Pik vima- रब्बी पिक विमा योजना :

रब्बी पीक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा मिळतो. Pik vima या योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना विविध प्राकृतिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानांपासून सुरक्षा प्रदान करणे आहे.

सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. या हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, वाटाणा यासह इतर पिकेही घेतली जातात. पुढील काळात कीड, रोग किंवा कोणती नैसर्गिक आपत्ती कधी येईल हे सांगता येत नाही. बरेचदा अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसतो. राज्य शासनाने 2023 मध्ये सर्व सर्वसमावेशक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे खरीप प्रमाणे रब्बी हंगामातही फक्त 1 रुपयात पीक विमा भरता येणार आहे. बाकी उर्वरित पैसे आपले सरकार भरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे. आपण पिकावर हजारो रुपये खर्च करतो, पण पिक विमा भरण्यासाठी टाळाटाळ करतो किंवा घाबरतो. Pik vima पिक विमा कसा, कोठे भरायचा हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते. आपली ही भीती दूर करण्यासाठी या लेखामध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे.

पिकांची सुरक्षितता :

पिक विमा योजनेचा भाग घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची संरक्षण करण्यासाठी हमी घेतलेली रक्कम म्हणजेच पिकांची सुरक्षितता किंवा पिकांचा जोखीम स्तर होय.  यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांना सुरक्षित करण्याची जबाबदारी विमा कंपनी घेते. त्यासाठी शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी या योजनेत सहभागी व्हावे.

अर्ज कोठे भरावा?

ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज भरता येतो. शेतकऱ्यांना सहज अर्ज करता यावा यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावरून ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही, त्यांना बँकेत जाऊन किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या साह्याने अर्ज करता येतो.

आवश्यक कागदपत्रे :

शेतकऱ्याचे आधार कार्ड,

चालू बँकेचे पासबुक,

सातबारा, 8अ उतारा,

पिक पेरा स्वयं घोषणापत्र

भाडे पत्रक (जर भाडेवर शेती केली असेल तर)

Pik vima विमा का भरावा ?

सध्याचे वातावरण हे अनिश्चित स्वरूपाचे आहे वातावरणात कधी काय बदल होईल हे सांगता येत नाही. गारपीट, अवकाळी पाऊस, बाष्पयुक्त हवामान अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होते. या परिस्थितीत विमा कंपनीकडे भरपाई मागता येते. शेतीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी कर्जबाजारी होतात. त्यामुळे काही शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांचे मनोबल तुटू नये यासाठी 1 रुपयात पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी विमा कवच प्रदान केले जाते. म्हणूनच या योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना 15 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

पिक विमा योजना कमीत कमी प्रीमियमच्या दरात उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडते.

1 रुपयांमध्ये रब्बी पिकाच्या विम्याचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

1 thought on “Pik vima- रब्बी पिक विमा योजना :”

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version