हरभरा हे रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. बहुतांश भागात पेरणीस उशीर झाल्यामुळे सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. तर वेळेवर पेरणी झालेल्या ठिकाणी हरभरा पिक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा Harbhara ghate ali प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. या किडीची मादी पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर, फुलावर अंडी घालते. ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यामधून 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते.
Harbhara ghate ali नुकसानीचा प्रकार
1. घाटे अळी सुरुवातीला पानावरील हरिद्रव्य खरडून खाते, त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी दिसतात व त्यानंतर वाळून गळून पडतात
2. थोड्या मोठ्या झालेल्या आळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात.
3. पीक फुलोऱ्यावर असताना Harbhara ghate ali या अळीचा प्रादुर्भाव वाढत जातो व आळ्या प्रामुख्याने फुले व घाटे यांचे नुकसान करतात.
4. मोठ्या झालेल्या आळ्या घाट्याला छिद्र पाडून आतील दाणे खाऊन, घाटे पोखरतात.
एक अळी साधारणतः 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी जागरुक राहून Harbhara ghate ali या किडींची प्रथम ओळख करून घ्यावी. त्यानंतर पीक संरक्षण करण्यासाठी, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करावा, जेणेकरून खर्चात बचत होईल.
घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
- उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे किडींचे कोष जमिनीवर येतात आणि पक्षी ते वेचून खातात किंवा उन्हामुळे मरून जातात.
- शेत तणविरहित ठेवावे.
- इंग्रजी ‘T’ अक्षराच्या आकाराचे पक्षीथांबे तयार करून शेतामध्ये लावावेत. जेणेकरून पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होईल.
- हरभरा पिक फुलोरा अवस्थेत असताना 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिराक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती पंप फवारणी करावी.
- हरभरा पिकाच्या शेतामध्ये एकरी 3-4 कामगंध सापळे लावावेत.
या सापळ्यांचे आणि आपल्या पिकाचे निरीक्षण करावे. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर (8 ते 10 पतंग प्रति कामगंध सापळ्यात किंवा एक ते दोन अळ्या प्रति मीटर शेतात) आढळून आल्यास खालीलप्रमाणे,

रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
- क्विनॉलफॉस (25% ईसी)- 25 मिली
- इमामेक्टीन बेन्झोएट (5% एस.जी.)- 10 ग्रॅम
- स्पिनोसॅड (45% एस.सी.)- 5 मिलि
- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (9.3 एस.सी.) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (4.6 झेड.सी)
हे संयुक्त कीटकनाशक- 5 मिलि
- फ्लूबेनडायमाइड (39.35 एस.सी.)- 3 मिलि
- इन्डोक्झाकार्ब (14.5 एस.सी.)- 20 मिलि
- लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (5% ई.सी.)- 12 मिलि
- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (18.5 एस.सी.)- 5 मिलि
वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रासायनिक किटकनाशक वापरताना कोणती काळजी घ्यावी.
हे ही वाचा.
ज्वारी व मका पिकावरील लष्करी अळीचे नियंत्रण.
1 thought on “Harbhara ghate ali हरभऱ्यावरील घाटे अळीचे 100% नियंत्रण”