गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यावर दिसून येत आहे. अलीकडे ही अळी ज्वारी, भात या पिकाचेही नुकसान करताना आढळली आहे. रब्बी हंगामात ज्वारीवरही या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून Army worm control कीड आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे.

Army worm control ओळखण्याच्या खुणा
या किडीचा पतंग तपकिरी रंगाचा व मजबूत बांध्याचा असतो.
अळी सुरवातीला हिरवट रंगाची असते व तिच्या दोन्ही बाजूस पांढरा पिवळसर पट्टा असतो. नंतर ती किंचीत करड्या रंगाची होते. पूर्ण वाढलेली अळी 30 ते 35 मि.मी. असते. तर पतंगाच्या विस्तार 35 ते 40 मि.मी. इतका असतो.
नुकसानीचा प्रकार
पहिल्या अवस्थेतील अळी पानाचा हिरवा पृष्ठभाग खरवडून खाते. पानांवर पारदर्शक, पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात.
दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानाला छिद्र पाडतात. पानाच्या कडा खातात. अळी पोंग्यामध्ये शिरून आतील भाग खाते. सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात. अळीने पोंगा खाल्ल्याने पिकाची वाढ खुंटते. परिणामी, उत्पादन घट येते.
पानांना छिद्रे व पोग्यांमध्ये अळीची विष्ठा यावरून अळीचा प्रादुर्भाव लक्षात येतो.
या अळीच्या प्रादुर्भावामुळे 30 ते 60 टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते.
नुकसानीची सुरुवात
या किडीचा उपद्रव हंगामाच्या सुरवातीस, बांधावरील गवतावर आढळून येतो. बांधावरील गवत फस्त केल्यानंतर अळ्या मुख्य पिकाकडे वळतात.
दिवसा त्या जमिनीत लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर येऊन पाने कडेपासून मध्य शिरेपर्यंत खातात.
या किडीचा रोपवाटीकेत प्रादुर्भाव झाल्यास जमिनीलगत रोपे कापून खाल्ली जातात आणि एकही रोप शिल्लक राहत नाही. या अळ्या अतिशय खादाड असल्यामुळे पिकावर तुटून पडतात.
एका शेतातील अन्नसाठा संपल्यानंतर अळ्या हजारोंच्या संख्येने शेजारच्या शेतात जातात. या किडीच्या अळ्या एखाद्या लष्करासारखा पिकावर सामुहिक हल्ला करतात व पीक फस्त करतात म्हणून या किडीस लष्करी अळी असे म्हटले जाते.
या आळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येते.
हवेतील आर्द्रता 75 टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश व हिवाळा या बाबी अळीच्या वाढीसाठी पोषक आहेत.
त्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून कीड आटोक्यात ठेवणे Army worm control गरजेचे आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन
1) उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करावी. त्यामुळे किडीच्या जमिनीतील अवस्था वर येऊन प्रखर सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्ष्यांमुळे त्या नष्ट होतात.
2) आंतरपीक म्हणून ज्वारी + मूग +उडीद या पद्धतीचा वापर करावा.
3) सापळा पीक म्हणून ज्वारी पिकाच्या बाजूने मका पिकाची लागवड करावी.
4) पीक उगवणीनंतर 10 दिवसांनी शेतामध्ये एकरी 15-20 कामगंध सापळे लावावेत.
5) आंतरमशागत करून तणे काढून टाकावीत.
6) किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच, पोंग्यामध्ये वाळूमिश्रित राख टाकावी. त्यामुळे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो.
7) मोठ्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शक्य असल्यास अंडीपुज गोळा करून नष्ट करावेत Army worm control.
8) पीक पोंगा अवस्थेत असताना, निंबोळी अर्क/निमतेल (अझाडिरेक्टिन-1000 पीपीएम) 5 मिलि प्रती लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
9) प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक मेटारायझियम (नोमुरिया) रीलेई किंवा मेटारायझियम अनिसोपली 75 ग्रॅम प्रती 15 लीटर पाण्यात मिसळून सकाळी 11वाजण्यापूर्वी अथवा सायंकाळी 4 वाजलेनंतर फवारणी करावी.
ट्रायकोग्रामा बॅक्टरी (ट्रायको कार्ड) 1.5 लाख अंडी हेक्टरी सोडावेत.
आर्थिक नुकसान पातळी
1) प्रति कामगंध सापळयावर 2 ते 3 पतंग दिसणे.
2) किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पुढीलपैकी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
Army worm control रासायनिक किटकनाशकांचा वापर
फवारणी प्रमाण- (प्रति 15 लिटर पाण्यातून)
1) इमामेक्टीन बेन्झोएट (0.5 % एस.जी.) (प्रॉक्लेम, ई एम-1)10 ग्रॅम किंवा
2) स्पिनोटोरम (11.7 % एस.सी.) (डेलिगेट) 6 मिलि किंवा
3) क्लोरॲन्टानिलीप्रोल (18.5 % एस.सी.) (कोराजन) 5 ते 6 मिलि किंवा
4) क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (9.3 %) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (4.6 % झेड.सी) (अम्प्लिगो) 8 मिलि
*आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी (किटकनाशक बदलून) 15 दिवसांच्या अंतराने करावी.
रासायनिक किटकनाशक खरेदी करताना व वापरताना कोणती काळजी घ्यावी.
https://t.me/s/Top_BestCasino/4