अन्नपदार्थ स्वादिष्ट होण्यासाठी लसणाचा दैनंदिन आहारात अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण उपयोग करतात. लसूण हे आपल्या रोजच्या वापरातील गरजेचे मसाला पीक आहे. त्यामुळे या पिकाला बारमाही मागणी असते. इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत लसूण जास्त काळ टिकवून ठेवता येतो, त्या दृष्टीनेही लसणाची लागवड Garlic cultivation फायदेशीर ठरते. लसणाच्या निर्यातीसही भरपूर वाव आहे.

भारतात पुरातन काळापासून हे कंदवर्गीय पिक Garlic cultivation घेतले व वापरले जाते. लसणातील विविध औषधी गुणधर्मामुळे सर्वजण याचा वापर करतात. खोकला, फुफ्फुस व पोटाचे विकार, कान व डोळ्यांचे आजार या सर्वावर लसूण हे अत्यंत प्रभावी व हमखास गुणकारी औषध आहे. कांद्यापेक्षा लसणात पोषक द्रव्यांचे प्रमाण अधिक असते. लसणामध्ये प्रथिने, कर्बोदके तसेच चुना आणि मॅग्नेशियम ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात. स्निग्ध पदार्थ, क-जीवनसत्व आणि गंधकाचे प्रमाणही भरपूर असते.
जगात सर्व देशात हे पीक घेतले जाते. भारत आणि चीन हे लसूण पिकवणारे जगातील प्रमुख देश आहेत. भारतामध्ये या पिकाच्या लागवडी मध्ये मध्यप्रदेश आघाडीवर असून त्यानंतर ओरिसा, गुजरात आणि महाराष्ट्राचा नंबर येतो.
महाराष्ट्राचा विचार करता पुणे जिल्हा Garlic cultivation उत्पन्नाच्या बाबतीत अग्रभागी आहे. त्यानंतर बीड, सांगली, अहमदनगर, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, छ.संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर आणि बुलढाणा या जिल्ह्यात लसूण पिकाची लागवड केली जाते.
हवामान आणि जमीन
लसूण हे रब्बी हंगामातील पीक आहे. अति उष्ण अथवा अति थंड हवामान या पिकाला मानवत नाही. समशितोष्ण कोरडे हवामान, भरपूर सूर्यप्रकाश व दिवसाची लांबी अधिक असणे या गोष्टी लसूण पिकाच्या वाढीसाठी अनुकूल आहेत. कमाल 25 ते 28 अंश सेल्सिअस पर्यंत आणि किमान तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअस या पिकास अत्यंत पोषक आहे. या गोष्टींचा विचार केला असता ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात Garlic cultivation लागवड करावी.
लसूण हे जमिनीत वाढणारे आणि पोसणारे कंदवर्गीय पीक आहे. त्यामुळे योग्य जमिनीची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. मध्यम कसदार आणि उत्तम निचरा होणारी जमीन कंदाच्या पोषणासाठी योग्य असते. अति हलक्या जमिनीत कंद चांगले पोसत नाहीत. तसेच भारी चिकन मातीच्या जमिनीत कंदाला (गड्डयाला) चांगला आकार येत नाही. तसेच गड्डा कुजण्याचे प्रमाणे वाढते. त्यासाठी मध्यम पोत असणारी जमीन लागवडीस निवडावी.
Garlic cultivation लागवडीचा हंगाम
लसणाची लागवड रब्बी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात करतात. लसणाची पात कडाक्याची थंडी सुरू होण्यापूर्वी वाढणे आवश्यक आहे. परंतु गड्डयाच्या पोषणासाठी मात्र थंड हवामानाची गरज असते. लागवडीस उशीर झाला तर उत्पन्नात घट येते आणि गड्डे लहान राहतात. म्हणून लागवड अगोदर केल्यास पातीची अवास्तव वाढ होऊन रोगाचे प्रमाण वाढते आणि गड्डा पोसायला अधिक कालावधी लागतो. लसणाच्या चांगल्या प्रतीसाठी आणि उत्पादनासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत लागवड करणे योग्य ठरते.
लसणाच्या सुधारित जाती
लसणाचे अनेक स्थानिक प्रकार आढळतात. त्यात कुड्यांचे/पाकळ्यांचे प्रमाण 16 ते 50 पर्यंत असते. गड्डयाच्या आकारात व लसूण पाकळीचा रंग यात विविधता आढळते. रंग बहुदा पांढरा, जांभळा किंवा फिकट लालसर, गुलाबी असतो. लसणाच्या जामनगर, नाशिक, महाबळेश्वर, मदुराई, हिस्सार या स्थानिक जाती आहेत.
लसूण या पिकामध्ये सुधारित जाती नाहीत म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे भारतातील लसूण लागवड करणाऱ्या निरनिराळ्या भागातून, लसणाच्या स्थानिक वानांचा संग्रह करून त्यातून निवड पद्धतीने अधिक उत्पन्न देणाऱ्या सुधारित जाती विकसित करण्याचे काम चालू आहे. यामधून गोदावरी, श्वेता, फुले बसवंत व फुले नीलिमा या जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत. त्यांची महाराष्ट्र मध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
1. Garlic cultivation गोदावरी
या जातीमध्ये गड्डा मध्यम आकाराचा असून रंग जांभळा, पांढरा असून चवीला तिखट आहे. प्रत्येक गड्डयात सुमारे 24 पाकळ्या लागवडीपासून 140 ते 150 दिवसात तयार होतात. याचे हेक्टरी 100 ते 105 क्विंटल उत्पादन मिळते. ही जात फुलकिडे, कोळी आणि करपा रोगांना प्रतिकारक आहे.
2.श्वेता
या जातीचा गड्डा मोठा रंगाने पांढरा शुभ्र आणि तिखट असतो. प्रत्येक गड्डयात साधारण 26 पाकळ्या असतात. ही जात लागवडीपासून 130 ते 135 दिवसात तयार होते. हेक्टरी उत्पादनाचा विचार करता 100 ते 105 क्विंटल उत्पन्न येते.
3.फुले बसवंत
हा लसणाचा सुधारित वाण निवड पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. या वाणाच्या गड्डयाचा रंग जांभळा असून पाकळ्या जांभळ्या रंगाच्या आहेत. सर्वसाधारण एका गड्डयात 25 ते 30 पाकळ्या असतात. सरासरी 140 क्विंटल उत्पन्न मिळते. रब्बी हंगामासाठी या वानाची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
4.फुले नीलिमा
ही लसणाची सुधारित जात असून या जातीचा गड्डा आकाराने मोठा, आकर्षक जांभळ्या रंगाचा असतो. ही जात करपा फुलकिडे कोळी या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम आहे.
5. यमुना सफेद-1
या जातीचे गड्डे पांढऱ्या रंगाचे असून सरासरी उत्पादन 150 ते 175 क्विंटल/हेक्टर मिळते. ही जात भारतात सर्व ठिकाणी लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
6. जी -282
हा लसणाचा सुधारित वाण असून या जातीचे गड्डे पांढऱ्या रंगाचे व मोठ्या आकाराचे असतात. प्रत्येक गड्डयामध्ये 15 ते 16 पाकळ्या असतात. या जातीपासून सरासरी 175 ते 200 क्विंटल/हेक्टर उत्पन्न मिळते. ही जात निर्यातीसाठी उपयुक्त आहे.
7. यमुना सफेद- 2
या सुधारित जातीचे गड्डे घट्ट आकर्षक पांढऱ्या रंगाचे असतात. प्रत्येक गड्डयामध्ये 35 ते 40 पाकळ्या असतात. या जातीचे सरासरी उत्पन्न 150 ते 200 क्विंटल/हेक्टर मिळते.

बियाण्यांचे प्रमाण व लागवडीचे अंतर
लसूण लागवडीसाठी Garlic cultivation एकरी 200 ते 230 किलो बियाणे लागते. लसणाची लागवड सपाट वाफ्यातून करतात. दोन ओळीतील अंतर 15 सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर 7.5 सेंटीमीटर ठेवावे.
बियाण्याची निवड
लागवडीसाठी सुधारित जातीचे शुद्ध व खात्रीशीर बियाणे वापरावे. मागील हंगामात निघालेले, थंड व कोरड्या जागेत साठवून ठेवलेले बियाणे लागवडीसाठी वापरता येते.
लसणाची लागवड कुड्या/पाकळ्या लावून करतात. मोठे एकसारख्या आकाराचे निरोगी गड्डे बियाण्यासाठी निवडावेत. गड्डयातील कुड्या अलगद वेगळ्या कराव्यात. वरच्या पापुद्राला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. एकसारख्या आकाराच्या टपोऱ्या साधारण 8 ते 10 मिलिमीटर लांब कुड्यांची निवड करावी.
जमिनीची पूर्वमशागत
लसणाचे पीक जमिनीच्या वरच्या थरात वाढत असते. लसणाचे खोड जमिनीच्या वर चकतीसारखे असते आणि लसणाच्या खोडाच्या खालच्या भागात गड्डयाची वाढ होत असते. गड्डयाच्या खालच्या भागावर 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची तंतुमय मुळे असतात. त्यासाठी जमीन 20 ते 25 सेंटीमीटर खोल नांगरून, ढेकळे फोडून आणि कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी.
Garlic cultivation लसणाची लागवड
लसणाची लागवड सपाट वाफ्यात करतात. वाफे 2 * 1 मीटर लांबी रुंदीचे केल्यानंतर दोन ओळींमध्ये 15 सेंटीमीटर व दोन रोपातील अंतर 7.5 सेंटीमीटर ठेवून कोरड्या जमिनीत पाकळ्या टोकून लागवड करावी. पेरणीपूर्वी पाकळ्यांना बीज प्रक्रिया करावी. पाकळ्या 2 ते 3 सेंटीमीटर पेक्षा खोल लावू नयेत. टोकणी झाल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
खत आणि पाणी व्यवस्थापन
जमिनीची पूर्वमशागत करताना एकरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. महाराष्ट्रातील जमिनीसाठी एकरी 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद आणि 50 किलो पोटॅश देण्याची शिफारस आहे. 50 टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश याची मात्रा पाकळ्यांची टोकण करण्यापूर्वी द्यावी. उरलेली नत्राची मात्रा दोन भागात किंवा हप्त्यात विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीनंतर 30 दिवसाने व दुसरी मात्रा 45 ते 50 दिवसांनी द्यावी. नत्राची मात्रा लागवडीनंतर 60 दिवसांनी देऊ नये. त्यामुळे उत्पादन व साठवणीवर विपरीत परिणाम होतो. कांदा व लसूण ही पिके गंधकयुक्त खतास प्रतिसाद देतात, असे दिसून आले आहे. म्हणून प्रती एकर 10 किलो गंधक जमिनीत मिसळावे.
रोग कीड व्यवस्थापन
- करपा रोगाच्या नियंत्रणासाठी –
एम-45 (मैनकोजेब 75 % डब्ल्यूपी) – 30 ग्रॅम
साफ (कार्बेन्डाजिम 12% + मॅंकोझेब 63% डब्ल्यूपी) – 30 ग्रॅम
अवतार (हेक्साकोनाज़ोल 4% + ज़िनेब 68% डब्ल्यूपी) – 30 ग्रॅम
या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.
- थ्रिप्स आणि रसशोषक किडींसाठी –
अरेवा (थायोमिथॉक्साम 25% डब्ल्यूजी) – 8 ग्रॅम
जैपैक (थायोमिथॉक्साम 12.6% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 9.5% झेड.सी.) – 8 मिली
कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल) – 8 मिली
फैक्स (फिप्रोनिल 5% एससी) – 30 मिली
या पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
काढणी
लसणाचे पीक साधारणपणे 130 ते 170 दिवसात काढणीस तयार होते. गड्डा पूर्ण भरल्यावर पातीची वाढ थांबून पात पिवळी पडते व माना पडू लागतात. पातीत बारीक गाठ तयार होते. याला लसणी फुटणे असे म्हणतात. 15-20 टक्के लसणी फुटल्यावर पाणी देणे बंद करावे. त्यानंतर 10 ते 12 दिवसांनी लहान कुदळीने किंवा हाताने गड्डे उपटून काढावेत. गड्डे काढल्यानंतर कुदळीने किंवा खुरप्याने लागून दुखावलेले/फुटलेले गड्डे वेगळे काढावेत. काढलेली लसूण पाने आंबट ओली असतात. 20 ते 25 सारख्या आकाराच्या गड्ड्याची जुडी बांधावी व पानांची वेणी बांधून हवेशीर ठिकाणी बांबूवर किंवा दोरीवर टांगून ठेवाव्यात. अशाप्रकारे तयार केलेला लसूण साठवणीत चांगला टिकून राहतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
- Garlic cultivation लसूण लागवडीसाठी जमीन कशी असावी?
उत्तर – पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी. जमिनीच्या सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा.
- लसूण पिकाची लागवड कधी करावी?
उत्तर – लसूण पिकाची लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात करावी.
- लसूण लागवडीसाठी एकरी किती बियाणे वापरावे?
उत्तर – लसूण लागवडीसाठी एकरी 200 ते 230 किलो बियाणे लागते.
- लसूण लागवड करण्याआधी कोणत्या औषधाची प्रक्रिया करावी ?
उत्तर – बाविस्टीन + कॉन्फिडोर या औषधाची प्रक्रिया करावी.
- लसूण उगवायला किती दिवस लागतात?
उत्तर – लसूणाची लागवड केल्यानंतर, आपण सुमारे 130 ते 170 दिवसात आपल्याला लसून मिळतो.
- कोणत्या प्रकारचे लसूण सर्वोत्तम आहे?
उत्तर – रंग विचारात न घेता, लसणाचे सर्व प्रकार महत्त्वाचे आहेत आणि विविध प्रकारे पदार्थ शिजवण्यासाठी वापरले जातात. तथापि, तुलना करताना, जांभळा लसूण हा सर्वात रसाळ आणि सौम्य चवीचा लसूण आहे.
- लसणाचे एकरी उत्पादन किती?
उत्तर -एक एकर शेतात लसणाचे सुमारे 50 क्विंटल उत्पादन मिळते.