Mulching paper subsidy 2024: मल्चिंग पेपर साठी मिळणार 50 टक्के अनुदान; अर्ज करण्याची पद्धत

पारंपरिक शेती पद्धतीमध्ये मागील दशकापासून अमुलाग्र बदल झालेला दिसत आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचन प्रणाली, ड्रोन च्या साह्याने औषध फवारणी,  विद्राव्य खते, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मल्चिंग पेपरचा वापर अशा आधुनिक पद्धतींचा, तंत्रज्ञानाचा आणि खतांचा वापर वाढलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची वरील सर्व माहिती आपण यापूर्वी पाहिलेलीच आहे. आजच्या या लेखामध्ये आपण मल्चिंग पेपर चा, शेती क्षेत्रातील वापर याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. मल्चिंग  पेपरचे फायदे लक्षात घेता सरकार ने मल्चिंग पेपर योजनेची Mulching paper subsidy  सुरुवात केली आहे.

Mulching paper subsidy
Mulching paper subsidy

मल्चिंग म्हणजे मातीचा वरचा थर झाकून, झाडाच्या वाढीसाठी, विकासासाठी अनुकूल परिस्थिती/ वातावरण तयार करण्याची प्रक्रिया आहे. पिकांना किंवा झाडांना पालापाचोळा लावण्याची ही आपली जुनीच पद्धत आहे. यामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात  होते.  तसेच झाडाभोवती संरक्षणात्मक आच्छादन थर तयार होतो. साधारणपणे पिकांना आच्छादन (मल्चिंग)  करण्याचे दोन प्रकार आहेत. सेंद्रिय आच्छादन आणि अजैविक आच्छादन.

सेंद्रिय आच्छादन/ मल्चिंग:

शेतातील सुकलेला पालापाचोळा, गवत,भाताचा गव्हाचा पेंडा, भुसकट, सुकलेली पाने, झाडाच्या साली, पिकांचे अवशेष अशा नैसर्गिक पदार्थ पासून सेंद्रिय आच्छादन केले जाते. या आच्छादनाचे कालांतराने विघटन होते. त्यामुळे ते वारंवार बदलावे लागते. तसेच यामुळे पिकांना कीटकांचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

Mulching paper subsidy
Mulching paper subsidy

अजैविक आच्छादन/ मल्चिंग:

अशा प्रकारच्या मल्चिंगमध्ये प्लास्टिक फिल्म, पॉलिथिन, जिओटेक्स्टाईल्स आच्छादनासाठी वापरले जाते. सध्या व्यावसायिक शेतीमध्ये अजैविक मल्चिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कारण यामध्ये वापरले जाणारे प्लास्टिक हे सहजासहजी विघटित होत नाही.  हे मल्चिंग अनेक प्रकारात उपलब्ध आहे.

Mulching paper subsidy
Mulching paper subsidy

प्लास्टिक मल्चिंग पेपर चे प्रकार आणि त्याचे गुणधर्म:

पारदर्शक प्लास्टिक मल्चिंग पेपर:

या पेपरच्या आच्छादनातून सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे माती गरम होऊन जमिनीचे तापमान वाढते. अशा प्रकारचा पेपर हा मुख्यता थंड हवामानात वापरला जातो. हिवाळ्यात स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी हा पेपर उपयुक्त आहे.

काळा मल्चिंग पेपर:

या मल्चिंग पेपरच्या दोन्ही बाजू काळ्या रंगाच्या असतात. सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचून तणाची उगवण होऊ नये म्हणून या प्रकारचा पेपर वापरतात. काळा कलर हा प्रकाश खेचून घेणारा असल्यामुळे तो जास्त गरम होतो त्यामुळे त्याच्या उष्णतेचा त्रास पिकांना होतो.

व्हाईट- ब्लॅक मल्चिंग पेपर:

नावाप्रमाणेच या मल्चिंग पेपरची एक बाजू काळी व दुसरी बाजू पांढरी असते. हा दोन्ही बाजूने वापरता येतो. तुलनेने हा पेपर जास्त गरम होत नाही.

सिल्वर- ब्लॅक मल्चिंग पेपर:

हा पेपर शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. हा पेपर वापरताना सिल्वर बाजू वर करूनच वापरला जातो कारण सिल्वर कलरच्या चकाकी मुळे सूर्यप्रकाशाचे रिफ्लेक्शन होते. या गुणधर्मामुळे पेपर थंड राहतो परिणामी जमीन गरम होत नाही. हा मल्चिंग पेपर प्रत्येक पिकासाठी वापरता येतो.

इन्फ्रारेड प्रकाशाला पारदर्शक मल्चिंग पेपर:

या मल्चिंग पेपर मधून सूर्यप्रकाशातील इन्फ्रारेड किरणे जमिनीपर्यंत पोहोचतात. परंतु तण वाढीसाठी उपयुक्त किरणे जमिनीवर पोहोचत नाहीत. त्यामुळे या मल्चिंगच्या वापरामुळे शेतात तण वाढत नाही.

रंगीत मल्चिंग पेपर (पिवळा- तपकिरी):

हा पेपर जमिनीवर पसरताना तपकिरी बाजू जमिनीलगत आणि पिवळी बाजू वरच्या दिशेला असते. पिवळा रंग पांढऱ्या माशीला आकर्षित करतो म्हणून जेव्हा पांढऱ्या माशा सूर्याच्या उष्णतेमुळे या पेपरच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा मृत्यू होतो. ज्या भागात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त आहे  त्या भागात याचा विशेष वापर केला जातो.

विणलेले(सच्छिद्र) मल्चिंग पेपर:

विशेषता गादीवाफ्यासाठी हा पेपर वापरला जातो. स्ट्रॉबेरी सारख्या पिकात त्याचा वापर केल्याने चांगले उत्पादन मिळवणे शक्य होते. अधिक काळ टिकणाऱ्या छोट्या झाडासाठी हे मल्चिंग पेपर फायदेशीर ठरतात.

योग्य मल्चिंग पेपरची निवड:

सध्या बाजारामध्ये मल्चिंग पेपरच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. यामधून आपल्या पिकासाठी कोणता मल्चिंग पेपर योग्य ठरेल याचा प्राथमिक अंदाज असणे शेतकऱ्याला खूप आवश्यक आहे. आच्छादनाचा जास्तीत जास्त फायदा मिळून, उत्पादनात वाढ होण्यासाठी हा निर्णय/निवड  शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

  • 3 ते 4 महिन्याच्या भाजीपाला पिकासाठी फिल्मची जाडी 15 मायक्रोन ते 30 पर्यंत आवश्यक आहे.
  • 8 ते 12 महिन्याच्या कालावधीतील पिकासाठी 50 मायक्रॉन जाडीच्या पेपरचा वापर करावा.
  • 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे पिकांना 100 ते 150 मायक्रोन जाडीची फिल्म निवडता येईल. कारण या ठिकाणी जास्त टिकाऊपणा आवश्यक असतो.
  • म्हणजेच पीक प्रकारानुसार आपण मल्चिंग फिल्मची जाडी निवडावी.

बाजारामध्ये सध्या कमी किमतीमध्ये मल्चिंग पेपर उपलब्ध करून देण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मल्चिंग पेपर खरेदी करत असताना लांबी- रुंदी विचारूनच खरेदी करावी.  शक्य झाल्यास आपण खरेदी करीत असलेला बंडल खोलून, ओढून ताणून त्याचा ताण, चिवटपणा, कलरची शायनिंग हे सर्व तपासूनच खरेदी करावी.  दर्जेदार पेपरची खरेदी करण्यासाठी आपल्या माहितीतील दुकानदाराकडूनच खरेदी करावी.

मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे:

  • मल्चिंग पेपर मुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगले पीक घेता येते.
  • मल्चिंग फिल्म मुळे सूर्यप्रकाशाचे परावर्तन (रिफ्लेक्शन) झाल्याने जमीन गरम होत नाही, जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो.
  • मल्चिंग पेपर मुळे तणांची वाढ होत नाही.
  • रूट झोन जवळ (मुळांच्या सान्निध्यात) एक प्रकारचे मायक्रो क्लायमेट तयार होते, यामुळे पांढऱ्या मुळ्यांची भरघोस वाढ होते.
  • मल्चिंग पेपर मुळे प्रकाशाचे परावर्तन होते, त्यामुळे पांढरी माशी, थ्रिप्स, लीप मायनर, एफिड्स यासारख्या कीटकांचे नियंत्रण होते.
  • मल्चिंगमुळे जमिनीची धूप थांबते.
  • मल्चिंगच्या वापरामुळे जमिनीतील क्षारतेची पातळी कमी झाल्याची आढळून आले आहे.
  • खतांच्या वापरात बचत होते कारण खतांचे पाण्यातून वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
  • मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पिकाभोवती एक सूक्ष्म वातावरण तयार होते, ज्यामध्ये वनस्पतींना लाभदायक सूक्ष्मजीवांची वाढ होते.
  • मल्चिंगमुळे जमिनीच्या वरच्या थराचे तापमान वाढते त्यामुळे आपोआपच जमिनीचे निर्जंतुकीकरण होते.

परंतु बाजारातून मल्चिंग पेपर विकत घेण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. आर्थिक अडचणीमुळे सर्वच शेतकरी मल्चिंग पेपर वापरू शकत नाहीत.  मल्चिंग  पेपरचे फायदे लक्षात घेता सरकार ने मल्चिंग पेपर योजनेची Mulching paper subsidy  सुरुवात केली आहे.

मल्चिंग पेपर सबसिडी योजना: Mulching paper subsidy

शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाने विविध सरकारी योजना सुरू केल्या आहेत. मल्चिंग पेपर सबसिडी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. दारिद्र्य रेषेखाली किंवा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाइन किंवा ऑफलाइन या दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतात.

1. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. शेतकरी घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकतील व त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात  हेलपाटे मारण्याची गरज नाही. तसेच या योजनेचा लाभ मिळेपर्यंत घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्जाची स्थिती पाहता येईल.

2. ऑफलाइन पद्धतीने म्हणजे कृषी कार्यालयात स्वतः जाऊन अर्ज सादर करणे. यासाठी शेतकऱ्यांना तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. त्यामध्ये विचारलेली माहिती पूर्ण व बिनचूक भरावी. काही शंका असल्यास संबंधित कृषी सहाय्यक/ अधिकारी यांची मदत घ्यावी. त्यानंतर योग्य ती कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज कार्यालयात जमा करावा.

शेतकऱ्यांचा हा अर्ज सादर केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सदर अर्जाची आणि जोडलेल्या कागदपत्रांची पाहणी करतील व या योजनेसाठी पात्र ठरवतील.

तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतर सदर लाभार्थी शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरची खरेदी करावी.

त्यानंतर अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावरून PFMS प्रणाली द्वारे  थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

मल्चिंग पेपर योजनेसाठी आवश्यक पात्रता अटी:

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.

मल्चिंग पेपर योजनेची वैशिष्ट्ये: Mulching paper subsidy

  • शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
  • एकूणच शेतकऱ्याचे सर्वांगीण जीवनमान सुधारणे.

लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान: Mulching paper subsidy

या योजनेअंतर्गत शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेतून जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी मल्चिंग पेपर अनुदान मिळते.

मल्चिंग पेपर अनुदान योजनेचे लाभार्थी:

महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादन कंपनी, बचत गट सहकारी संस्था या Mulching paper subsidy योजनेसाठी पात्र आहेत.

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • सातबारा उतारा व 8-अ प्रमाणपत्र
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो.

हे ही वाचा: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्ज कसा करायचा?

आपण Mulching paper subsidy योजनेची ही माहिती पूर्ण वाचल्याबद्दल आपले धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

2 thoughts on “Mulching paper subsidy 2024: मल्चिंग पेपर साठी मिळणार 50 टक्के अनुदान; अर्ज करण्याची पद्धत”

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version