वनस्पतींच्या वाढीसाठी Plant nutrition अन्नद्रव्यांची गरज असते. वनस्पती/पिके ही अन्नद्रव्ये हवा, पाणी आणि मातीतून शोषण करत असतात. ही प्रक्रिया जटिल असली तरी, अन्नद्रव्यांचे कार्य कसे चालते समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम मातीचे गुणधर्म, पाण्याची प्रत, पिक/ वनस्पतीचा प्रकार आणि त्यासाठी लागणारी पोषणद्रव्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच आपल्या शेत जमिनीत कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात उपलब्ध आहेत, यासाठी सर्वप्रथम माती परीक्षण करणे आवश्यक आहे. हा मृदा पृथःकरण अहवाल मृदा शास्त्रज्ञामार्फत समजून घ्यावा. म्हणजे त्यानुसार पीक पोषणासाठी, अन्नद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन करणे शक्य होते.

पिकांच्या वाढीसाठी जसे मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते, त्याप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्ये ही तितकेच महत्वाचे असतात. मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा समावेश होतो तर दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये लोह, मॅग्नीज, बोरान,झिंक इत्यादीचा समावेश होतो. पिकांच्या वाढीसाठी लागणारी आवश्यक Plant nutrition अन्नद्रव्ये जाणून घेऊन त्यांचा समतोल पुरवठा केल्यास, पिकांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊ शकते. त्यासाठी त्याच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊन व्यवस्थित उपायोजना करावी.
पिकांचे रासायनिक विश्लेषण केले असता पिकांमध्ये सुमारे 90 मूलद्रव्य आढळतात. मात्र ती सर्वच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात असे नाही. ज्या अन्नद्रव्यांची कमतरता पिकांवर असते त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो, अशी प्रमुख 16 प्रकारची मूलद्रव्ये ही महत्त्वाची मानली जातात. त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही Plant nutrition अन्नद्रव्ये पिकांना हवा व पाण्यातून मिळतात. उर्वरित 13 अन्नद्रव्ये जमिनीतून मिळत असतात. जमिनीचा सामू(pH) हा 7 च्या दरम्यान असला पाहिजे. अशा स्थितीत रासायनिक आणि जैविक क्रिया चांगल्या होऊन अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
अन्नद्रव्यांचे प्रकार
पीक वाढीसाठी आवश्यक Plant nutrition मूलद्रव्ये ठरवण्याकरता महत्त्वाचा तीन बाबी:
मूलद्रव्यांच्या पिकाच्या वाढीमध्ये घटक अन्नद्रव्य म्हणून प्रत्यक्षपणे सहभाग असला पाहिजे.
मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांची शाखीय वाढ आणि उत्पादन वाढ पूर्णपणे होत नाही.
प्रत्येक मूलद्रव्यांची कमतरतेची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची असतात.
1.मुख्य अन्नद्रव्य:
यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा समावेश होतो. हे अन्नद्रव्य पिकांकडून मोठ्या प्रमाणात शोषले जात असल्याने त्यांना मुख्य अन्नद्रव्य म्हटले जाते. यापैकी ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड हे अन्न द्रव्य पिकांना अधिक प्रमाणात लागतात. परंतु त्यांचा पुरवठा हा जमिनीतील पाणी आणि हवा याद्वारे सहजपणे होतो. वनस्पती मधील जैविक क्रियांमध्ये या तीन मूलभूत अन्नद्रव्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. पिकांच्या एकूण वजन पैकी जवळजवळ 94 टक्क्यांहून जास्त भाग यातील अन्नद्रव्यांनी व्यापलेला आहे. याव्यतिरिक्त नत्र आणि पालाश सारखी अन्नद्रव्ये पिकांना मोठ्या प्रमाणात लागतात. जमिनीतील ओलाव्यामध्ये विद्राव्य व मातीच्या कणांवर अधिशोषित असणाऱ्या या अन्नद्रव्यांचा वापर पिकांच्या मुळांद्वारे केला जातो. जमिनीमधून या अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा साधारणपणे मध्यम ते कमी प्रमाणात असतो.
प्रमुख अन्नद्रव्ये – ही नत्र (N2), स्फुरद (P2O5) व पालाश (K+)
- नत्र- नत्र हा अन्नघटक पिकाच्या एकूण कालावधीनुसार पिकास 2-3 हप्त्यात दिला जातो. खरीप हंगामातील पिकास नत्राचा पहिला हप्ता पेरणीच्या वेळी, दुसरा पेरणीनंतर 30 दिवसांनी आणि तिसरा व शेवटचा हप्ता पेरणीनंतर 45 दिवसांनी दिला जातो. इतर पिकांना नत्र पेरणीच्या वेळी व पेरणीनंतर 30 दिवसांनी अशा 2 हप्त्यात दिले जाते. पिकास नत्राची गरज सुरुवातीच्या अवस्थेतच असते. त्याचप्रमाणे जमिनीत दिलेला नत्र पिकास लगेचच उपलब्ध होतो त्यामुळेच पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिकास जसजशी गरज लागते त्यानुसार 2-3 हप्त्यात नत्राचा पुरवठा करावा लागतो.
- स्फुरद- स्फुरद हे अन्नद्रव्य जमिनीत दिल्यानंतर प्रथम ते मातीच्या कणांना चिकटते व सुरुवातीला 18-20 टक्के एवढ्या प्रमाणात पिकास उपलब्ध होते. स्फुरदची गरज पिकांच्या मुख्य वाढीच्या काळात असते आणि पेरणीच्या वेळी एकदाच दिलेला स्फुरद हा पिकांच्या मुख्य वाढीच्या काळात पिकास हळूहळू उपलब्ध होत जातो.
- पालाश- पालाश हा अन्नघटक जमिनीत दिल्यानंतर पिकास लगेच उपलब्ध होत नाही, तर दिलेल्या अवस्थेतच पिकांच्या पुणरुत्पादन अवस्थेपर्यंत जमिनीत पडून राहतो. पालाशची पिकास प्रामुख्याने पुणरुत्पादनअवस्था म्हणजे दाणे लागताना / भरताना फळांची वाढ होताना आवश्यकता असते. पिकांच्या पेरणीच्या वेळी दिलेला पालाश पिकांच्या गरजेनुसार पुणरुत्पादन अवस्थेत पिकास उपलब्ध होतो.
2. दुय्यम अन्नद्रव्य:
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक या तीन Plant nutrition अन्नद्रव्यांना वनस्पतींची दुय्यम अन्नद्रव्ये असे म्हणतात. यांची गरज मध्यम प्रमाणात असते. तेलबिया उत्पादीत जमिनीमध्ये गंधकाची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
3. सूक्ष्म अन्नद्रव्य:
सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, क्लोरीन, बोरॉन, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम आणि जस्त इत्यादी अन्नद्रव्यांचा समावेश होतो. सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना कमी प्रमाणात लागतात. सुपीक जमिनीमध्ये ही जमिनीतून नैसर्गिकरित्या पुरेशा प्रमाणात मिळत असली तरी काही पिकामध्ये कमतरता दिसून येते. अशावेळी या अन्नद्रव्यांचा पुरवठा शेणखत/ सेंद्रिय खतांमध्ये मिक्स करून करावा लागतो किंवा फवारणीद्वारेही पूर्तता करता येते.
रासायनिक खते खरेदी करताना खतांमधील Plant nutrition अन्नद्रव्यांचे प्रमाण, पिकांची वाढीच्या अवस्थेतील अन्नद्रव्यांची गरज आणि खताची किंमत या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
उपयुक्त माहिती