ज्वारी हे आशिया आणि आफ्रिका खंडातील लाखो लोकांचे अन्नधान्य पीक आहे. तसेच यापासून गुरांसाठी चाराही मोठ्या प्रमाणावर मिळतो. Sorghum crop- pest control ज्वारी हे पीक विविध प्रकारच्या कृषी हवामान परिस्थितीत येणारे तृणधान्य पीक आहे. ज्वारीचे पीक हे जवळजवळ सर्वच प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या आणि तांबूळ/मुरमाड जमिनीत घेतले जाते. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ज्वारीतील प्रथिने ही गव्हातील प्रथिनापेक्षा जैवमुल्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहेत.

रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे अन्नधान्य व चाऱ्याचे पीक आहे. उत्पादनाचा विचार करता, संकरित वाणांची उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल संकरित वाण वापरण्याकडे अधिक आहे. अलीकडच्या काळात शुद्ध वाणांना शेतकऱ्याकडून बऱ्याच प्रमाणात मागणी येऊ लागली आहे. कारण या वाणांची उत्पादन क्षमता चांगली असून कडब्याचे उत्पादनही चांगले मिळते.
ज्वारी पिकावर जगातून सुमारे 150 किडींची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात रब्बी ज्वारीवर प्रामुख्याने खोडमाशी, खोडकिडा, मावा, कोळी, लष्करी अळी इत्यादी Sorghum crop- pest control किडींचा प्रादुर्भाव आढळतो. त्यापैकी काही महत्त्वाच्या नुकसानकारक किडी आणि त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यांची चर्चा आपण या लेखांमध्ये करणार आहोत.
मावा- Sorghum crop- pest control
ज्वारीवर विविध प्रकारच्या माव्याचा प्रादुर्भाव होतो. मावा रंगाने गडद निळसर,पिवळसर किंवा हिरवा असतो. निळसर रंगाच्या माव्याचे पाय काळे असतात. पिवळसर रंगाचा मावा जुन्या पानाच्या खालच्या बाजूवर आढळून येतो. हिरवा मावा पिकाच्या सुरुवातीच्या काळात पोंग्यात दिसून येतो. मावा पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पाणी पिवळी पडून कालांतराने वाळतात.

तुडतुडे-
तुडतुडे अनेक पिकावर आढळून येतात. या किडीचा प्रादुर्भाव सुद्धा ज्वारी पिकावर वाढीच्या अवस्थेत दिसून येतो. या किडीचे प्रौढ व पिल्ले झाडाच्या पोंग्यात तसेच पानावर आढळून येतात आणि समूहाने अन्नरसाचे शोषण करतात. तसेच तुडतुडे आपल्या शरीरातून चिकट द्रव बाहेर टाकतात नंतर त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

तुडतुडे आणि मावा किडींच्या एकत्रीत व्यवस्थापनाकरिता खालील उपाय योजना कराव्यात:
पेरणीकरीता कीड प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांची निवड करावी.
रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
पिकाच्या वाढीच्या नाजूक अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये.
या किडींच्या व्यवस्थापना करता कुठलेही लेबल क्लेम रासायनिक कीटकनाशक उपलब्ध नाहीत.
साधारण 20-22 व्या दिवशी निंबोळी अर्काची 5% ची फवारणी घ्यावी.
खोडकिडा-
खोडकिडीचे पतंग मध्यम आकाराचे व मळकट राखाडी किंवा गवती रंगाचे असतात. समोरील पंख पिवळसर असून पंखाच्या कडावर चमकदार ठिपके असतात.
मागील पंखांची जोडी पांढुरकी असून पंख कागदाप्रमाणे पातळ असतात. पतंग रात्रीच्या वेळी क्रियाशील असतात आणि ते साधारणतः 2 ते 4 दिवस जगतात. अळ्या मळकट पांढऱ्या असून डोके गर्द रंगाचे असते. त्यांच्या शरीरावर गर्द ठिपके असतात. पूर्ण वाढलेल्या अळ्या मळकट पांढऱ्या रंगाच्या असून 20 ते 25 मिली मीटर लांब असतात. नर आणि माझी पतंगाची मिलन सकाळचे वेळी होते आणि मादी पतंग सायंकाळच्या वेळी अंडी घालते. खोडकिडीचा मादी पतंग ज्वारीच्या पानाच्या खालील बाजूस अंडी घालते. खोडकिडीची अंडी मळकट, पिवळसर पांढरी आणि काहीशी चपटी असतात. खोडकिडीचे ज्वारी आणि मका हे प्रमुख खाद्य पीक आहे, परंतु ही किड ऊस, रागी आणि काही गवतावरही उपजीविका करते. मादी पतंग जवळपास 500 अंडी घालते.
ही अंडी 10 ते 80 अंड्याच्या पुंजक्यामध्ये पानाच्या खालील बाजूस मध्य शिरेजवळ घातलेली आढळतात. अंड्यातून 4-5 दिवसात अळ्या निघतात. अंड्यातून निघालेल्या या आळ्या ताबडतोब विखुरतात आणि ज्वारीच्या पोंग्यामध्ये प्रवेश करतात. तिथे त्या दुसऱ्या अवस्थेपर्यंत उपजीविका करतात. तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ज्वारीच्या बुंध्याशी जाऊन खोडामध्ये शिरतात आणि त्यामुळे ज्वारीचे दोन पेरामधली पाने वाळतात आणि गाभेमर होते. या किडीचा प्रादुर्भाव कणसे बाहेर पडल्यावर, दाणे भरण्याच्या अवस्थेतसुद्धा आढळून येतो. खोडकिडीच्या आळ्या ज्वारीचे खोड आणि गर पोखरतात परिणामी पूर्णतः किंवा अंशतः कणसे सुकतात. कणसात दाणे भरत नाहीत. त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. खोडकिडीचा प्रादुर्भाव ज्वारीच्या नवीन पोंग्यातील पानावरील लांबट लहान खिडक्या सारख्या दिसणाऱ्या छिद्रावरून ओळखता येतो. उगवणीनंतर साधारण 20 दिवसांनी खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो आणि गाभेमर 30-40 दिवसानंतर दिसते.

खोडकिडीचे व्यवस्थापन: Sorghum crop- pest control
अंडीपुंज असणारी ज्वारीची पाने काढून ती जमिनीत पुरावीत किंवा कीटकनाशक युक्त पाण्यात टाकावीत. कीडग्रस्त झाडे उपटून काढून त्यातील अळ्या नष्ट कराव्यात. रासायनिक कीटकनाशक विरहीत व्यवस्थापन करण्याकरता ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीटकाची 1.5 लाख अंडी प्रती हेक्टर याप्रमाणे उगवणीनंतर 30 व 40 व्या दिवशी शेतामध्ये सोडावीत.
रासायनिक नियंत्रणासाठी यावर क्लिक करा. Sorghum crop- pest control
1 thought on “Sorghum crop- pest control रब्बी ज्वारीतील मावा, तुडतुडे व खोडकिडीचे व्यवस्थापन”