Kakdi lagwad काकडी लागवड संपूर्ण मार्गदर्शन

काकडी हे भारतीय पीक असल्यामुळे, देशभर याची लागवड केली जाते. काकडी  लागवड Kakdi lagwad प्रामुख्याने उन्हाळी व खरीप हंगामात केली जाते. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात काकडीचे पीक घेतले जाते. काकडीचा गर थंड असल्यामुळे तसेच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने काकडीला उन्हाळ्यात भरपूर मागणीअसते व चांगला बाजारभाव मिळतो.

हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर भाजीपाला पिक आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक शेती पद्धती वापरून अधिक उत्पादन कसे घेता येईल ते आपण या लेखात पाहूया.

Kakdi lagwad
Kakdi lagwad

हवामान आणि जमीन:

 * काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे.

*25-30°C तापमान या पिकासाठी सर्वोत्तम मानले जाते.

* पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते.

* वालुकामय चिकणमाती जमीन या पिकासाठी चांगली आहे.

 * काकडीच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू (PH) 5.5 ते 7 या दरम्यान असावा.

लागवडीचा हंगाम:

 * काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात करतात.

 * खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून-जुलै महिन्यात करतात.

 * उन्हाळी हंगामासाठी काकडीची लागवड जानेवारी ते 15फेब्रुवारी पर्यंत करतात.

सुधारित/ संकरीत वाण:

खरिपासाठी: फुलेसुंदरी, फुले शुभांगी, शीतल, सलोनी, प्राजक्ता, कोकण किरण

उन्हाळ्यासाठी: सलोनी, पूसा उदय, पूसा संप्रदा, पुना खीरा, पॉइनसेट, फुले शुभांगी, हिमांगी

हायब्रिड वाण: इंद्रायणी, महिको, NS 404, क्रिश, प्रिया, जिप्सी, बीजसिद्धी

Kakdi lagwad बियाणे प्रमाण:

 * एक एकर लागवडीसाठी 200 ते 400 ग्रॅम बियाणे लागते.

 * बियाणे खरेदी करताना ते चांगल्या प्रतीचे आणि रोगमुक्त असल्याची खात्री करा.

पूर्व मशागत आणि लागवड:

 * शेतात उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत.

 * शेतात चांगले कुजलेले शेणखत टाकून जमीन सपाट करावी.

* सरी पद्धतीने लागवड करताना 1.5 ते 2.5 असे दोन ओळीतील अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. सरीच्या दोन्ही बाजूस मध्यभागी 45 ते 60 सेमी दोन वेलीतील अंतर ठेवून प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 बिया टोकाव्यात. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी 2 जोमदार रोपे ठेवावीत.

* पेरणीसाठी 1.5-2.5 सेमी खोलीवर बी लावावे.

* लागवडी पूर्वी बियाणे बाविस्टीन(20ग्रॅम 10लिटर पाणी) या बुरशीनाशकाच्या द्रावणात भिजवून लागवड करावी.

* बेडवर काकडी लागवड  करताना  शिफारसी प्रमाणे रासायनिक खताने बेड भरून घ्यावेत. (युरिया -23 kg + 10:26: 26- 65 kg + मॅग्नेशियम सल्फेट – 4 kg + दाणेदार गंधक 12 kg + निंबोळी पेंड 100 kg + सूक्ष्म पोषक खत – 10 kg + शेणखत, कंपोस्ट, किंवा वर्मीकंपोस्टचा प्रति एकर नुसार बेड भरून घ्यावेत.)

* काकडी लागवडीसाठी बेड बनवताना मल्चिंगचा वापर करणे फायदेशीर ठरते, कारण यामुळे तणाचा बंदोबस्त होतो, तसेच मातीतील ओलावा टिकण्यास मदत होते.

खते आणि पाणी व्यवस्थापन:

  • काकडी पिकास 50 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद लागवडीपूर्वी द्यावे.
  • लागवडीनंतर 1 महिन्याने नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्ता द्यावा.
  • खत टप्प्याटप्प्याने द्यावे (पेरणीवेळी, फुलोरा टप्प्यावर, फळधारणेच्या वेळी).

 * पावसाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

 * उन्हाळ्यात 3 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

*अतिरिक्त ओलावा टाळा, अन्यथा बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता वाढते.

**ठिबक सिंचन: काकडी पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग केला जातो, यामध्ये रोपाच्या वाढीनुसार पाण्याचा व खताचा समतोल राखला जातो. रोपाच्या मुळांच्या कक्षेत ओलावा राहील याची शेतकऱ्याने काळजी घेणे जरुरीचे आहे.

आंतरमशागत:

 * काकडीच्या वेलांना आधार दिल्यास फळांची प्रत सुधारते, परंतु ते खर्चिक असल्याने महाराष्ट्रात काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते.

*आर्थिक नियोजन असेल तर लागवडीनंतर एक महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी.

 * लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावे.

 * फळे लागल्यानंतर फळांचा संपर्क मातीशी येऊ नये म्हणून फळांखाली वाळलेल्या काट्या घालाव्यात.

Kakdi lagwad रोग आणि किड नियंत्रण:

 * काकडी पिकावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

 * रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य वेळी कृषितज्ञांच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी.

 * किडींच्या नियंत्रणासाठी जैविक पद्धतीचा वापर करावा.

* प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिवळे व निळे चिकट सापळे  एकरी 20 नग लावावेत.

सर्वसाधारण कीड:

फुलकिडे व तुडतुडे: डायमेथोएट 25 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.1% हे 10 मिली प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी.

मावा: डायमेथोएट (15 मि.ली./15ली.) फवारणी करावी.

पांढरी माशी:  नियंत्रणासाठी उलाला 6 ग्राम प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी.

पाने खाणारी अळी व फळातील अळी: नियंत्रणासाठी एमामेक्टिन बेंझोएट 10 ग्राम किंवा बायर फेनोस क्विक 10 मिली प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी

सर्वसाधारण रोग:

डाऊनी मिल्ड्यू(केवडा): एम-45 हे औषध लक्षणे दिसताच 30-45 ग्राम 15 लिटर पाण्यातून फवारावे. किंवा (अझोक्झिट्रोबिन 15 मि.ली. /15ली.)  फवारणी करावी.

पावडरी मिल्ड्यू(भुरी): सल्फर पावडर (40 ग्रॅम/15ली.) फवारणी करावी. किंवा

रोको 10 ग्राम किंवा टाटा ताकत 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

मर रोग (Fusarium Wilt): मर रोगामुळे झाडे पिवळी पडतात आणि नंतर सुकून मरतात. मुळांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने मुळांची वाढ थांबते.

उपाय: बियाण्यांना पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. रोगग्रस्त झाडे नष्ट करावी. 

काढणी उत्पादन:

फळे कोवळी असतानाच काढणी करावी जेणेकरून बाजारात चांगला भाव मिळेल.  कोवळ्या फळांना ग्राहकांची मागणी अधिक असते. फुले आल्यापासून 8-10 दिवसांनी फळे काढणीस तयार होतात. काकडीची तोडणी दर 2 ते 3 दिवसांच्‍या अंतराने करावी. जाती व हंगामानुसार काकडीचे हेक्‍टरी 25 ते 30 टन उत्पादन मिळू शकते.

निष्कर्ष:

सुधारीत जातींची  लागवड, नियोजनबद्ध खत आणि पाणी व्यवस्थापन, कीड-रोगांचे नियंत्रण या गोष्टींचे  योग्य नियोजन केल्यास Kakdi lagwad काकडीच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळू शकते.

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. काकडी लागवड कधी करायची?

उत्तर – काकडीची  लागवड उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही हंगामात केली जाते.

उन्हाळी पीक: जानेवारी ते फेब्रुवारी 

पावसाळी पीक: जून ते जुलैमध्ये बियाणे पेरले जाते.

  • काकडीची बांधणी कधी करावी?

उत्तर- लागवडीनंतर एक महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी.

  •  काकडी किती दिवसात येते?

उत्तर -बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात.

  • काकडी मध्ये किती टक्के पाणी असते?

उत्तर – काकडीमध्ये 95% पाणी असते, ज्यामुळे ते शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते आणि उन्हाळ्यात थंडावा देते.

  • काकडीचे एक एकर लागवडीसाठी किती बियाणे लागते?

उत्तर- काकडीचे एक एकर लागवडीसाठी 200 ते 400 ग्रॅम बियाणे लागते.

  • पॉलिहाऊस मध्ये कोणत्या प्रजातीची काकडी लावावी?

उत्तर- काकडी पिकाच्या फळधारणा होणेसाठी, परागीकरण होणे आवश्यक असते. हे परागीकरण मधमाश्या द्वारे व इतर कीटकामार्फत होते. पण पॉलीहाऊसमध्ये मधमाश्या व त्यासारख्या किटकाना आत प्रवेश करणे अवघड जाते, म्हणून पॉलीहाऊसमध्ये पिकाची लागवड करत असताना “पार्थेनोकार्पिक” प्रजातीच्या काकडीची लागवड करणे आवश्यक आहे.

  • काकडीचे औषधी गुणधर्म कोणते?

उत्तर- काकडीमध्ये तंतूंचे प्रमाण असल्यामुळे पचनक्रिया सुधारते.

काकडीमधील ‘अ’ जीवनसत्व डोळ्यांचे आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

काकडीमधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तशुद्धी करतात.

काकडीचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version