Mini tractor scheme 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना,अर्ज प्रक्रिया सुरू…

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गटांना Mini tractor scheme मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. या घटकातील बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.

Mini tractor scheme
Mini tractor scheme

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना आधुनिक शेती उपकरणे मिळणार आहेत. या बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि बचत गटातील किमान 80 % सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. तसेच अध्यक्ष व सचिव अनुसूचित जातीचेच प्रवर्गातील असावेत. बचत गटातील किमान एका सदस्याकडे RTO मार्फत मिळणारा वाहन परवाना असणे आवश्यक आहे.

Mini tractor scheme पात्रता व अटी

यासाठी स्वयंसाहाय्यता बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे आणि हे बँक खाते बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे.

बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

बचत गटांनी व गटातील सदस्यांनी यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

योजनेसाठी अर्जांची संख्या ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक आल्यास लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल.

अनुदान आणि सुविधा

मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये इतकी राहील. बचत गटांनी या रकमेच्या 10 % स्वयं हिस्सा (रु.35,000/-) भरल्यानंतर प्रत्यक्षात अनुदानित असणारे 90% रक्कम (रु 3.15 लाख) अनुज्ञेय राहील.

यापेक्षा जास्तीची खरेदी करणार असल्यास, जास्तीची रक्कम संबंधित बचत गटांनी स्वतः खर्च करावी.

Mini tractor scheme यामुळे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे शक्य होणार आहे.

बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

परंतु लाभार्थ्याने मिनी ट्रॅक्टर विकल्यास किंवा गहाण ठेवल्यास सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहायता बचत गटावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित बचत गटाकडून या योजनेसाठी खर्च केलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित बचत गटाला शासनाच्या अन्य योजनांचे लाभ घेण्यासाठी किमान 5 वर्षे अपात्र ठरवले जाईल. अशा आशयाचे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र बचत गटांना देणे बंधनकारक आहे.

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या संसाधनांची आरटीओ नोंदणी आणि स्थानिक जकात (लागू असेल तर) तसेच विमा उतरवण्याचा खर्च बचत गटांना करावयाचा आहे

Mini tractor scheme अर्ज करण्याची प्रक्रिया

लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत वेबसाईट: https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx या वेबसाईटवर ऑनलाइन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून, समाज कल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

ही सुवर्णसंधी गमावू नका आणि आपल्या बचत गटाच्या प्रगतीसाठी 10 फेब्रुवारी 2025 पूर्वी अर्ज करावा.

हे ही वाचा…

केंद्र व राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी कसा मिळवावा.

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version