Ropvatika anudan yojana 2024 रोपवाटिका अनुदान योजना, अर्ज कोठे व कसा करावा?

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या लेखामध्ये आपण रोपवाटिका अनुदान योजनेविषयी Ropvatika anudan yojana 2024 संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा, आवश्यक पात्रता, कागदपत्रे कोणती, अनुदान किती, अटी, निवड प्रक्रिया अशा सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.

महाराष्ट्र हे भाजीपाला व फलोत्पादनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात फळे आणि पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. याची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते. किडमुक्त (बिनविषारी) व निर्यातक्षम भाजीपाला पिकांच्या उत्पादनाकडे गेल्या काही वर्षांपासून शेतकरी वळले आहेत. सेंद्रिय भाजीपाला व फळांची मागणी वाढत आहे. नियंत्रित वातावरणामध्ये उत्पादित होणाऱ्या कीड व रोगमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. दर्जेदार, रोग व कीडमुक्त रोपांची वाढती मागणी यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात रोपवाटिका मोठ्या प्रमाणात उभारण्यास वाव आहे.

Ropvatika anudan yojana 2024
Ropvatika anudan yojana 2024

भाजीपाला क्षेत्रासाठी अशी कोणतीही मोठी योजना, राज्यस्तरावर आत्तापर्यंत कार्यान्वित केली गेली नव्हती. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सध्याच्या सरकारने, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुरू केली आहे. 9 सप्टेंबर 2020 रोजी या योजनेला शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

Ropvatika anudan yojana 2024 या योजनेचा उद्देश:

  • राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये रोपवाटिकांची निर्मिती व्हावी.
  • भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीड रोगमुक्त रोपे तयार करणे.
  • भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
  • रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे.
  • भाजीपाला पिकामुळे पीक रचनेत बदल घडवून आणणे.

रोपवाटिका अनुदान योजनेसाठी कोण लाभार्थी पात्र आहेत?

1) रोपवाटिकेसाठी अर्ज करणाऱ्याकडे स्वतःच्या मालकीची किमान 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे.

2) रोपवाटिका उभारण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता असावी.

3) प्रथम महिला कृषी पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल.

4) दुसरे प्राधान्य महिला बचत गट किंवा महिला शेतकऱ्यांना दिले जाईल.

5) तिसरे प्राधान्य भाजीपाला उत्पादकांना तसेच अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी किंवा शेतकरी गटांना दिले जाईल.

*यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेला आहे अशा खाजगी रोपवाटिका, तसेच ज्यांनी खाजगी रोपवाटिकेची उभारणी केलेली आहे परंतु शासनाचे लाभ घेतलेला नाही त्यांनाही या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही.

योजने अंतर्गत तांत्रिक प्रशिक्षण:

Ropvatika anudan yojana 2024 रोपवाटिका अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या लाभार्थ्यांना 3 ते 5 दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, कृषि  विज्ञान केंद्र, बारामती व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (MCDC) पुणे येथे घेणे अनिवार्य राहील.

अनुदान कशासाठी मिळणार आहे?

  1. या योजनेमधून रोपवाटिका पूर्णपणे नवीन उभारावी लागणार आहे.
  2. रोपवाटिकेमध्ये शेडनेट हाऊस (1000 चौ.मी.), पॉलीटनेल (1000 चौ.मी.), पॉवर नॅपसॅक स्प्रेअर 1, प्लास्टिक क्रेट्स 62 हे चारही घटक आवश्यक आहेत.
  3. टोमॅटो,कोबी,मिरची, वांगी,फ्लॉवर, कांदा,इत्यादी आणि इतर भाजीपाला पिकांच्या रोपवाटिका या योजनेमधून स्थापन करता येतील.

रोपवाटिका अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा?

शेतकऱ्यांनी, Ropvatika anudan yojana 2024 या योजनेसाठी महाडीबीटी वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारतील.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे :

  1. कृषी पदवी संबंधित कागदपत्रे
  2. शेतकरी गट असल्यास, नोंदणी प्रमाणपत्र
  3. बँक खात्याच्या पासबुकचे झेरॉक्स
  4. सातबारा उतारा, आठ-अ प्रमाणपत्र
  5. स्थळदर्शक नकाशा, चतु: सीमा
  6. आधार कार्डची छायांकीत प्रत
  7. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र.
  8. हमी पत्र.

रोपवाटिकेची उभारणी कधी करावी?

तालुका कृषी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतल्यानंतर कामाची सुरूवात करावी. लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत  आणि 3 महिन्यांच्या कालावधीत ते  काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

FAQ : शेतकऱ्यांना पडणारे प्रश्न

1. रोपवाटिकेसाठी किती अनुदान मिळते ?

रोपवाटिकेसाठी 50% (कमाल रु. 2,30,000) अनुदान मिळते.

2. रोपवाटिकेसाठी अर्ज कोठे करावा?

रोपवाटिका अनुदान घेण्यासाठी महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून https://mahadbt.maharashtra.gov.in/ पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेच्या अंतर्गत अर्ज करायचा आहे.

किंवा

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करू शकता.

3. रोपवाटिकेसाठी अनुदान कधी मिळते ?

प्रकल्प उभारणीनंतर प्रथम टप्प्याचे 60% अनुदान हे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रथम मोका तपासणी केल्यानंतर मिळेल तर उर्वरित 40% अनुदान हे रोपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री/उचल झाल्यानंतर मिळेल.

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

1 thought on “Ropvatika anudan yojana 2024 रोपवाटिका अनुदान योजना, अर्ज कोठे व कसा करावा?”

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version