maka lagwad मका लागवड : खतनियोजन व कीड रोग व्यवस्थापन

तृणधान्य पिकांच्या उत्पादनात गहू व भात या पिकानंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. तसेच ते महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. आपल्या रोजच्या आहारात मक्याचा समावेश असतोच शिवाय त्याच्यापासून लाह्या, ब्रेड, स्टार्च, अल्कोहोल, लॅक्टिक ऍसिड, ग्लुकोज, डेक्सट्रोज, गोंद, रंग, कृत्रिम रबर तयार केले जाते. अशा या पिकांमधून शेतकऱ्याला अवघ्या दोन ते तीन महिन्यात चांगले उत्पन्न मिळते. या पिकामुळे जनावरांच्या वैरणीवर (खाद्यपदार्थावर)  होणारा शेतकऱ्याचा खर्चही कमी होतो. आजच्या लेखामध्ये आपण maka lagwad मका लागवड याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.  आमच्या या शिफारशी आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरतील.

maka lagwad 2
maka lagwad मका लागवड

maka lagwad मका लागवड हवामान:

मका हे उष्ण, समशीतोष्ण व थंड अशा सर्व प्रकारच्या हवामानात येणारे पीक आहे. या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असते परंतु 20 ते 25 डिग्री तापमानातही हे पीक वर्षभर घेता येते.

maka lagwad मका लागवड जमीन:

मका हे पीक जवळजवळ सर्वच प्रकारच्या जमिनीत घेता येते. परंतु मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची आणि सेंद्रिय पदार्थांनी युक्त जमीन या पिकासाठी उत्तम असते. विशेषता नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत मक्याचे पीक फार चांगले येते.

पूर्व मशागत:

जमिनीची खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी 4 ते 5 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे.

पेरणीची पद्धत:

मक्याची पेरणी ही टोकन पद्धतीने करावी. maka lagwad मका लागवड सरी वरंब्यावर पेरणी करायची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला पेरणी करावी. यासाठी पेरणी/टोकणीचे अंतर,

उशिरा व मध्यम कालावधीच्या वाणसाठी-  75 *20 सेमी.

कमी कालावधीच्या वाणसाठी-  60 *20 सेमी.

maka lagwad मका लागवड पेरणीची वेळ:

मका हे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाते.

खरीप हंगाम – 7 जून ते 15 जुलै

रबी हंगाम – 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर

उन्हाळी – 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी

maka lagwad मका लागवड
maka lagwad मका लागवड

मका पिकाचे सुधारित वाण:

1. उशिरा पक्व होणारे वाण:(110ते120दिवस)

संकरित वाण- पी. एच. एम. 1, पी. एस. एम.- 3, सीड टेक- 2324, बायो 9381, एच. एम. 11, क्यू. पी. एम.-7

संमिश्र वाण- प्रभात, शतक- 9905

2. मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण: (100ते110दिवस)

संकरित वाण- राजर्षी, फुले महर्षी, डी. एच. एम. 119,  डी. एच. एम. 117, बायो 9637

संमिश्र वाण- करवीर, मांजरी, नवज्योत

संकरित वाण- जे. एच. 3459, पुसा हायब्रीड- 1, जे. के.2492

संमिश्र वाण- पंचगंगा, प्रकाश, किरण

4. अति लवकर पक्व होणारे वाण: (80 ते 90 दिवस)

संकरित वाण- विवेक-9, विवेक-21, विवेक-27, विवेक क्यू.पी.एम.-7

संमिश्र वाण- विवेक, संकुल

बियाण्याचे प्रमाण:

धान्य पिकासाठी- 6 ते 8 किलो प्रति एकर

चारा पिकासाठी- 30 किलो प्रति एकर

बीज प्रक्रिया:

पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम किंवा थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी.

रासायनिक खत मात्रा:

पेरणीच्या वेळी 20 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 16 किलो पालाश प्रति एकरी द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी 15 किलो नत्र आणि जमिनीत जर झिंकची कमतरता असेल तर 8 किलो झिंक सल्फेट, पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी 15 किलो नत्र  द्यावे.

तणनाशकाचा वापर:

पेरणीनंतर लगेच म्हणजेच पिक उगवण्यापूर्वी आट्राटॉप 50 % 500 ग्रॅम एकरी जमिनीवर फवारावे.

पेरणीनंतर  20 ते 22 दिवसाच्या दरम्यान तण 2 ते 3 पानाचे असताना टिंजर 30 मिली प्रती एकर फवारावे.

पाणी व्यवस्थापन :

रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसांनी, उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने व खरिपात जरुरीनुसार पाणी द्यावे पाणी देण्यासाठी पिकाच्या संवेदनशील अवस्था खालीलप्रमाणे,

1) पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी (पिक वाढीची अवस्था)

2) 40 – 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना

3) 75 – 95 दिवसानंतर पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत  पाण्याची पाळी देणे आवश्यक आहे.

मका पिकावरील वरील किड नियंत्रण :

1. मावा/तुडतुडे:

या किडीच्या बंदोबस्तासाठी डायमिथोएट 30 % किंवा मोनोक्रोटोफॉस 36 % प्रवाही 2 मिली प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.

2. खोडकिड:

*निंबोळी अर्क 5% उगवणी नंतर 15 दिवसांनी फवारावे.

*डायमिथोएट 30 ई.सी. 1.5 मिली, 1लीटर पाण्यातून फवारावे.

3. लष्करी अळी:

*निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्तीन 1500 पीपीएम 5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

*एक आठवड्यानंतर अलीका किंवा झप्याक 0.50 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

*प्रादुर्भाव वाढल्यास एक आठवड्यानंतर कोराजन 0.4 मिली प्रति लिटर पाणी किंवा

*डेलिगेट किंवा लार्गो 0.5 मिली प्रति लिटर पाणी यानुसार कीटकनाशक बदलून फवारण्या कराव्यात.

maka lagwad मका लागवड रोग नियंत्रण:

स्ट्रीप ब्लाइट रोग:

या रोगात पानांवर लांब तपकिरी ठिपके तयार होतात. खालच्या पानांपासून सुरुवात करून हा रोग वरच्या पानांवर पसरतो. हा रोग टाळण्यासाठी 2 ग्रॅम डायथेन झेड-78 एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाऊनी मिल्ड्यू:

या रोगाने प्रभावित झाडांच्या पानांवर रेषा पडतात आणि पाने पांढर्‍या कपाशीसारखी दिसतात. त्यामुळे झाडांची वाढही थांबते. डायथेन एम 45 पाण्यात मिसळून त्याची 3-4 वेळा फवारणी केल्यास या रोगापासून आराम मिळतो.

देठ कुजणे:

या रोगाने प्रभावित झाडांचे देठ कुजण्यास सुरवात होते आणि पाने पिवळी पडतात आणि सुकतात. हा रोग टाळण्यासाठी 150 ग्रॅम कॅप्टन 100 लिटर पाण्यात मिसळून मुळांना द्यावे.

गंज रोग:

या रोगात पानांवर लाल व तपकिरी रंगाचे फोड दिसतात. हा रोग टाळण्यासाठी 15 मिली प्रोपिकोनाझोल 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिल्ड्युरोमिल एसीटा रोग:

या रोगात पानांवर हलके हिरवे किंवा पिवळे पट्टे तयार होतात. जसजसा रोग वाढत जातो तसतसे हे पट्टे लाल होतात. या रोगाची लक्षणे दिसल्यास 15 लिटर पाण्यात 30 ग्रॅम मेटालॅक्सिल व मॅन्कोझेब मिसळून सुमारे 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

एकात्मिक किड नियंत्रण:

*आंतरपीक : किडीला सलग मका पिकावर अंडी घालावयास आवडते. किडीस बळी न पडणा-या आंतरपिकाचा वापर केल्यास उपद्रव टाळता येऊ शकतो.

*फेरपालट : एकाच शेतावर सलग हंगामात किडीला बळी पडणारी पिक घेणे टाळावे. मका पिक सलग (खरीप- रबी-उन्हाळी) हंगामात घेणे टाळावे. एकदल व द्विदल पीकाची फेरपालट करावी.

*कामगंध सापळ्यांचा वापर करा.

Maize MSP- म्हणजेच हमीभावाने मका खरेदी:


केंद्र सरकारने देशातील मका उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी ही मानक प्रक्रिया जारी केली आहे. यानुसार इथेनॉल निर्मिती करणारे प्लांट नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून केक शेतकऱ्याकडून हमीभावाने मक्याची खरेदी होणार आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याबरोबरच इथेनॉल निर्मिती उद्योगांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात मका उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) आणि इथेनॉल निर्मिती उद्योग(एनसीसीएफ) प्रतिक्विंटल 2291/- रुपये या हमीभावाने मक्याची खरेदी करण्यासाठी करार केला जाणार आहे. या दाराला ऑक्टोबर 2024 नंतर सुधारित पद्धतीने लागू केली जाईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या मानक प्रक्रियेमुळे इंधनामध्ये इथेनॉलचे प्रमाण तर वाढेलच पण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे.

काढणी:

मक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यानंतर कणसांची काढणी करावी.  ताटे न कापता फक्त कणसे सोलून (खुडून) घ्यावीत आणि खुडलेली कणसे 2-3 दिवस उन्हात चांगली वाळवावीत.  त्यानंतर सोलणी यंत्राच्या सहाय्याने दाणे काढून उन्हात चांगले वाळवावे जेणेकरून साठवून ठेवल्यानंतर किडीपासून नुकसान होणार नाही.

हे ही वाचा: बेबी कॉर्न लागवड

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version