मुख्य पीक घेतल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की, आता 2-3 महिने शेत पडून राहण्यापेक्षा कोणते पीक घेता येईल का? आपल्याकडे जर पशुधन असेल तर baby corn cultivation हा पर्याय आपल्यासाठी योग्य आहे, असे मला वाटते. म्हणूनच या बेबी कॉर्न पिकांविषयी माहिती देत आहे.
बेबी कॉर्न म्हणजे मक्याची लहान कोवळी कणसे. बेबी कॉर्न हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेले एक जबरदस्त सुपरफूड आहे. बेबी कॉर्नमध्ये अनेक कार्बोहाइड्रेट्स, कॅल्शियम, प्रोटीन्स , व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर आढळतात. Baby corn ही चवीला खूप छान आहेतच पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये आहेत. ते सॅलड म्हणून कच्चे खाता येते किंवा कॉर्न मंचुरियन, चिली पकोडे, कॉर्न मसाला असे बेबी कॉर्नचे अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे मोठमोठे हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये बेबी कॉर्नची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.