ऊसाच्या अपेक्षित उत्पादनासाठी योग्य बियाण्याची निवड करावी. तसेच Us lagwad रोप लागवडीचे तंत्र, जमिनीची सुपीकता, खतांचा संतुलित वापर, संजीवकांचा वापर, आंतरपिके, ठिबक सिंचनचा वापर, तण नियंत्रण आणि पीक संरक्षण या उत्पादनावर परिणाम करणारे बाबींचा विचार केल्यास आपण निश्चितच अपेक्षित उत्पादनाचे उद्दिष्ट गाठू शकतो.

जमीन सुपीक करणे
पूर्वहंगामी Us lagwad ऊसासाठी मध्यम तसेच भारी मगदूराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. मातीचा सामू (pH) 6.5 ते 8 या दरम्यान असावा. कार्बनचे योग्य प्रमाण राखण्यासाठी निंबोळी पेंड, आंतरपीक, पीक फेरपालट याबरोबरच जमिनीत ओलावा ठेवावा. सेंद्रिय खतासाठी शेणखत,लेंडीखत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, प्रेसमड कंपोस्ट, पोल्ट्री खत, किंवा शेतात मेंढ्या बसवणे या पर्यायांचा जरूर वापर करावा.
ऊसाचे पीक घेत असताना अगोदरच्या ऊसाचे पाचट जमिनीत कुट्टी करून गाढावे. त्यानंतर खरिपात सोयाबीनचे पीक घ्यावे किंवा ऊसाची लागण करण्यापूर्वी तीन महिने अगोदर ताग किंवा धैंच्या हे हिरवळीचे पीक घ्यावे. यामुळे जमिनीमध्ये कार्बनचे प्रमाण वाढते. या तंत्राने जमीन सुपीक, सधन आणि जिवाणू समृद्ध होऊन सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. त्यामुळे मुख्य अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होऊन ऊसाची आणि कांड्यांची संख्या, कांड्यांची लांबी जाडी, ऊसाचे वजन वाढल्याने उत्पादनात भरघोस वाढ होते.
सुधारित जाती व बेणे निवड
पूर्वहंगामी ऊसाची लागवड करण्यासाठी फुले 265, को 86032 या मध्यम पक्वतेच्या तसेच फुले 1001, को 94012, व्ही.एस.आर. 8005 आणि कोल्हापूर विभागासाठी को 92005 या सुधारित व अधिक साखर उतारा देणाऱ्या जातींची निवड करावी. लागणीसाठी Us lagwad बेणे मळ्यात वाढवलेले 9 ते 10 महिने वयाचे निरोगी, रसरशीत, लांब कांड्यांचे, फुगीर डोळ्याचे आणि आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरावे.
बियाणे/बेणे प्रक्रिया
100 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम, 300 मिली डायमेथोएट मिसळून बेणे 10 मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर ऍसिटोबॅक्टर 10 किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू 1.50 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात कांडी 30 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणू खताच्या प्रक्रियेमुळे 50% नत्र व 25% स्फुरद खतांची बचत होते तसेच उत्पादनातही वाढ होते.
सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानामध्ये एक डोळ्याची टिपरी/कांडी चुन्याच्या निवळीमध्ये (0.3%) रात्रभर कांड्या बुडवून ठेवाव्यात म्हणजे रोपवाटिकेत रोपांची उगवण चांगली होते. गादीवाफ्यात खताचे गोणपाटावर 2 इंच पोयटा मातीचा थर देऊन त्यावर बीजप्रक्रिया केलेले बियाणे एकसारखे पसरून नंतर पुन्हा शेणखत, पोयटा मातीने झाकावे. तुषार सिंचनाने पाणी देऊन पाचटाने झाकावे. उष्णतामान कमी असल्यास पॉलिथिन ताडपत्रीने झाकावे. चार दिवसांनी पाचट आणि ताडपत्री बाजूला करावी. त्यातून उसाचे जोरदार धुमारे उगवलेले दिसतात. त्यांची योग्य ती निगा राखून 3 ते 4 आठवड्यात लागण करावी.
Us lagwad लागवड
उसाची लागवड 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत करावी. रिझरच्या साह्याने भारी जमिनी 4.5 ते 5 फुटावर व मध्यम भारी जमिनीत 4 ते 4.5 फुटावर सऱ्या पाडाव्यात. सरीची लांबी उतारानुसार 20 ते 40 मीटर ठेवावी. एक डोळा पद्धतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून एक फुट अंतरावर व दोन डोळ्यांची टिपरी लावायची असल्यास 2 कांड्यामधील अंतर अर्धा फूट ठेवून डोळे बाजूला येतील अशा पद्धतीने लागण करावी. या उसाची लागवड 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत करावी.
Us lagwad खत व्यवस्थापन
आपल्याला अपेक्षित उत्पादनाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर, माती परीक्षण करून त्या आधारे शिफारशीत रासायनिक खताच्या मात्रा दिल्यास फायदेशीर ठरेल. खतांचा पुरेपूर, कार्यक्षम वापर होण्यासाठी खते फेकून न देता ती जमिनीतून पेरून द्यावी जेणेकरून खते मातीआड होतील. शक्य असल्यास ठिबक मधून खताच्या मात्रा (फर्टिगेशन) सोडाव्यात.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मँगेनीज सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मुरवून(5 ते 6 दिवस भट्टी लावून) सरीतून द्यावे.
पूर्व हंगामी ऊसासाठी खालीलप्रमाणे खत नियोजन करावे…

सिंचन व्यवस्थापन
हंगामानुसार उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, पावसाळ्यात गरजेनुसार 14 ते 15 दिवसांनी व हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याचा अतिरेकी वापर करू नये. जास्त पाण्यामुळे जमीन क्षारयुक्त बनते तसेच अन्नद्रव्यांचाही ऱ्हास होतो. ठिबक सिंचनचा वापर केल्यास पाणी व खतांचीही बचत होते.
ऊस तोडण्यापूर्वी कमीत कमी 15 दिवस अगोदर ऊसाला पाणी देऊ नये.
आंतर मशागत
ऊस लागण केल्यापासून पहिल्या 6 महिन्याच्या कालावधीत तणांचा बंदोबस्त, नांग्या भरणे, बाळ बांधणी, मोठी बांधणी, पाचट काढून आच्छादन करणे या गोष्टी फायद्याच्या ठरतात. लागणीनंतर 2 ते 2.5 महिन्यांनी बैल अवजार किंवा मजुराच्या साह्याने बाळबांधणी करावी. यावेळी ऊसाच्या फुटव्याला 3 ते 4 इंच माती लावावी.
मोठी बांधणी- ऊस पिक साडेचार महिन्याचे झाल्यानंतर भुंडा/वरंबे फोडून रासायनिक खतांची मात्रा देऊन अंतरमशागत करावी व रिझरच्या साह्याने मोठी बांधणी करून घ्यावी. पाणी देण्यासाठी सार्या-वरंबे सावरून घ्यावेत.
Us lagwad तण नियंत्रण
ऊस शेतीमध्ये प्रामुख्याने सरीतील जास्त अंतर, उसाची सावकाश होणारी उगवण, वाढीचा कमी वेग, जमिनीचा प्रकार रासायनिक खतांचा जास्त किंवा समतोल वापर, तापमानातील बदल आणि पीक पद्धती यामुळे अनेक नवीन तणे आढळून येत आहेत. या तणांचा बंदोबस्त करून सुरुवातीला किमान 4 महिने तरी ऊस तणमुक्त ठेवावा.
तणनाशकांचा वापर
ऊस पिकामध्ये तणांच्या नियंत्रणासाठी मेट्रीब्युझीन 2 ग्रॅम/1 लिटर + 2-4 डी 5 ते 6 मिली/1लिटर एकत्रित करून फवारणी घ्यावी. सध्या बाजारात विविध कंपन्यांची अनेक तणनाशके उपलब्ध आहेत. आपल्या ऊसाची व्हरायटी, ऊसाचे वय, वाढ यानुसार आपल्या शेती सेवा केंद्र संचालकांच्या मार्गदर्शनानुसार तणनाशकांचा वापर करावा.
ऊसावरील महत्त्वाच्या किडी
बदलत्या हवामानानुसार ऊस पिकावर नवीन रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, याचा परिणाम उत्पादनावर होतो. ऊसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कोराजन 5 ते 6 मिली प्रति 15 लिटर पाण्यातून किंवा हमला (क्लोरोपायरीफॉस+ सायपरमेथ्रीन) 30मिली 15 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी कोनोबाथ्रा, मायक्रोमस, डिफा अशा मित्र कीटकांच्या प्रत्येकी 1000 आळ्या किंवा कोश प्रति हेक्टरी सोडाव्यात.
हे उपलब्ध न झाल्यास फोरेट 10% दाणेदार हेक्टरी 20 किलो या प्रमाणात वापरावे.
हुमणीग्रस्त क्षेत्रात मेटारायझियम ॲनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना हे जैविक बुरशीनाशक शेणखतातून किंवा ड्रिपमधून सोडावे. किंवा फिप्रोनील 0.3GR 8 किलो प्रति एकरी द्यावे व नंतर हलके पाणी सोडावे.
ऊसावरील महत्त्वाचे रोग
ऊसावर बेण्याद्वारे चाबुक काणी, गवताळ वाढ, खोडकुज तसेच हवेद्वारे तांबेरा व पानावरील तपकिरी ठिपके तर जमिनीतून अननस रोग, मर व कुज या रोगामुळे गवताळ वाढ दिसून येते.
कार्बेन्डाझिमच्या बेणे प्रक्रियेमुळे ऊसातील काणी रोगाचा बंदोबस्त होतो.
ऊसावर पोक्का बोइंगच्या नियंत्रणासाठी 15 ते 20 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 3 फवारण्या कराव्यात.
ऊस पिकातील आंतरपिके
पूर्वहंगामी ऊसामध्ये बटाटा, कांदा (रांगडा), लसूण, पानकोबी, फुलकोबी, हरभरा, वाटाणा तसेच भाजीपाला पिके घेऊ शकतो.
ऊसामध्ये आंतरपीक म्हणून ज्वारी, मका, सूर्यफूल या पिकांची निवड करू नये.
आंतरपीक हे मोठ्या बांधणीपूर्वी म्हणजेच 90 ते 110 दिवसाच्या कालावधीत निघणारे असावे.
आंतर पिकामुळे आर्थिक फायद्यासोबतच जमिनीचा पोतही कायम राखला जाईल याची काळजी घ्यावी.
ऊसाला कोणती फवारणी, आळवणी करावी?
खोडवा ऊसाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापनासाठी या लिंक वर क्लिक करा.
तोडणी व उत्पादन
पूर्व हंगामी उसाची तोडणी 14 ते 15 महिन्यानंतर करावी. सध्या प्रचलित असणाऱ्या फुले 265 आणि को 86032 या जातींचा वापर केल्यास एकरी 80 टनापेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते.