Kitaknashake-किटकनाशके खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी…

‘आपल्या पिकाचे संरक्षण’  हा उत्पादन वाढीमधील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. पिक संरक्षणासाठी आपण किटकनाशके, रोगनाशके व तणनाशके यांचा वापर करतो. बाजारात विविध प्रकारची Kitaknashake-किटकनाशके  उपलब्ध आहेत.   परंतु अनेक वेळा या कीटकनाशकांचा आपल्याला अपेक्षीत परिणाम मिळत नाही.  कारण कोणत्याही पीकसंरक्षण शिफारशी या कृषि विद्यापीठामध्ये सलग दोन किंवा तीन हंगामात घेतल्या जाणाऱ्या  चाचण्यावरून निष्कर्षीत केलेल्या असतात. बऱ्याचवेळा एखाद्या किडीच्या नियंत्रणासाठी कृषि विभागाने शिफारस केलेल्या किडनाशकाबाबत शेतकरी बांधवांना तसेच किटकनाशक विक्रेत्यांना माहिती नसते त्यामुळे चुकीची किटकनाशके वापरली जातात.  परिणामी अपेक्षेप्रमाणे त्या किडीचे / रोगाचे योग्य नियंत्रण होत नाही. त्यासाठी किटकनाशकांच्या योग्य व परिणामकारक वापरासाठी  काही बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. पण सामान्यत:  आपण त्यांकडे दुर्लक्ष करतो.  तथापि, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी या रसायनांचा वापर सुरक्षितपणे आणि जबाबदारीने केला पाहिजे.

Kitaknashake-कीटकनाशकांचे प्रकार:

औषधांच्या स्त्रोतानुसार कीटकनाशकांचे प्रमुख दोन प्रकार पडतात. एक नैसर्गिक कीटकनाशके आणि रासायनिक कीटकनाशके. नैसर्गिक कीटकनाशके बायो पेस्टिसाइड म्हणजेच जैविक किंवा सर्वसाधारण भाषेमध्ये आपण ऑरगॅनिक  Kitaknashake-किटकनाशके म्हणून ओळखतो.

किडीनुसार योग्य किटकनाशक :

संबंधीत किडीसाठी शिफारस केलेली किटकनाशके खात्रीच्या उत्पादकांची व आपल्या माहितीच्या विक्रेत्याकडूनच घ्यावीत. आपल्या पिकावरील किडीनुसार योग्य किटकनाशकाची निवड करावी.  जसे की, रसशोषण करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही किटकनाशक तर अळयांच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य / पोटविष वापरावे. किटकनाशके विकत घेताना त्यावरील केंद्रीय किटकनाशक मंडळाने दिलेला नोंदणी क्रमांक (CIR क्रमांक ), बॅच क्रमांक, उत्पादनाचा दिनांक, वापरण्याची मुदत संपण्याचा दिनांक आदीं माहिती असल्याची खात्री करुनच घ्या व किटकनाशक विक्रेत्याकडून पक्के बिलच घ्या.

Kitaknashake-किटकनाशके योग्य प्रमाण :

कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहिती पत्रक वाचून, खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे. त्यामध्ये शिफारस केल्याप्रमाणेच योग्य प्रमाणात किटकनाशकाची मात्रा वापरावी.

फवारणीची योग्य वेळ:

पिकाच्या आर्थिक नुकसानीची पातळी वाढली असल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत. किडीची वाढ जास्त होवू न देता, ती थोडया प्रमाणात  असतांनाच त्यांचे नियंत्रण करावे. Kitaknashake-किटकनाशके फवारणी ही साधारण: सकाळी 10 वाजेपर्यंत व सायंकाळी 4.00 वाजले नंतर करावी.  फवारणी वा-यांच्या दिशेनेच व जेव्हा वा-याचा वेग प्रति तास 5 कि.मी. पेक्षा कमी असेल तेव्हाच करावी.

योग्य प्रकारे वापर :

रसशोषण करणा-या किडी उदा. मावा, तुडतुडे यासारख्या किडी पानांच्या मागील बाजूस राहून अन्नरस शोषण करतात, या किडीच्या नियंत्रणासाठी Kitaknashake-किटकनाशके पानांच्या मागील बाजूस पोहोचणे (translaminar action) जरुरी असते.  किंवा ज्वारीवरील मिजमाशीच्या नियंत्रणासाठी फक्त कणसावरच उपायोजना करणे गरजेचे असते.

फवारणीची योग्य पध्दत:

फवारणीसाठी योग्य किटकनाशकांची व योग्य फवारणी यंत्राची निवड करावी.  तसेच फवारणी करतांना काही नैसर्गिक घटकांकडे लक्ष दयावयास हवे जसे वा-याचा वेग व दिशा.  फवारणी यंत्रातून पडणाऱ्या  थेंबाचा आकार – मध्यम आकाराचे थेंब (100 ते 300 मायक्रॉन) योग्य असतात. यापेक्षा लहान आकाराचे थेंब पडत असतील तर फवारल्यानंतर पिकावर योग्य ठिकाणी पडण्यापूर्वीच ते वा-याने इतरत्र पडण्याची शक्यता असते.  स्वयंचलित फवारणी यंत्र (पॉवर स्प्रे) असल्यास किटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी.  फवारणी दिवसाच्या कमी तापमानाच्या वेळी म्हणजेच सकाळी किंवा दुपारनंतर करावी. फवारणी वा-यांच्या दिशेनेच करावी.

किटकनाशके वापरतांना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गळके पंप वापरु नयेत, ते दुरुस्त करुन वापरावे. 
  • Kitaknashake-किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळयाचा वापर करावा.  
  • तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये.  
  • किटकनाशक वापरतांना संरक्षक कपडे ,बुट ,हातमोजे ,नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा.
  • फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत.
  • झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.  फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुकू नये किंवा हवा तोडाने आत ओढू नये त्यासाठी सोयीस्कर तार,काडी किंवा टाचणी वापरावी.
  • किटकनाशकाचा  वास घेणे टाळावे.
  • फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा.  
  • फवारणीचे मिश्रण करतांना किंवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे, किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असते.
  • फवारणीचे काम पुर्ण झाल्यानंतरच हात साबणाने स्वच्छ धूवून खाणे, पिणे करावे.
  • फवारणीच्या वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे.
  • उपाशी पोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी.
  • Kitaknashake-किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्त वेळ करु नये.
  • हे काम करणा-या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टरांकडून स्वत:ला तपासून घ्यावे. 

बाटल्यावरील/ डब्यावरील  लाल  रंगाचे पतंगाच्या  आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके  सर्वात विषारी त्यानंतर पिवळा ,निळा व हिरवा असा क्रम लागतो. हि चिन्हे सोपी व सर्वसाधारण ,निरक्षर व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात. म्हणजेच लाल रंगाचे चिन्ह / खुण असलेली औषधी सर्वात अधिक विषारी, त्यानंतर पिवळा, निळा व हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत कमी विषारी असतात.

विषबाधा झाल्यास काय कराल?

कीटकनाशक काही कारणास्तव पोटात गेल्यास किंवा त्वचा ,डोके,श्वसनेंद्रिया  द्वारे विषबाधा होऊ शकते.  व्यक्तीस विषबाधा  झाल्यास, प्रथमोपचारासाठी त्या कीटकनाशकासोबत मिळालेल्या लेबलवरील सूचनांचे पालन करा. आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्या. परिस्थिती नाजुक व गंभीर असेल तर रोग्याला त्वरित कीटकनाशकाच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांकडे घेऊन जावे.

  • प्रथम त्याच्या अंगावरील कपडे सैल करून बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे, व कोरड्या टॉवेलने पुसावे.
  • कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास रोग्याला ताबडतोब ओकारी करण्याची उपाय योजना करावी.
  • रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणावयाचे प्रयत्न करू नये.
  • बेशुद्ध रोग्याला काहीहि खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये.
  • रोग्याला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे व कपडे सैल करावे.
  • रोग्याला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून घालावे.
  • रोग्याचा श्वासोच्छ्वास योग्य रीतीने सुरु आहे का ते तपासावे. रोग्याचा श्वासोच्छ्वास अनियमित किंवा बंद  झाल्यास त्वरित रोग्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरु करावा.
  • रोग्याला झटके येत असल्यास त्याच्या दातांमध्ये मऊ  कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.

डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करावे.  रोगी बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

किटकनाशकाची वाहतूक साठवण:

किटकनाशकाची वाहतूक  खाद्यवस्तु, बियाणे, किंवा प्रवाशांबरोबर करु नये, ती स्वतंत्र्यरित्या किंवा खताबरोबर करावी.  किटकनाशके नेहमी काळजीपूर्वक हाताळावीत.

Kitaknashake-किटकनाशके थंड व कोरडया ठिकाणी नेहमी कडी, कुलुपांत लहान मुलांपासून, पाळीव प्राण्यापासून व राहण्याच्या खोलीत न ठेवता दूर ठेवावीत. किटकनाशकाचे रिकामे डबे / बाटल्या यांची योग्य ती विल्हेवाट लावावी. किटकनाशके वापरुन झाल्यावर रिकामे डब्बे / बाटल्या यांचा वापर पाणी पिण्यासाठी अन्नपदार्थ किंवा जनांवराचे खाद्य ठेवण्यासाठी करु नये.  किटकनाशके वापरुन झाल्यावर कागदी पुठठयाचे पॅकेट/ प्लॅस्टिक पिशव्या कापून त्याचे तुकडे करावेत व ते जमिनीत गाडावे. रिकामे डब्बे / बाटल्या पाण्याने स्वच्छ धूवून त्यांना छिद्रे पाडून, ठोकून ती पसरट करावीत व नंतर ती जमिनीत गाडून टाकावीत.

कीटकनाशकांपासून होणारे आजार व अपघात:

सर्व शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करावा…

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version