दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी लक्षात घेता सरकारने ‘प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना’ pm solar pump scheme या योजनेची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवसा आपल्या शेतीला, पिकाच्या गरजेनुसार पाणी देता यावे, यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर पॅनल बसवून देणार आहे. यामधून निर्माण होणारी वीज शेतीसाठी वापरता येणार आहे.
pm solar pump scheme काय आहे ही योजना?
शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी पुरेशी वीज मिळावी आणि त्यांचा शेतीवरील खर्च आणि वेळ वाचावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या शेतकरी सिंचनासाठी विजेवर चालणारे आणि डिझेलवर चालणारे पंप वापरतात. परंतु अजूनही देशातील बहुतांशी दुर्गम भागात विजेची सोय नाही. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच अनेक शेतकरी वीज कपात, वीज टंचाई, लोड शेडिंग यामुळे हवालदील झाले आहेत त्यांनाही या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे.
pm solar pump scheme प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप ही योजना भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्याकडूनही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण या योजनेअंतर्गत सरकारकडून 60 टक्के अनुदान आणि 30 टक्के कर्ज दिले जाते. म्हणजे शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या फक्त 10 टक्केच खर्च करावा लागणार आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये:
1.ज्या भागात वीज पोहोचलेली नाही, अशा दुर्गम ठिकाणी शेती करणारे शेतकरी आपल्या पिकांना वेळेत पाणी देऊ शकतील.
2.शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न सुटणार आहे.
3.पाणीसाठा उपलब्ध असेल तर शेतकरी आपल्या सोयीनुसार, पिकाच्या गरजेनुसार पाणी देऊ शकतात.
4.ठिबक सिंचन, तुषार सिंचन सुलभ होणार आहे.
5.एमएसईबी च्या लहरी कारभाराचा नाहक त्रास होणार नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी एमएससीबी वर अवलंबून राहावे लागणार नाही.
6.वीज बिलासारख्या अवाढव्य खर्चाला आळा बसेल.
7.या सोलर पंपाच्या पॅनेल मधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल. यामधूनही शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळेल.
या योजनेचे फायदे:
- प्रत्येक गावात सौर उर्जेद्वारा वीज निर्मिती होईल.
- शेती पंपासाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचा आणि डिझेलचा खर्च वाचेल.
- अतिरिक्त वीज निर्मिती मधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
- 24 तास शेतकऱ्यांना भरवशाची (शाश्वत) वीज वापरता येईल.
- किमान 25 वर्षे तरी वीज बिल येणार नाही.
- पर्यावरणाचे प्रदूषण ही कमी होईल.
सोलर पंप योजना या योजनेसाठी आवश्यक पात्रता/कागदपत्रे:
1. अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराकडे किसन कार्ड असणे आवश्यक आहे.
3. शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र
4. अर्जदाराच्या जमिनीची कागदपत्रे
5. आधार कार्ड
6. मोबाईल नंबर
7. पासपोर्ट आकाराचे फोटो
pm solar pump scheme आवश्यक सूचना:
या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी केंद्र शासनाच्या महाऊर्जा च्या अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.
अटल सौर कृषीपंप योजना-1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत.
कुसुम सोलर पंप योजने साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्यांना फक्त ऑनलाइन स्वरूपातच अर्ज सादर करता येईल. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
जर शेतकऱ्यांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरता येत नसेल, तर ते शेतकरी ऑनलाईन सुविधा केंद्रावर जाऊन कुसुम सोलर पंप या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात.
शेतकरी स्वतः अर्ज भरणार असतील तर खालीलप्रमाणे अर्ज भरू शकता.
पायरी 1: प्रथम गूगल मध्ये https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B हे पोर्टल ओपन करावयाचे आहे. या पोर्टलवर तुम्हाला एक ‘लाभार्थी नोंदणी फॉर्म’ मिळेल, त्याठिकाणी तुमचा आधार क्रमांक आणि त्यानंतर संबंधित तपशील भरून ‘लाभार्थी’ म्हणून नोंदणी करावी.
आता तुम्ही लाभार्थी नोंदणी फॉर्ममध्ये (स्थान/गाव) ही आवश्यक माहिती भरल्यानंतर, सौर पंपांच्या क्षमतेनुसार (3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी) तुमच्या स्थानासाठी योजनेचा उपलब्ध कोटा दर्शविणारी पॉप-अप विंडो दिसेल.
तुमच्या स्थान/गावासाठी योजनेअंतर्गत कोट्याच्या उपलब्धतेवर अवलंबून, तुम्ही अर्ज फी भरून पुढे जा. कृपया पेमेंटच्या वेळी पेमेंट फॉर्ममध्ये अचूक माहिती भरा. तुम्हाला UPI, नेट बँकिंग, ATM कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे फी भरता येईल.
पायरी 2: अर्ज फी भरल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, आणि तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएस (SMS) पाठवला जाईल. हा वन-टाइम-पासवर्ड (OTP) पोर्टलवर सांगितलेल्या ठिकाणी टाईप करा.
पायरी 3: ओटीपी(OTP) प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीसाठी एक पुष्टीकरण विंडो दाखवली जाईल. या वेबपेजवर तुमचा अर्ज क्रमांक, नाव, मोबाईल नंबर इ. दिसतील. तुम्ही पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, तुम्ही कुसुम सौर पंप घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरू शकता.
पायरी 4: तुमचा अर्ज लॉग इन करण्यासाठी एसएमएसद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरा आणि समोर दिलेला फॉर्म पूर्णपणे भरा.
पायरी 5: सर्व तपशील पूर्ण भरल्यानंतर, शेतकऱ्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट केल्यावर, शेतकऱ्याला “यशस्वीपणे नोंदणीकृत” असा संदेश प्राप्त होईल. पोचपावती (Acknowledge) क्रमांक प्राप्त होईल.
या लेखात आम्ही तुम्हाला कुसुम योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. तरीही तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कुसुम योजनेच्या 18001803333 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.
(FAQ) या योजनेसंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
प्रश्न- कुसुम सोलर पंप योजनेद्वारे किती अनुदान मिळते?
उत्तर- पीएम कुसुम योजनेत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी 60% पर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये केंद्राकडून 30% आणि राज्य सरकारकडून 30% रक्कम दिली जाते. बँकेकडून 30% कर्ज घेता येते, तर उर्वरित 10% रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागते.
प्रश्न- कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर- कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. त्याची सविस्तर माहिती वर दिली आहे.
प्रश्न- कुसुम सोलर पंप pm solar pump scheme योजनेसाठी कोण पात्र आहे?
उत्तर- सोलर पंप योजनेसाठी सर्वच शेतकरी पात्र असणार आहेत.
प्रश्न- कुसुम सोलर पंप योजनेद्वारे लावण्यात आलेले solar panel किती काळ टिकतात?
उत्तर- या योजनेद्वारा लावण्यात आलेले solar panel हे 25 ते 30 वर्ष टिकतात.
हे ही वाचा…