फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold

धार्मिक आणि  सामाजिक  उत्सवांमध्ये  झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे.  झेंडूच्या फुलांना दसऱ्याला खूप मागणी असते.  त्यामुळे या काळात  झेंडूचे मोठं उत्पन्न घेतलं जातं.  झेंडूची फुले खराब न होता बराच काळ टिकतात.  ही फुले खुल्या बाजारात विकली जातात तसेच  हार बनवण्यासाठीही वापरली जातात.  झेंडूचा वापर भारतात लग्नाच्या विधींना सजवण्यासाठी केला जात असल्याने या फुलांना जास्त मागणी आहे.  ही प्रामुख्याने सजावटीची वनस्पती आहे. त्याची जगभरात लागवड केली जाते.  तथापि  आफ्रिका आणि आशिया  या दोन  महाद्वीपावर झेंडूची सर्वात जास्त शेती फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold केली जाते.  

झेंडू:

या वनस्पतींची उंची २ किंवा ३ फूट असू शकते.  साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये झेंडूला भरघोस फुले येतात. झेंडूच्या फुलाचा रंग चमकदार पिवळा असतो. पण हे फूल फिकट पिवळ्या आणि केशरी या रंगछटांमध्येही येते. या फुलाची चव तितकीच तिखट आहे जितकी तिची रंगछटा आहे. झेंडूच्या फुलावर अनेक पाकळ्या असतात. फुलाच्या बाहेरील पाकळ्या मोठ्या असतात, तर आतील पाकळ्या लहान असतात.  या वनस्पतीची फुले सामान्यत: गोलाकार, सुवासिक आणि असंख्य पाकळ्याची असतात. झेंडूच्या प्रजातींवर अवलंबून, विविध फुलांचे रंग  आणि आकार वेगवेगळे असतात.  या वनस्पतीची पाने भुरकट आणि हिरवी असतात. कुस्करल्यावर पानांना सुखद वास येतो.

झेंडूच्या जाती:

झेंडूच्या आफ्रिकन, फ्रेंच आणि संकरित या जाती आहे . साधारणतः आफ्रिकन जाती उंच वाढणाऱ्या तर फ्रेंच व संकरित जाती मध्यम ते कमी उंचीच्या आढळतात. या जातींना नारंगी व पिवळ्या रंगाची फुले लागतात. पुसा नारंगी गेंदा व पुसा बसंती गेंदा या जाती लागवडीसाठी चांगल्या आहेत. आफ्रिकन झेंडूचे १५ ते १८ टन तर फ्रेंच झेंडूचे १० ते १२ टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. झेंडूच्या चांगल्या, दर्जेदार उत्पादनासाठी त्याच्या सुधारित जातींची निवड करणे आवश्यक आहे. झेंडूच्या काही सुधारित जातींबद्दल जाणून घेऊया.    

फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold
https://www.marathisheti.in/ फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold

पुसा बसंती झेंडू:

ही जात १९९५ मध्ये विकसित करण्यात आली. भारतातील जवळपास सर्वच प्रदेशात याची यशस्वीपणे लागवड करता येते. या जातीची फुले मध्यम आकाराची आणि पिवळ्या रंगाची असतात.  ताज्या फुलांचे उत्पादन ८० ते १०० क्विंटल प्रति एकर असते.    

पुसा ऑरेंज झेंडू:  

ही जात १९९५  मध्ये विकसित करण्यात आली.  भारतातील जवळपास सर्वच प्रदेशात याची यशस्वीपणे लागवड करता येते. फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold फुलांच्या मोठ्या आकारामुळे हे दक्षिण भारतीय प्रदेशात अधिक लोकप्रिय आहे. त्याची फुले गडद केशरी रंगाची असतात.  या जातीच्या फुलांमध्ये कॅरोटीनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे अन्नपदार्थ आणि औषधी तयारीसाठी वापरले जाते. प्रति एकर १०० ते १२० क्विंटल  फुले येतात.

पुसा अर्पिता:

ही जात २००९ मध्ये विकसित करण्यात आली. त्याची फुले मध्यम आकाराची आणि हलकी केशरी रंगाची असतात. उत्तरेकडील मैदानात लागवड केल्यावर डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत झाडे फुलतात. ताज्या फुलांचे उत्पादन ७२ ते ८० क्विंटल प्रति एकर असते.

हवामान:  

                राज्यात झेंडूचे उत्पादन तिन्ही हंगामात घेतले जाते आणि त्याला नेहमीच मागणी असते.  झेंडू हे प्रामुख्याने थंड हवामानातील पीक आहे, परिणामी झेंडूची वाढ आणि फुलांचा दर्जा  थंड  हवामानात चांगला असतो.  झेंडूची लागवड पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये  केली जाते.  फुले मध्यम हवामानात चांगली वाढतात. रात्रीचे १५ ते १८ अंश सेल्सिअस तापमान झाडाच्या वाढ व उत्पादनासाठी पोषक असते. जास्त पाऊस या पिकास हानिकारक ठरतो.

झेंडूसाठी जमीन कशी लागते?

झेंडूची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत करता येते.  सुपीक, पाणी टिकवून ठेवणारी, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी माती झेंडूसाठी चांगली असते.  सामू ७ ते ७.५ पर्यंत, भरपूर सेंद्रिय कर्बनी युक्त जमिनीत रोप चांगले वाढते. झेंडू पिकाला भरपूर सूर्यप्रकाश लागतो.  झाडे सावलीत चांगली वाढतात पण फुले कमी मिळतात.

लागवड: फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold

लागवडीपूर्वी  प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. सपाट वाफा, सरी वरंबा आणि रुंद सरी किंवा गादीवाफ्यावर झेंडूची लागवड करतात. लागवडीसाठी जमीन तयार करताना पुरेसे शेणखत जमिनीत मिसळावे. झेंडूची लागवड करताना ६० से. मी. अंतरावर घेतलेल्या सरीच्या मध्यभागी ३० से. मी. इतके दोन रोपांमधील अंतर ठेवून लागवड करावी. ६० X ३० से. मी. अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४०,००० रोपे लागतात. लागवड करतांना भरपूर पाण्यामध्ये व सायंकाळी ४ नंतर लागवड करावी. लागवड करताना रोपांची मुळे कॅप्टन ०.२ 5% द्रावणात १० मिनिटे बुडवून लावावीत.  म्हणजे रोपांची मर होत नाही.

खते आणि पाणी व्यवस्थापन :

झेंडूसाठी १०० : ७५ : ७५ किलो नत्र, स्फुरद आणि पालाश या रासायनिक खताची मात्रा शिफारस करण्यात आली आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश तसेच अर्ध्या नत्राची मात्रा लागवडीच्या सुरवातीला द्यावी. उरलेले अर्धे नत्र पुनर्लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावे. नत्राची मात्रा जास्त झाल्यास झेंडूची शाकीय वाढ भरपूर होते व फुलांचे कमी उत्पादन मिळते. पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला हेक्टरी २५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश  देऊन झाडांना मातीची भर लावावी.  फक्त नत्रयुक्त खत अथवा अधिक नत्र वापरु नये. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये विद्राव्य खताचा वापर करावा.

माती ओलसर राहील परंतु पाणी साचणार नाही याची खात्री करण्यासाठी नियमित अंतराने सिंचन केले पाहिजे. खरीप हंगामात पाऊस नसेल तर १५ ते २० दिवसांनी हिवाळ्यात १० ते १५ तर उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. फुलबहाराच्या काळात, झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देवू नये. जास्त पाण्यामुळे रूट कुजणे आणि बुरशीजन्य रोग होऊ शकतात. तसेच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.

फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold
https://www.marathisheti.in/ फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold

कीड आणि रोग:

झेंडू सामान्यत: कीड आणि रोगांना प्रतिरोधक असतात.  तथापि ते ऍफिड्स, स्पायडर माइट्स आणि व्हाईट फ्लायमुळे प्रभावित होऊ शकतात. झेंडूवर बुरशीजन्य रोगांचाही परिणाम होऊ शकतो, जसे की भुरी आणि करप्या.  कोणतीही प्रभावित पाने काढून टाका आणि आवश्यक असल्यास बुरशीनाशकाने उपचार करा.

झेंडू पिकावरील येणार येणारे विविध कीड आणि रोगावर खाली दिलेल्या माहितीनुसार संरक्षण आराखडा करून त्यावर योग्य वेळी उपाय योजना केल्यावर पीक संरक्षण होऊन उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होईल.

झेंडूवर मुख्यतः पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळी या रस शोषक किडी व पाने खाणारी अळीचा प्रकार आढळतो.

  • पांढरी माशी, मावा, तुडतुडे प्रादुर्भाव आढळल्यास एसिफेट- १ ग्राम किंवा  डाय मिथोएट – १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • लाल कोळी पासून झेंडूचे संरक्षण करण्याकरिता डायकोफॉल २ मिली १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी १लिटर पाण्यात २मिली क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

झेंडू वरील रोग :- मर व करपा

मर  हा रोग मुख्यतः आफ्रिकन झेंडू पिकावर आढळतो.  उष्ण वातावरणात  अथवा हवेत पाण्याचे प्रमाण (आद्रता) जास्त असल्यास मर रोग वाढतो.   मर रोग आल्यास झेंडूची पाणी पिवळी पडतात, झेंडूची मुळे सडतात.  झेंडूचे पीक पाने पिवळी पडल्यामुळे व झेंडूचे मुळे सडल्यामुळे मरतात म्हणून या रोगाला मर रोग म्हणतात.

  • कार्बेनडेंझीम – झेंडू पिकात मर दिसताच कार्बेनडेंझीम १ ग्राम + १ लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी आणि फवारणी सुद्धा करावी.

करपा हा सुध्दा झेंडूवर आढळणारा प्रमुख रोग आहे. मर रोगाप्रमाणेच करपा हा रोग बुरशी पासून होतो.

करपा रोगाचे लक्षण झेंडू पिकाच्या खालच्या पानावर दिसून त्यानंतात करपा वरच्या दिशेने वाढत जातो.  यामुळे पानावर काळे ठिपके दसून पाने गळतात व परिणामी झेंडू करपून मरतो म्हणून या रोगाला करपा रोग म्हणतात.  उपाय योजना म्हणून करपलेले पाने जाळावी.

  • मॅन्कोझेब २ टक्के किंवा कार्बेनडेंझीम १ टक्के १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारणी रोगाच्या लक्षणाप्रमाणे कराव्यात.
  • झेंडूवर भुरी आणि करप्या अशा रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळं साधारणपणे आठ दिवसांना औषध फवारणी करावी लागते. तसेच तोडा झाल्यानंतरही फवारणी करावी लागते.

फुलांची काढणी आणि विक्री:

झेंडू लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी फुले येतात. झेंडूची पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून वेचणी करावी.  हारांसाठी देठविरहित फुले तसेच गुच्छ किंवा फुलदाणीसाठी देठासह फुले तोडावीत.  फुलांची तोडणी दुपारनंतर करावी.  फुले तोडताना कळ्या व कोवळ्या फांद्या यांना इजा करून नये.  तोडलेली फुले सावलीच्या ठिकाणी गारव्याला ठेवावीत.  झेंडूची तोडणी केलेली फुले पॉलीथीनच्या पिशवीत थंड जागी ठेवल्यास ४ ते ५ दिवसांपर्यंत चांगली राहतात.

              फुले स्थानिक बाजारपेठेत विकली जाऊ शकतात किंवा इतर राज्यात निर्यात केली जाऊ शकते.  फुलांचे तेल काढले जाते झेंडूचे तेल, साबण, सौंदर्यप्रसाधने यासारखी उत्पादनांमध्ये वापरले जाते. झेंडूचा अर्क अन्न उद्योगात नैसर्गिक रंग म्हणून वापरला जातो.  झेंडूच्या फुलाचा वापर रंग काढण्यासाठी केला जातो,  हा रंग प्रामुख्याने कापड  उद्योगात  वापरला जातो.

तुम्हाला हा लेख फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा व काही सूचना अभिप्राय असतील तर जरूर कळवा…

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare

1 thought on “फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold”

Leave a Comment

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version