When buying Seeds and Fertilizers बियाणे, खते खरेदी करताना घ्या ही काळजी…

खरीप हंगामाला प्रारंभ होताच शेतकऱ्यांकडून बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी केली जाणार आहे.  यंदाच्या वर्षी मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीसह बी-बियाण्यांची आणि खतांची तयारी (जुळवाजुळव) करत आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे बियाणे व खते टंचाई, तसेच बोगस माल विक्रीचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येतो.

When buying Seeds and Fertilizers
When buying Seeds and Fertilizers

ऐन पेरणीच्या वेळेस बियाणे मिळणे कठीण होते. कृत्रिम टंचाई भासवून जादा दराने खते आणि बियाण्यांची विक्री केली जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणीपूर्वीच बियाणे, खते खरेदी करण्यावर भर देतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सुरुवातीपासूनच योग्य ती खबरदारी घेऊनच खरेदी करणे आवश्यक आहे. When buying Seeds and Fertilizers शेतकऱ्यांनी कोणतेही बियाणे किंवा खते घेताना पुरावा म्हणून बिल घ्यावे. अशा प्रकारे कागदपत्र असतील, तर बोगस माल आढळल्यास शासन, कंपनीकडून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुलभ होते.

बोगस बियाणे घेणे टाळण्यासाठी काय कराल?

• बऱ्याच वेळा स्थानिक बाजारात स्वस्त दरात बियाणे देण्याचे आमिष दाखवले जाते. अशावेळी अनधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे घेणे टाळा.

• नोंदणीकृत, सरकारी अथवा सहकारी संस्था, जिल्हा बियाणे महामंडळाच्या विक्री केंद्रांवरून खरेदी केल्यास भरवसा राहतो, तसेच ओळखीच्या दुकानात आवश्यक बियाणे, खते खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.

बियाणे खरेदी करताना लक्षात ठेवा…

• परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करा. दुकानदाराचा परवाना व विक्री नोंदणी तपासा.

• सरकारी दर्जेदार बियाण्यांना प्राधान्य द्या. महाबीज, सिडको, नाफेड, कृषी विद्यापीठांची बियाणे विश्वसनीय असतात.

• बियाण्याच्या पिशवीवरील माहिती वाचा. जसे की बियाण्याचा प्रकार, अंकुरणशक्ती, उत्पादन वर्ष, कालबाह्यता दिनांक (expiry date), लॉट क्रमांक आदी.

•  ज्यावेळेस आपण बियाणे खरेदी करतो त्यावेळेस आपल्याकडे त्याची पावती, टॅग, लेबल असेल आणि बियाण्यातला काही भाग जतन करून ठेवला असेल तर भविष्यात याच्या उगवण क्षमतेबाबत, जनुकीय शुद्धतेबाबत काही प्रॉब्लेम आला तर कृषी विभागाकडे किंवा ग्राहक मंचात तक्रार दाखल करू शकता. त्यावेळेस या सर्व गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळे बियाणे बोगस निघाले तरी नुकसान भरपाईसाठी दावा करता येतो.

When buying Seeds and Fertilizers
When buying Seeds and Fertilizers

खते घेताना ‘ही’ काळजी घ्या…

• एखाद्या दुकानात खतं, बियाणे खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराकडे त्यासाठीचा परवाना आहे किंवा नाही ते बघणं आवश्यक असते. दर्शनी भागात हा परवाना लावलेला असतो.

• खत नियंत्रण आदेश (FCO) अंतर्गत नोंदणीकृत दुकानातूनच खते खरेदी करा.

• खतांच्या बॅगवर असलेली माहिती तपासा. जसे – उत्पादन दिनांक, वजन, प्रमाणपत्र क्रमांक, उत्पादकाचे नाव.

• खते बंद बॅगमध्येच घ्या.

• खत खरेदीची पावती न विसरता घ्या. अनधिकृत विक्रेत्यांपासून सावध राहा.

                आगामी खरीप हंगामासाठी बियाणे, खत व कीटकनाशक खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. कुठलीही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार नोंदनों वावी. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विभागामार्फत तक्रार निवारण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version