर मिळत नाही आणि मिळाले तर मजुरीचे दरही वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकरी रासायनिक तणनाशकांचा वापर करत आहेत. पिकामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, दुधानी, गोखरू, केना, कुंदा, घोळ, माठ, गाजरगवत, चांदवेल ही तणे आढळतात. यापैकी लव्हाळा हे लवकर नियंत्रण न होणारे आणि पिकाचे जास्त नुकसान  करणारे असे तण आहे. या लेखामध्ये आपण Lavala weed control लव्हाळा या तणाचा बंदोबस्त कसा करावा? त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Lavala weed control
Lavala weed control

लव्हाळा तण:

लव्हाळा हे तण शाखीय पद्धतीने वाढते. याच्या मुळाच्या गाठी जमिनीत खोलवर असतात. त्यांना नागरमोथा असेही म्हटले जाते. शेताची खुरपणी केली तरी हे नागरमोथे जमिनीमध्ये जिवंत राहतात. त्याच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले की या तणाची वाढ सुरू होते.

लव्हाळा हे तण खूपच झपाट्याने वाढते आणि अल्पवधीतच पूर्ण शेतात पसरते. त्यामुळे त्याचा वेळीच बंदोबस्त Lavala weed control केला नाही तर आपल्या पिकाचे 20 ते 70 % पर्यंत नुकसान होते. याच्या नियंत्रणासाठी सध्या शेतकरी रासायनिक तणनाशक वापरत आहेत, त्याच्यामुळे मुख्य पिकाला थोडी का होईना हानी पोहोचतेच. ही हानी कृषी सल्लागाराच्या मदतीने कमी करता येते.

Lavala weed control-लव्हाळा तण नियंत्रण करण्याचे उपाय:

प्रतिबंधात्मक उपाय:

आपल्या शेतातील पाण्याचे पाट, सर्व बाजूचे बांध, ड्रेनेजचे खड्डे या ठिकाणी अजिबात तण येऊ देऊ नका.

तण उगवल्यास ते फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाका जेणेकरून तणाचा बंदोबस्त होईल.

निवारणात्मक उपाय:

उन्हाळ्यामध्ये आपले शेत रिकामे असताना खोल नांगरट करावी. जेणेकरून जमिनीतील लव्हाळ्याच्या गाठी वर येतील आणि उन्हामध्ये त्या जळून नष्ट होतील.

नांगरणीनंतर त्याच ठिकाणी दोन ते तीन वेळा कोळपणी करावी.

पिकांची फेरपालट,  सेंद्रिय मल्चिंग, आंतरपीक पद्धतीचा वापर करावा.

Lavala weed control-जैविक नियंत्रण:

जिवाणू, बुरशी, कीटक यांचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते जसे की, लव्हाळा या तणाचे नियंत्रण  ‘बॅक्ट्रा वेरुटाना’  या जैविक किटकाद्वारे करता येते.

पारंपरिक पद्धतीने लव्हाळा तणाचे समूळ उच्चाटन:

यामध्ये एक किलो राजगिरा अंदाजे 15 ते 20 किलो बारीक वाळूत मिक्स करून एक एकर जमिनीवर विस्कटून/ फेकून द्यावा. त्यानंतर लगेच शेतीला पाणी द्या, जेणेकरून 8 ते 10 दिवसात राजगिरा उगवून येईल. 8 ते 10 दिवसाच्या अंतराने  शेतीला 3 ते 4 वेळा पाणी द्या. साधारण दीड ते दोन महिन्यात हा राजगिरा गुडघ्या एवढा होईल, त्यावेळेस त्याची मुळे ही लव्हाळ्याच्या गाठी वर जाऊन या सातही गाठी मारून टाकतील. अशा पद्धतीने या तणाचा समूळ नायनाट होईल.

नंतर हा राजगिरा आपण भाजी म्हणून मार्केटमध्ये विकू शकता किंवा कापून जमिनीवर आच्छादन करू शकता. त्या आच्छादनावर डीकंपोस्ट आणि गुळाचे पाणी फवारले तर चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.

Lavala weed control-रासायनिक नियंत्रण:

1. लव्हाळा  हे तण उगवूच नये म्हणून उगवणीपूर्वी मेट्रीब्युझीन (टाटा मेट्री, सेन्कॉर) 400 ग्रॅम किंवा डायुरॉन(डायुरेक्स) 800ग्रॅम किंवा सल्फेनट्रोझोन 600मिली प्रती एकर यापैकी एका तणनाशकाची फवारणी करावी.

2. लव्हाळा हे तण उगवल्यानंतर निवडक प्रकारातील हॅलोसल्फुरोन मिथाईल (सेंप्रा) 36 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. किंवा

2, 4 डी अमाईन सॉल्ट (विडमार) 2.5 लिटर प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.  या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शेतामध्ये किमान 10 ते 15 दिवस कोणतीही मशागत करू नये.

3. पीक नसलेल्या शेतामध्ये ग्लायफोसेट (ग्लायसेल, राऊंड अप) हे आंतरप्रवाही तणनाशक एकरी 800 मिली या प्रमाणात दाट फवारणी करावी.

रासायनिक उपाय: पीक निहाय नियंत्रण

  • ऊस: ऊस या पिकामध्ये लागणीनंतर 30 ते 40 दिवसात लव्हाळ्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास धानुका कंपनीचे सेंप्रा हे तण नाशक प्रति एकरी 36 ग्रॅम या प्रमाणात फवारणीसाठी वापरावे. ऊस पिकातील इतर तनांचा बंदोबस्त करण्यासाठी या तणनाशकामध्ये 2, 4 डी अमाईन सॉल्ट (विडमार) , टाटा मेट्री/सेन्कॉर वापरू शकता.
  • सोयाबीन: सोयाबीनमध्ये पेरणीनंतर 15 ते 20 दिवसात लव्हाळ्याची उगवण दिसून आल्यास सिंजेंटा कंपनीचे फ्यूजीफ्लेक्स 400 मिली किंवा यूपीएल कंपनीचे आयरिश 400 मिली किंवा ड्युप्राँड कंपनीचे क्लोबेन 15 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात कोणतेही एक तणनाशक  फवारावे.
  • भात: या पिकामध्ये लागवडीनंतर 20 ते 22 दिवसात लव्हाळा दिसून आल्यास बायर कंपनीचे सनराइज 400 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. फवारणीनंतर 24 तासात आपल्या पिकाला पाणी द्यावे.
  • मका: मका पिकामध्ये लागवडीनंतर वीस 25 ते 30 दिवसानंतर लव्हाळयाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास धानुका कंपनीचे सेंप्रा हे तण नाशक प्रति एकरी 36 ग्रॅम या प्रमाणात फवारणीसाठी वापरावे.

तणनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  1. तणनाशक हाताळताना व फवारणी करताना अंगभर कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, गमबुट इत्यादींचा वापर करावा जेणेकरून आपले संपूर्ण शरीर झाकले जाईल.
  2. फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंगावरील कपडे स्वच्छ धुवावेत.
  3. कीड व रोगनिहाय तणनाशकांची निवड करून शिफारशीत प्रमाणातच त्यांची फवारणी करावी.
  4. तणनाशकांच्या डब्यावरील/ पाकिटावरील पतंगाच्या आकाराचे चिन्ह व त्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तणनाशकाची निवड करावी, गरज भासल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.
  5. तणनाशकाचे द्रावण हाताने न ढवळता काठीच्या साह्याने ढवळावे.
  6. तणनाशके व खाद्यपदार्थ यांचा संपर्क येऊ देऊ नये कारण शेतीसाठी वापरली जाणारी रसायने ही मानवी आरोग्यासाठी घातक असतात.
  7. तणनाशके लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही अशा ठिकाणी बंदिस्त ठेवावीत.
  8. तणनाशक फवारणीसाठी वापरलेला पंप चुकूनही कीटकनाशकांच्या किंवा इतर फवारणीसाठी वापरू नये.
  9. तणनाशकांचे रिकामे डबे/ पाकिटे शेतात फेकून न देता जमिनीत खोल गाढून टाकावीत.
  10. तणनाशक, कीटकनाशक यांची शेतात फवारणी करतेवेळी शक्यतो प्रथमोपचार साहित्य नेहमी जवळ ठेवावे.

FAQ/ वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

1. लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकात जास्त होतो?

ऊस, सोयाबीन, मका व भात या पिकात लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव जास्त होतो.

2. लव्हाळा हे तण कोणत्या वर्गात मोडते?

लव्हाळा हे तण एकदल वर्गीय आहे.

3. तणनाशकाच्या चांगल्या रिझल्ट साठी काय करावे?

 तणनाशकाचे अपेक्षित रिझल्ट मिळण्यासाठी जमिनीत ओलावा असतानाच तणनाशकाची दाट फवारणी करावी.

तणनाशकाची फवारणी केल्यानंतर किमान 10 दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये.

4. लव्हाळा हे तण किती दिवस जगते?

लव्हाळा हे तण बहुवार्षिक असल्याने ते वर्षानुवर्षे शेतामध्ये वाढते.

5. Lavala weed control लव्हाळा नियंत्रणासाठी असणारे सेंप्रा हे तणनाशक कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो?

ऊस आणि मका या पिकामध्येच सेंप्रा हे तण नाशक वापरू शकतो.

6. तणनाशकाच्या फवारणीनंतर पिके थोडीफार पिवळी पडली असतील तर काय करावे?

चिलेटेड झिंक 15 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात घेऊन फवारणी केल्यास पिकावरील पिवळेपणा दूर होईल.

1 thought on “Lavala weed control- लव्हाळा तणाचा 100% बंदोबस्त: असे करा पीकनिहाय नियंत्रण”

Leave a Comment